ग्रामपंचायत कार्यालया कडून माहिती विचारणारा अर्ज नमुना : Gram Panchayat arj Namuna in Marathi
मित्रांनो, आपणही आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाला खालील प्रकारे अर्ज करून माहिती विचारू शकता..
- लोकसेवक तथा ग्रामसेवक
- लोकप्रतिनिधी तथा सरपंच
- ग्रामपंचायत कार्याल......
- तालुका ------ जिल्हा ---
- अर्जदार :
- विषय: खालील मुद्द्याची अंमलबजावणी करणे.
- संदर्भ: दिनांक : : खालीलप्रमाणे माहिती देणे
- महोदय / महोदया,
- 1) लेखा परीक्षण अहवाल व लेखा शंक
- २) गावा संबंधित असणारे लोकसेवक उदा. कृषी सहायक, आरोग्य विभाग, महावितरण, इतर हजर पाहिजे
- ३) मागील तीन चार किंवा पाच वर्षा पूर्वी घरभाळा व पाणी पट्टी थकित यादी तसेच ही वसुली बाबत आपण घेतलेला निर्णय
- ४) गावातील स्टिट लाईट पोल बाबत
- ५) ग्रामपंचायत स्तरावर असणाऱ्या सर्व समिती स्थापन बाबत
- ६) जल जीवन योजने बाबत काही शंका
- ७) ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक उपकरणे,अभिलेख फार्म
- ८) दर सोमवारी 3/5 या वेळेत अभिलेख खुला करणे
- ९) मासिक मिंटग मध्ये गावातील लोकांना सहभागी करण्यासाठी सर्व माध्यमातून उदा नोटीस बोर्डावर व्हाट्सअप ग्रुप किंवा इतर माध्यमातून प्रचार आणि प्रसार
- १०) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 ख ची प्रकरणे अमंलबजावणी करणे
- ११) 15% व 5% निधी जमा खर्चाचा बाबत
- १२) दर महिन्याला होणाऱ्या मासिक मिटग मधील उदा ठराव प्रोसिड जमा खर्चाचा तपशील व्हाट्सअप नोटीस बोडीवर प्रसिद्ध करणे.
- १३ ) ग्रामपंचायत ची चालू असलेले कामे, आणि थकीत असलेले कामाची माहिती प्रसिद्ध करणे.
- १४ ) दर ५ वर्षांनी विभागाकडून ग्रामपंचायत ची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचे पद आणि त्यांचे नावे प्रसिद्ध करणे.
- १५ ) आमदार कडून गावासाठी निधी देण्यात आलेली माहिती ( सन वर्ष दिनांक सह ) प्रसिद्ध करणे.
- १६ ) खासदार कडून गावासाठी निधी देण्यात आलेली माहिती ( सन वर्ष दिनांक सह ) प्रसिद्ध करणे.
- १७ ) ठक्करबाप्पा योजना मधून गावाचा विकास कामासाठी केलेल्या कामाची माहिती प्रसिद्ध करणे.
- १८ ) चालू वर्षात शासकीय योजना चा लाभ कोणाकोणाला देण्यात आले आहे. त्याची यादी प्रसिद्ध करणे.
- १९) ग्रामपंचायत मधील शिपाई ५ वर्षात ग्रामपंचायत मधील लोकांकडून म्हणजे कोणाकोणाकडून पैसे मांगीतले आणि कशा साठी मांगीतले त्याची यादी आणि मोबाईल नंबर प्रसिद्ध करणे.
- २० ) ग्रामपंचायत मधील क्लार्क ५ वर्षात ग्रामपंचायत मधील लोकांकडून म्हणजे कोणाकोणाकडून पैसे मांगीतले आणि कशा साठी मांगीतले त्याची यादी आणि मोबाईल नंबर प्रसिद्ध करणे.
- २१ ) ग्रामपंचायत मधील कॉम्पुटर ओपेरेटोर ५ वर्षात ग्रामपंचायत मधील लोकांकडून म्हणजे कोणाकोणाकडून पैसे मांगीतले आणि कशा साठी मांगीतले त्याची यादी आणि मोबाईल नंबर प्रसिद्ध करणे.
- २२ ) ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक ५ वर्षात ग्रामपंचायत मधील लोकांकडून म्हणजे कोणाकोणाकडून पैसे मांगीतले आणि कशा साठी मांगीतले त्याची यादी आणि मोबाईल नंबरप्रसिद्ध करणे.
- २३ ) ग्रामपंचायत मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दररोज अंगणवाडी चालू करत असेल. तर त्याची हजेरी पुस्तक मिळावे. किंवा सादर करावे. प्रसिद्ध करणे.
तसेच इतर गावा संबंधित लोकसेवक यांना गाव मिंटग च्या वेळी सुचना करण्यात यावी तसेच संबंधित कर्मचारी ना नोटीस दवारे उपस्थित राहण्यासाठी सांगावे जर वरिष्ठ नोटीस देऊन उपस्थित न राहिल्यास संबंधित विभागातील अधिकारी यांना ग्रामपंचायत स्तरावर त्या कर्मचारी यांच्या तक्रार करण्यात यावी
तरी आपणास विनंती आहे की वरील सर्व मुद्द्यांची. अंमलबजावणी न केल्यास आपण ही कामात कसूर केली आहे म्हणून आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल वरील विषय है समाज हिताचे असून कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत नाहीत.
You have to wait 59 seconds.
तरी आपणास विनंती आहे की वरील सर्व मुद्द्यांची. अंमलबजावणी न केल्यास आपण ही कामात कसूर केली आहे म्हणून आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल वरील विषय है समाज हिताचे असून कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत नाहीत.
- कळावे
- ग्रामस्थ तथा तक्रारदार
ग्रामपंचायत कार्यालयाला माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?
वरील २३ मुद्दे चा प्रथम एक अर्ज करा. कारण कि माहिती अधिकार अर्ज अधिनियम नुसार 150 शब्दांत माहिती मांगू शकता. या साठी आम्ही नमुना अर्ज दिलेला आहे. म्हणजे एक साधा तक्रार अर्ज करावा, त्यानंतर एकवीस दिवसांत त्या तक्रार अर्जाचे काही प्रति उत्तर न मिळाल्यास त्या नंतर आपण दिलेल्या तक्रार अर्जाचे माहीती अधिकाराचा अर्ज करावा, आणि विचारावे आम्ही दिलेल्या तक्रार अर्जाचे काय निराकरण केले, माहिती न देण्याचे काही करणे देण्यात यावे. असा ग्रामपंचायत कार्यालया कडे माहिती अधिकार अर्ज करावा.
Click Here Pdf Download...
निष्कर्ष
ग्रामपंचायत कार्यालया कडून माहिती विचारणारा अर्ज नमुना कसा करावा याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Gram Panchayat arj Namuna in Marathi 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. माहिती विचारणारा अर्ज चा Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल.