तलाठ्याचे कर्तव्य क्र.५७ नुसार तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी मुक्कामास वास्तव्य करुन राहिले पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील १५ टक्के तलाठी तालुका किंवा मोठया शहरात मुक्कामास राहतात. कायद्याचा त्यांचावर धाक राहिलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भ्रष्ट साखळी त्यांना सांभाळून घेते. परंतु त्यामुळे शेतकरी व सामान्य जनता यांचे बेहाल होतात. जागरूक नागरिक व कार्यकर्त्यांनी कायदा समजावून घेऊन सामुहिक दबावगट निर्माण करून तलाठी तात्यांना जबाबदारीने कर्तव्ये पार पाडाण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तलाठ्यांची कर्तव्ये आणि कार्यपद्धती : How does the Talathi office Work? Complete information?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम २६६ नियम पुस्तिका खंड चार भाग एक मध्ये तलाठ्यांची कर्त्यव्ये आणि कार्यपद्धती शासनाने आखून दिलेली आहे. तलाठी हा सामान्य गावकरी आणि शासन यांच्यातील महत्तपूर्ण दुवा असून चूकीचे काम करणाऱ्या तलाठ्यांला चाप लावा व चांगले कार्य करणाऱ्या तलाठ्यांना प्रोत्साहन द्या. तलाठ्यांने या नियमावली प्रमाणे काम करणे बंधनकारक आहे. कार्यकर्त्यांनी हे नियम काळजीपूर्वक अभ्यासावेत आणि ही ६५ कर्तव्ये तलाठी आखून दिलेल्या नियम व पद्धतीने पार पाडतो की नाही याची पडताळणी करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वारंवार व भरपूर उपयोग करावा. ही ६५ कर्तव्ये तलाठी पुढील प्रमाणे आहेत.- १. ऑगस्ट रोजी नवीन महसूली वर्षांस प्रारंभ होण्याच्या सुमारास तलाठधाने ज्या ठेवावयाच्या असतात अशा सर्व नोंद त्याने उघडून, पृष्ठांकित कराव्यात व त्या सर्व वह्या किमान एक पंधरवडा आधी तहसिलदाराकडे पाठवून १ ऑगस्ट पूर्वी तहसिलदाराकडून स्वाक्षरित करवून घ्याव्यात
- २. वार्षिक प्रशासनिक अहवालाच्या संकलनासाठी आवश्यक असलेली माहिती जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख, यांच्याकडे तलाठ्याने १ ऑगस्ट नंतर लगेच पाठवावी. त्या माहितीबरोबरच ज्यांची माजमापे घ्यावयाची आहे अशा नवीन हिश्श्यांचे विवरणपत्रही, त्यांची मोजमापे घेण्याची व्यवस्था करण्यासाठी तहसिलदाराकडे सादर करावे.
- ३. तलाठ्याने त्याचवेळी किंवा त्यानंतर ताबडतोब, हंगामाच्या स्वरूपावर लक्ष ठेवावे आणि साप्ताहिक पर्जन्य आणि पिकाची स्थिती यांचे अहवाल तहसिलदारांना सादर करून त्यांच्या प्रती मंडळ निरीक्षकाकडे पाठवाव्या आणि अशा प्रकारे आपत्ती येण्याचा संभव असल्यास तिच्यासंबंधी अहवाल देण्यास तयार रहावे.
- ४. तलाठ्धाने त्याचवेळी खरीप पीकक आणि कुळवहिवाट व सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करावा आणि १५ ऑक्टोबरपर्यंत ते पूर्ण करावे.
- ५. त्यानंतर तलाठ्धाने रब्बी पीक आणि कुळवहिवाट व सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणांस प्रारंभ करून ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे
- ६. तलाठ्धाने मंडळ निरीक्षकास पिकाची आणेवारी तयार करण्यास व आवश्यक तितके पीक कापणी प्रयोग करण्यास मदत करावी.
- ७. तलाठ्याने ५ डिसेंबरपर्यंत किंवा पिकांच्या परिस्थितीनमसार त्याच्या आधी, चालू वर्षीच्या जमीन महसूलाच्या तसेच मागील वर्षाच्या तहकूब जमीन महसूलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकारयाच्या आदेशांना सर्वत्र प्रसिध्दी द्यावी.
- ८. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस तलाठ्याने आदेश मिळवावे. गाव नमुना ८ अ अद्यावत करावा आणि गाव नमुना ८ व चा मागणी संबंधीचा भाग जमीन महसूल वसुलीस प्रारंभ करण्यासाठी तयार ठेवावा.
- ९. जिल्हाधिकारयांना नियमान्वेय विहीत केलेल्या दिनांकाना तलाठ्चाने जमीन महसूल वसूल करावा.
- १०. त्या वर्षामध्ये वसुलीसाठी नियत असलेला सर्व जमीन महसूल त्या वर्षाच्या ३१ जुलैपूर्वी वसुल केला पाहिजे. आणि कोणतीही अनधिकृत थकबाकी वसुल केल्याशिवाय राहू देता कामा नेय, यागोष्टी तलाठ्याने लक्षात ठेवाव्या.
- ११. शासनाच्या वतीने त्याला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल तलाठ्यांने पावती दिली पाहिजे. पावती देण्यात तलाठ्याने कसूर केल्यास मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पटीपेक्षा अधिक नसेल इतक्या दंडास तो पात्र राहील. पहा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ७७ त्याच्याकडे असलेल्या पावती पुस्तकांचा हिशोब दर्शविणारी नोंद वही तयाने ठेवावी.
- १२. तलाठ्याने एक रोकड वही ठेवावी आणि तिच्यामध्ये त्याला मिळालेले सर्व पैसे आणि १५ दिवसाच्या आंत कोषागारात जमा केलेले पैसे हे दर्शवावे. कोणत्याही वेळी रू १००० पेक्षा अधिक रक्कम त्याने आपल्या हाताने शिल्लक ठेवू नये
- १३. तलाठ्याने वसूल केलेला जमीन महसूल ज्या चलनाखाली शासकीय कोषागारता जमा केला असेल त्या चलनामध्येच त्याने जमीन महसुलाच्या वसुलीच्या प्रगतीचा अहवाल तहसिलदाराला द्यावा.
- १४ तलाठ्याने वर्षातील सर्व येणे रकमांची वसुली झाल्याबरोबर त्याचे सर्व महसुली लेख परीक्षेसाठी (जमाबंदीसाठी) तहसिलदाराला सादर करावे. यामध्ये ३१ मे पर्यंत सादर करावयाच्या गाव नमुना अकाराच्या गोषावार्याचा देखील समावेश होतो.
- १५. तलाठ्धाने ठेवलेले वर्षांचे लेखे बरोबर आणि आवश्यक तेथे तालुका लेख्यांशी जुळणारे आहेत हे तहसिलदाराचे समाधान होईल अशा प्रकारे सिध्द करावे
- १६. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला दुसरा कोणताही कायदा यांच्या अन्वये विहित केल्याप्रमाणे किंवा राज्य शासनाच्या आदेशानुसार किंवा राज्य शासन आणि आयुक्त यांच्या सर्वसाधारण आदेशांच्या आधिन राहून जिल्हाधिकारयाने निश्चित केल्याप्रमाणे सर्व महसुली लेख आणि रोकड वहधा. कार्यभार अहवाल आणि इतर अभिलेख तलाठधाने ठेवावे.
- १७. जमीन महसुलाच्या थकबाकीची आणि जमीन महसुलीची चकबाकी म्हणून वसुलीयोग्य असलेल्या सर्व रकमांची वसुली आणि माझे तेच खरे म्हणू नका, जे खरे तेच माझे असे म्हणा. अधिकार अभिलेख ठेवणे यासाठी तलाठी जबाबदार राहील आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला कोणताही कायदा किंवा राज्या शसनाचे आदेश यांमध्ये तरतूद केलेली अशी सर्व कर्तव्ये आणि कार्ये तो पार पाडील.
- १८. तालुक्याच्या वरिष्ठ महसूल किंवा पोलीस अधिकाराने तसे करण्यास सांगितल्यावर, नोटिसा, आणि फौजदारी बाबीमधील तपासाचे अहवाल, जबाऱ्या आणि तपासण्या यासारखे केंद्र किंवा राज्याशासन किंवा जनता यांच्या उपयोगासाठी आवश्यक असलेले गावाच्या संबंधातील सर्व लेख तलाठ्चाने तयार करावे.
- १९. तलाठ्याने जमिनीच्या वापरामधील बदलाचा दिनांक अधिनियमाच्या कलम ४४ च्या पोट कलम (४) अन्वेय त्याला माहिती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अकृषिक परवानगीदेणाऱ्या किंवा ज्याने दिली आहे असे मानण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यारा कळवावा.
- २० (अ) गावाची सीमा चिन्हे नष्ट किंवा भूमापन चिन्हे नष्ट करण्यास किंवा त्यामध्ये अनधिकृत फेरफार करण्यास प्रतिबंध करण्याचा तलाठ्याने प्रयत्न करावा
- (ब) तथापि गावाची सीमा चिन्हे किवा सीमा भूमापन चिन्हे नष्ट केल्याचे किंवा त्यांमध्ये अनधिकृत फेरफार केल्याचे तलाठ्धाच्या निदर्शनास आल्यावर यासंबंधातील नियमानुसार एक पंधरवड्याच्या आत ती पूर्ववत करण्याबद्दल किंवा दुरूस्त करण्याबद्दल त्याने जमीनधारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.
- (क) वरील नोटीसीनुसार जमीनधारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.
- (ड) त्यानंतर मंडल निरीक्षकाने ती चिन्हे त्यापुढील एका आठवडद्याच्या कालावधीच्या आत पूर्ववत किंवा दुरूस्त करून न घेतल्यास, तहसिलदाराने ती शासनाच्या खर्चाने पूर्ववत किंवा दुरूस्त करून घेण्याची व्यवस्था करावी आणि असा खर्च जमीन महसुल अधिनियमाच्या कलम १४९ खाली अधिकार संपादनाबद्दलचे मौखिक किंवा लेखी प्रतिवेदन मिळाल्याबद्दल तलाठ्याने संबंधित व्यक्तीला ताबडतोब लेखी पोच द्यावी.
- २२. तलाठ्धाने अशाप्रकारे त्याला मिळालेल्या प्रत्येक प्रतिवेदनाची फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद करावी. २३. अधिनियमाच्या कलम १५४ खालील नोंद करणाऱ्या अधिकऱ्याने किंवा कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने कळवलेले संपादन किंवा हस्तांतरण याची तलाठ्याने फेरफार नोंदवहीतमध्ये तशाच प्रकारे नोंद करावी
- २४. तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या ज्या वेळी नोंद करील त्या वेळी तत्काळ त्याने नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावावी अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवही यावरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव आहे असे आढळेल अशा सर्व व्यक्तींना, त्याचप्रमाणे त्या फेरफेरामध्ये ज्याच्या हितसंबंध असेल असे मानण्यास त्याला कारण दिसेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला त्याने लेखी कळवावे. त्या पेन्सिलीने लिहावा, आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही असा शेरा त्याने लिहावा.
- २५. फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या कोणत्याही नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यास आल्यास त्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद करावी. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तील आक्षेप मिळाल्याबद्दलची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब द्यावी.
- २६. (अ) नोंद प्रमाणित करण्यास समक्ष असलेल्या अव्वल कारकून किंवा मंडळ निरीक्षक यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा अधिकाऱ्याने फेरफार नोंदवहीमधील नोंद प्रमाणित केल्यावर तलाठ्याने ती अधिकार अभिलखामध्ये शाईने अभिलिखित करावी.
- (ब) सक्ष्म प्राधिकाऱ्याने फेरफार नोंदवहीमधील नोंद रद्द केलेली असल्यास तलाठ्याने अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकवी.
