Arjachi Sadhyastiti Kay Mahiti Adhikar Arj Namuna : अर्जाची सद्यस्थिती काय आहे. माहिती अधिकार अर्ज द्वारे जाणून घ्या. ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, शासकीय, निमशासकीय कार्यालय असो, वा आपण दिलेले निवेदन तक्रारी असो, अर्जाची सद्यस्थिती काय आहे. हे जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार अर्ज द्वारे समजून घ्या.
माहितीचा अधिकार कायदा २००५- कलम ३ अन्वये अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
जनमाहिती अधिकारी :
१) अर्जदाराचे पूर्ण नाव :-
२) पत्रव्यवहाराचा पत्ता :
३) आवश्यक असलेल्या माहितीचा विषय व कालावधी मी आपल्या कार्यालयात माझ्या ---
या कामासाठी दिनांक-- रोजी दाखल केलेल्या अर्जावर आपल्या कार्यालयातील सक्षम अधिकारी यांनी काय कार्यवाही केली याचा तपशील मिळणेबाबत. सोवत अर्जाची प्रत जोडली आहे.
४) माहितीचा तपशील :
- १. माझे काम / अर्जाची सद्यस्थिती काय आहे. आपल्याकडील नोंद द्यावी.
- २. माझे काम / अर्ज कोणत्या अधिकाऱ्यांकडे निर्णयाअभावी प्रलंबीत आहे. त्यांचे पदनाम व हुद्दा द्यावा.
- ३. माझ अर्जावर सक्षम अधिकारी दिलेला शेरा, लिहलेली टिपण्णी, अभिप्राय यांची छायाप्रत द्यावी.
- ४. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमयन आणि शासकीय कर्त्यव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ अन्वये माझे काम विहीत कालावधीत पूर्ण झाले नसल्याबद्दल जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचे पदनाम व हुद्दा द्यावा.
- ५. माझे कामास झालेल्या विलंबाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांस (शासकीय कर्त्यव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम १० अन्वये) शिक्षा प्रस्तावित असल्याबद्दल कार्यालय प्रमुखांचे लिखित मत (ओपीनियन) छायाप्रत द्यावी.
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः व्यक्तीश / शीघ्र टपालाने
६) अर्जदार दारिद्रय रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
- अर्जदाराची सही
- ठिकाण :
- दिनांक :
- नाव :-
खालील माहिती अधिकाराचे अर्ज देखील जाणून घ्या.