- २७. तलाठ्याने फेरफार नोंदवहीमधील प्रमाणित नोंदीनुसार संबंधित गाव नमूने आणि त्यांचे गोषवारे हे देखील दुरूस्त करून घ्यावेत. त्याचप्रकारे त्याने आवश्यक तथे गाव नकाशामध्ये पेन्सिलीने दुरूस्ती करावी. मंडळ निरीक्षकाने आवश्यक असल्यास, तपासणीनंतर ती शाईने करावी.
- २८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ५१ च्या पोट-कलम १ अन्वेय केलेल्या मागणीप्रमाणे पुरविलेल्या माहितीची किंवा सादर केलेल्या कागदपत्रांची लेखी पोच तलाठ्याने माहिती पुरविणाऱ्या किंवा कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब द्यावी आणि असे कागदपत्र सादर केल्याचे त्यावर लिहून ते सादर केल्याचा दिनांक नमूद करणारी नोंद आपल्या सहीनिशी पृष्ठांकित करावी आणि आवश्यक असल्यास त्या कागदपत्राची एक प्रत ठेवून घेऊन ते ताबडतोब परत करावे.
- २९. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे देणे आणि ठेवणे) नियक, १९७१ अनुसार तलाठ्याने अधिकार अभिलेख तयार करावे व ठेवावे.
- ३०. (अ) शेतजमीन धारकाकडून किंवा जमिनीचा महसूल देण्यास आद्यातरू पात्र असलेल्या कुळाकडून लेखी अर्ज मिळाल्यावर तलाठ्याने अशा जमिनीसंबंधीच्या अधिकार अभिलेखाची प्रत असलेली एक पुस्तिका (खाते पुस्तिका) त्याला द्यावी
- (ब) जमिनीच्या महसूलाच्या आणि धारकाकडून किंवा यथास्थिती कुळाकडून येणे इतर शासकीय रकमांच्या प्रदानासंबंधीची माहिती आणि तसेच त्याच्या जमिनीची मशागत आणि गाव लेख्यात दर्शविल्याप्रमाणे पेरणी केलेल्या पिकांची क्षेत्रे या संबंधीची माहिती आणि विहित करण्यात आलेली किंवा यानंतर विहित करण्यात येईल अशी इतर माहिती तलाठ्धाने ही पुस्तिकेमध्ये दर्शवावी
- (क) महाराष्ट्र जमीन महसूल खाते पुस्तिका (तयार करणे देणे आणि ठेवणे) नियम १९७१ या नावाच्या नियमानुसार तलाठ्याने ही पुस्तिका तयार करावी. द्यावी आणि ठेवावी.
- ३१. तलाठ्याने त्याच्याकडे चावडीमध्ये प्रसिध्द करण्यासाठी म्हणून पाठवलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश विहित केलेल्या पद्धतीने प्रसिध्द करावे.
- ३२. तलाठधाकडे दवंडी पिटवून जाहीर करण्याचे आदेश देऊन पाठवण्यात आलेल्या सर्व नोटीसा किंवा आदेश त्याने दवंडी पिटवून देखील जाहीर करावे
- ३३. तलाठ्याने पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा भूमापन चिन्हे यांचे निरीक्षण प्रत्येक शेताची त्याच जागी, तेथे त्यावेळी उपस्थित असतील असे गावकरी, ग्रामपंचायतीचे सभासद आणि सरपंच असल्यास यांच्या उपस्थितीत, प्रत्यक्ष पडताळणी करावी
- ३४. कलम १४९ अन्वेय आवश्यक असलेली सूचना विहित कालावधीमध्ये पाठवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा अधिनियमाच्या कलम १५१ अन्वेय आवश्यक असलेली माहिती पुरवण्यात किंवा कागदपत्र सादर करण्यात कसूर करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या नावाची तलाठ्याने विलंब शुल्क नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी आणि नोंदवही प्रमाणन अधिकाऱ्याच्या आदेशार्थ पुस्तुत करावी.
- ३५. संबंधित कुळवहिवाट कायदा, आणि मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ याच्या तरतूदींचे उल्लंघन करून झालेल्या व्यवहारासंबंधीचे प्रतिवेदन तलाठ्याने तहसिलदाराकडे पाठवावे.
- ३६. तलाठचाने जमिनीच्या सर्व तुकड्यांची फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करावी आणि अधिकार अभिलेख ठेवण्यासंबंधीच्या नियमांनुसार द्यावयाच्या प प्रसिद्ध करावयाच्या नोटिसांशिवाय एकत्रीकरण अधिनियमान्वेय विहित नमुन्यातील नोटिसा संबंधित व्यक्तींना पाठवाव्या.
- ३७ तलाठ्चाने वारसा प्रकरणांची नोंदवही विहित नमुन्यात ठेवावी व वारसा संबंधीच्या नोंदी करतांना हिंदु उत्तराधिकारी अधिनियमातील अधिनियमातील उपलब्ध आणि वारसांचे चार प्रकार व हिंदू विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्याससंबंधीचा अधिनियम आणि मुसलमान जमात आणि इतर जमात यासंबंधीचे कायदे लक्षात ठेवावे.
- ३८ तलाठ्चाने गहाळ दुव्यांची प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५१ मधील उपबंधांचा अवलंब करून आणि भूमापन अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त करून निकालात काढावी.
- ३९ तलाठ्याने त्याच्या सड्यातील गावांमध्ये घडणाऱ्या पूर, आग, धुके, गारपीट, टोळयाड, माणसांचे किंवा गुराचे साथीचे रोग, पिकेबडणे इत्यादीसारख्या नैसर्गिक आणि इतर आपलींचा अहवाल मंडल निरीक्षकाकडे आणि तहसिलदाराकडे पाठवावा
- ४० तलाठ्धाने मुंबई कृषि उपद्रवी कीड आणि रोग अधिनियम, १९४७ अन्वेय कोणत्याही गावात कोणतेही किटक, उपद्रवी कीट, इत्यादींच्या प्रादुर्भावासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवावा.
- ४१ जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने एकाधिकार प्रापणाच्या शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शेतकरी सूची पत्रकेतयार करावी व ठेवावी.
- ४२. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने गावातील शिधा पत्रिकांची सूची तयार करावी
- ४३. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्ह, तलाठ्थाने शेतकऱ्यांकडून साठ्यांसंबंधी प्रतिज्ञापत्र मिळवावी.
- ४४. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, जमिनधारक आपल्या धान्याची विक्री शासकिय आदेशानुसार एकाधिकार खरेदी योजनेखाली करतील अशी व्यवस्था तलाठश्चाने करावी.
- ४५. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने गावकऱ्यांना शिधापत्रिका द्याव्या.
- ४६. जिल्हा धिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्धाने लेव्ही नोंदवही ठेवावीव खातेदांना मागणी नोटीसा पाठवाव्या.
- ४७. जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा, तलाठ्याने दुर्गम प्रदेशातील नागरी पुरवठ्याच्या पावसाळी केंद्राचा गादामपाल म्हणून काम करावे.
- ४८ तलाठ्धाने सर्व विभागांच्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या जमीनदारांच्या पतदारीसंबंधी अहवाल सादर करावा.
- ५०. तलाठ्याने निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या निवाडणूकविषयक कर्तव्यांमध्ये मदत करावी.
- ५१. गावांमध्ये अल्प बचत कार्यक्रम आयोजित करण्यात अल्प बचत अधिकाऱ्यांना तलाठ्याने मदत करावी
- ५२. गावांमधील अल्प बचत योजनेत पैसे गुंतवणारांच्या नावांच्या नोंदवह्या ठेवाव्या.
- ५३. ग्रामीण ऋणपत्रांची कर्जरोख तलाठ्याने करावी,
- ५४. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दारूबंदी सप्ताह, हरिजन सप्ताह, वनमहोत्सव, इत्यादी साजरे करण्यास मदत करावी.
- ५५. राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सूचना मिळल्यावर किंवा अराजपत्रित अधिकाऱ्यांना बाबतीत तहसिलदाराकडून सूचना मिळाल्यावर तलाठ्थाने निरनिराळया शाससिक विभागांच्या निरनिराळ्या शासकिय अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित राहावे व त्यांना हवी असलेली कोणतीही माहिती पुरवावी
- ५६. सर्व भूमापन कामे चालू असताना भूमापन अधिकाऱ्यांना तलाठ्याने आवश्यक ते सहाय्य द्यावे
- ५७. तलाठधाने आपल्या सझ्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी ठरवून देईल अशा इतर कोणत्याही ठिकाणी राहावेय इतरत्र कोठेही राहू नेय
- ५८. तलाठ्याने आपल्या सझ्याच्या तपासणी आणि शेरे वध्वा अनुदेश देण्यासाठी, वरिष्ठ महसूल आणि भूमापन अधिकारी यांनी मागणी केल्यावर ती त्यांना सादर करावी,
- ५९ तलाठ्चाने एक भेटनोंद पुस्तक ठेवावे आणि ते भेट देणाऱ्या प्रत्येक महसूल आणि भूमापन आधिकाऱ्यासमोर पृष्ठांकन आणि असल्यास शेरा यासाठी सादर करावे.
- ६० तलाठ्धाने त्याच्या ताब्यातील ग्राम अभिलेखांच्या प्रति किंवा त्यांचे उतारे, त्यांकरिता अर्ज करणाऱ्या हितसंबंधित व्यक्तींना, अर्ज मिळाल्यापासून २४ तासांच्या आत, नक्कल शुल्क घेऊन द्यावे. आणि अशा रितीने वसूल केलेल्या शुल्काचा हिशोब ठेवावा.
- ६१. तलाठ्याने तगार्ड आणि इतर सर्व शासकिय येणी यांचे लेख त्याकरीता विहित केलेल्या नमुन्यात ठेवावे .
- ६२. ज्या प्रयोजनार्थ तगाई कर्जे देण्यात आली असतील त्याकरिताच जहाज पाण्यात चालते पण जहाजात पाणी चालत नाही. ती वापरण्यात येतात. किवा कसे ते ते तलाठ्याने तपासावे आणि कोणताही गैरवापर त्याच्या निदर्शनास आल्यास त्यासंबंधी तहसीलदाराकडे अहवाल पाठवावा.
- ६३ तलाठ्धाने आपल्या ताब्यातीन सर्व शासकीय मालमत्तांची नोंदवही ठेवावी. आणि तपासणी व सहीसाठी ती निरीक्षण अधिकाऱ्याला सादर करावी.
- ६४. तलाठ्याने पोष्टाच्या सरकारी तिकिटांची नोंदवही विहित केलेल्या नमुन्यात ठेवावी.
- ६५ त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायदा किंवा नियम किंवा शासनाने वेळोवेळी काढलेले सर्वसाधारण किंवा विशेष आदेश, किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले कोणतेही निदेश या अन्वये विहित केलेली सर्व कर्तव्ये तलाठ्धाने पार पाडली पाहिजेत.
गावनमूना म्हणजे काय ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वेय प्रत्येक गावतील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. त्यात मुख्यत्वे तलाठी दप्तर नमुना नंबर १ ते २१ गाव नमुन्यांमध्ये विविध विषयांच्या नोंदवह्या असतात. कोणत्या गाव नमुना नंबर मध्ये कोणती माहिती असते हे जागरुक नागरिक म्हणून आपणास माहित असायलाच पाहिजे.तलाठी दप्तर नमुना नंबर १ ते २१
- गाव नमुना नंबर १ : या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकरबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमीनीचे गट नंबर, सहे नंबर दर्शविलेले असतात, व जामिनीचा आकार (असेसमेंट) बाबतती माहिती असते.
- गाव नमुना नंबर -१ अ : या नोंदवहीमध्ये वन जमीनीची माहीती मिळते. गावातील वन विभागतील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
- गाव नमुना नंबर - १ ब : या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमीनीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - १ कं : या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायदयानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबारा उतान्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरवित्ता येते.
- गाव नमुना नंबर -१ ड : या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी त्यांचे सर्वहे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर -१ इ : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहीती मिळते
- गाव नमुना नंबर २ : या नोंदवहीमध्ये गावतील सर्व बिनशेती (अवृषिक) जमिनींची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर ३ : या नोंदवहीमध्ये दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीचा नोंद पाहता येते.
- गाव नमुना नंबर ४ : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर ५ : या नोंदवहीमध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर ६ : (हक्काचे पत्रक फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
- गाव नमुना नंचर - ६ : अ या नोंदवहीमध्ये फेरफार (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - ६ - क : या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर - ६ - ड : या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर ७ : (सात बारा उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्वेह नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर - ७ अ : या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - ८ अ : वा नोंदवहीत जमीनीची नोंद, सर्वहे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - ८ ब, क व ड : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसूलीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर ९ अ : या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर - १० : या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर ११ : या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्वेहे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर - १२ व १५ : वा नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - १३ : या नोंदवहीमध्ये गावाची लोखसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर १४ : या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर १६ : या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर - १७ : या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी वाचाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर १८ : या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
- गाव नमुना नंबर १९ : या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
- गाव नमुना नंबर - २० : पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते
- गाव नमुना नंबर २१ : या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
- अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणी केल्यास मिळू शकते.
जे जे नसे ललाटी, ते ते लिखे तलाठी !
शासन अणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे तलाठी होय, स्थानिक पातळीवरील तो शासनाचा प्रतिनिधी असतो. तुम्ही देशातील कोणत्याही खेड्यात जा, आणि तेथील शेतकऱ्यांना तुमचा गावाचा तलाठी चांगले काम करतो का? हा प्रश्न विचारा शेतकरी जी प्रतिक्रिया देतील ती पाहून तुम्ही हैराण व्हाल। कारण अगदीच अपवाद वगळता तलाठी हा भ्रष्ट, बेजबाबदार आणि बेबंदपणे वागणरा व्यक्ती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असतो. कारण शासकीय वेळेप्रमाणे तलाठी हे तलाठी सज्जा त्यांच्या गावातील कार्यालयात अपवाद वगळता कधीच हजर नसतात.तलाठी सज्जा सोडून जाताना ते कोणत्या शासकीय कामासाठी कोठे जात आहेत. आणि केव्हा परत सज्जावर येणार आहेत याची नियमाप्रमाणे हालचाल रजिस्टरला नोद कधीच करीत नाहीत. सात बारा, फेरफार नोंदी, पीक नोंदी घेताना देताना उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्रासाठी पडताळणी करताना तलाठी शेतकऱ्यांना व सामान्य माणसांना खूपच सतावतात, विलंब लावतात. पिक नुकासानीचे किंवा इतर सरकारी मदत वा अनुदान मिळण्यासाठी पंचनामा करताना ते गरीब शेतकऱ्यांनी जर लाच दिली नाही तर चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवतात.
तलाठी हा गावातील रेशन दुकान दक्षता समितीचा सचिव असतो. गावातील सर्व गरीबांना रेशन व तेल वेळेवर व त्यांच्या हक्कानुसार मिळते की नाही याची दक्षता तलाठी कधीच घेत नाहीत. वाढत्या नागरीकरणामुळे जमीनीला किंमत येत असल्याने तलाठी हे जमीनी लाटून खोटे फेरफार व सातबारा बनवून गरीब शेतकऱ्यांना रस्त्यावर आणतात अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच वाचतो ऐकतो. म्हणून तर जे नसे ललाटी ते ते लिखे तलाठी अशी म्हण ग्रामीण भागात पडली आहे.
भारतीय संविधानानुसार तलाठी हा गावाचा लोक सेवक आहे. जमीन महसूल अधिनयमानसार तलाठयाला एकूण ६५ कर्तव्ये सांगीतली असून तलाठी हे कर्त्यव्बे पार पाडतात का हे माहिती अधिकारात सतत विचारून तलाठ्यांना कार्यप्रवण करणे हे जागरूक नागरिकांची जबाबदारी ठरते. तलाठयाचे कर्तव्य क्र. ५७ नुसार तलाठ्याने सज्जाच्या ठिकाणी मुक्कामास वास्तव्य करून राहिले पाहिजे. परंतु महाराष्ट्रातील ९५ टक्के तलाठी तालुका किंवा मोठया शहरात मुक्कामास राहतात.
कायद्याचा त्यांचावर बाक राहिलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भ्रष्ट साखळी त्यांना सांभाळून घेते. परंतु त्यामुळे शेतकरी व सामान्य जनता यांचे बेहाल होतात. जागरूक नागरिक व कार्यकत्यांनी कायदा समजावून घेऊन सामुहिक दबावगट निर्माण करून तलाठी तात्यांना जबाबदारीने कर्तव्ये पार पाडाण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी माहिती अधिकार कायदा २०१५, दप्तर दिरंगाईचा कायदा तसेच लोकसेवा हमी कायदा २०१५चा सुयोग्य वापर करावा.
तलाठी कामकाज | Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे | You Tube द्वारे माहिती वाचा.
माहिती अधिकार कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी तलाठ्याची माहिती मागविण्यासाठी हा पथदर्शक नमूना : How does the Talathi office Work? Complete information?
केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५-कलम ३ अन्वये अर्ज ( जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
- प्रति,
- जनमाहिती अधिकारी
- द्वारा तलाठी
- तलाठी सज्जा ता.---- जि.-----
१) अर्जदाराचे पूर्ण नाव:
२) पत्रव्यवहाराचा पत्ता:
३ ) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील (विषय व कालावधी)
तलाठी सज्जा ------------- येथून खालील प्रमाणे दिलेल्या कालावधीतील माहिती मिळणे.
२) पत्रव्यवहाराचा पत्ता:
३ ) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील (विषय व कालावधी)
तलाठी सज्जा ------------- येथून खालील प्रमाणे दिलेल्या कालावधीतील माहिती मिळणे.
- अ) तलाठी सज्जा -------- येथील तलाठी यांची या महिन्यातील हालचाल नोंदवही (तलाठयाने शासकीय कामकाजासाठी सज्जातून बाहेर पडताना नोंद करून ठेवलेल्या व परत आल्यावर आल्याची नोंद केलेल्या रजिस्टर / नोंदवही ) ची झेरॉक्स प्रत द्यावी.
- ब) तलाठी सज्जा ----- यांच्याकडे असलेल्या गाव नमूना आठ ड (तलाठयाने वसूल केलेल्या सरकारी रकमा व इतर रकमांची नोंदवही) ची -------ते ----------या कालावधीतील नोंदीची झेरॉक्स प्रत द्यावी.
- क) तलाठी सज्जा - यांच्याकडे असलेल्या गाव नमुना सहा (फेरफारांची नोंदवहीची) -------------- ते ---------- या कालावधीमधील नोंदवहीची डोरॉक्स प्रत द्यावी.
- ड) तलाठी सज्जा यांच्याकडे असलेल्या गाव नमुना २१ (मंडल अधिकारी यांनी भेटी दिलेल्या व शेरे नोंदवलेली मासिक दैनंदिनी) ची ------ ते ----------या कालावधीतील नोंदीची झेरॉक्स प्रत द्यावी.
- ई) तलाठी सज्जा ---------यांच्या कडे ते---------- कालवधी दरम्यान शासन व नागरिक यांच्याकडून आलेल्या शासकीय कामकाजाची ज्ञापने आदेश पत्रव्यवहार अर्ज आवेदने यांच्या आवक जावक
- नोंदवहीतील नोंदीच्या झेरॉक्स मिळाव्यात.
- ज) ---------- सज्जातील नियुक्त तलाठी हे नियमाप्रमाणे सज्जाच्या ठिकाणी वास्तव्यास राहतात काय ? या सबंधी वरिष्ठांना सादर केलेल्या पत्राची स्थळप्रत मिळावी. घरभाडे भत्ता मिळण्यासाठी पात्रता कागदपत्रा मध्ये वास्तव्यास राहत असलेल्या घराचा पत्ता देण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्राची स्थळप्रत मिळावी.