अंगणवाडी ताई व मदतनीस ताई यांच्या काही अडचणी आहेत काय ? आदि प्रश्नांची उत्तरे जरुर शोधा चार पाच जणाच्या गटाने पूर्वसूचना देऊन अंगणवाडीला भेट द्या. अंगणवाडी नियमानुसार चालते की नाही याची खात्री करून, अंगणवाडी ताईच्या अडचणही समजावून घ्या त्यांना काही मदत व सहकार्य करता आले तर जरूर करा.
अंगणवाडी ताईची कार्यपद्धती व कर्त्यव्ये : complete Information of Anganwadi Sevika in Marathi
अंगणवाडी अर्थात एकात्मिक बाल विकास योजना दिनांक ३ ऑक्टोबर १९७५ पासून सुरू झाली. भावी पिढी सुदृढनिरोगी व बुद्धिमान व्हावी म्हणून व एक सशक्त समाज निर्मितीसाठीया योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहरी ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, मुख्यत्वे बालकांच्या पोषण व आहरविषयक दर्जात सुधारणा व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत असून राज्यात महिला व बाल विकास विभाग ही योजना राबवित आहे.योजनेची उद्दिष्टे :
- १) ० ते ६ वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्यविषयक दर्जात सुधारणा करणे
- २) मुलांच्या मानसिक शाररिक व सामाजिक विकासाचा योग्य असा पाया घालणे
- ३) बालमृत्यूंचे, बालरोगाचे, कुपोषणाचे आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे
- ४) एकात्मिक बाल विकास योजना ला चालना मिळावी म्हणून योग्य अंमलबजावणी केलेली आहे.
- ५) एकात्मिक बाल विकास योजना मधून अंगणवाडीत योग्य पोषण व आहार विषयक बरोबर शिक्षणाद्वारे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयी तसेच गरजांकडे लक्ष पुरविण्याची मातांमध्ये क्षमता वाढविणे होय.
एकात्मिक बाल विकास योजनेमध्ये पुढीलप्रमाणे सेवा दिल्या जातात.
१) पुरक पोषण आहार २) लसीकरण ३) आरोग्य तपासणी ४) संदर्भ सेवा ५) पूर्व प्राथमिक आरोग्य शिक्षण ६) पोषण आणि आरोग्य शिक्षणपुरक पोषण आहार :
ग्रामीण आदिवासी व नागरी क्षेत्रातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील स्तनदा माता, गरोदर स्त्रिया, व बालके यांना गावाच्या अंगणवाडी केंद्रात महिन्यातून किमान २५ दिवस व वर्षातून किमान ३०० दिवस पोषण आहार दिला जातो. ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना ५०० उष्पांक आणि १२ ते १५ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील अतीतीव्र कमी वजनाच्या बालकांना तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ८०० उष्मांक व १८ ते २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. गरोदर खिया व स्तनदा माता यांना ६०० उष्मांक आणि १८ ते २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. याच प्रमाणे आदिवासी क्षेत्रात नवसंजिवन योजना राबविली जाते. यात वाढीव गरम ताजा पुरक पोषण आहार दिला जातो.लसीकरण:
अंगणवाडीतील,स्तनदा माता असो वा लहान बालके असो, गरोदर स्त्रिया असो, यांना लसीकरण करण्यात येतेच. गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांची पहिल्या तिमाहित आरोग्य केंद्रात नोंद केली जाते. तसेच गर्भवतीनी कमीत कमी ३ प्रसूतीपूर्व तपासण्या करणे आवश्यक असते. प्रत्येक भेटीत त्यांचा रक्तदाब तपासणे, वजन करणे, आणि शेवटच्या सहा महिन्यात त्यांचे वजन महिन्याला एक किला वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच बरोबर धनुर्वात प्रतिबंध लसीचे दोन डोस पहिल्या व दुसऱ्या तिमाहित एक महिन्याच्या अंतराने दुसरा डोस दिला जातो. गर्भवतीना ३ महिने रोज एक या प्रमाणे कमीत कमी १०० लोह युक्त गोळ्धा दिल्या जातात. मुलांना बी. सी. जी. वडी.टी.पी.चे तीन डोस, गोवर जीवनसत्व अ बुस्टर डोस व पोलीओ बुस्टर डोस व जीवन सत्व अ चे पाच डोस टप्या टप्याने शास्त्रीय पद्धतीने दिले जातात.आरोग्य तपासणी:-
आरोग्य तपासणी मध्ये 0 ते ६ वर्षे वयो गटातील सर्व बालकांची त्रैमासिक तपासणी केली जाते. तर दर महिन्याला तीव्र आणि कमी वजनाच्या बालकांची तपासणी देखील होते. आवश्यकतेप्रमाणे तापसणी सपूर्ण गर्भावस्थेत चार वेळा करण्यात येते.संदर्भ आरोग्य सेवा :
0 ते ६ वयोगटातील बालकांना, किशोरवयीन मुली, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता या लाभार्थ्यांना संदर्भ आरोग्य सेवा दिल्या जातात. आवश्यकतेनुसार विशेष वैदयकिय परिक्षण व उपचारसाठी लाभार्थ्यांना वैदयकीय आधिकाऱ्यांकडे संदर्भ देऊन पाठविले जातात.अनौपचारिक शिक्षण :
पूर्व शालेय शिक्षणामधून ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या सर्वागिण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. खेळ गोष्टी गाणी बडबडगीते इत्यादीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मुलांचा भाषा, सामाजिक शारीरिक बौद्धिक व भावनिक विकास घडवित असते. अंगणवाडीमध्ये पूर्व शालेय शिक्षण तीन तास दिले जाते.पोषण व आरोग्य शिक्षण:
१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुली व १८ ते ४५ वयोगटातील महिलांच्या मासिक दोन बैठका घेऊन त्यात पोषण आहार व आरोग्य शिक्षण दिले जाते. गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता व तीव्र कुपोषीत बालके यांच्याकडे गृहभेटी देऊन आहार व आरोग्य शिक्षणाबाबत जागरुकता निर्माण केली जाते.
राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत ५५३ प्रकल्प सुरू आहेत. त्यात ३६४ ग्रामीण ८५ आदिवासी व १०४ नागरी वसाहतीमधील झोपडपट्टयामध्ये कार्यान्वित आहेत. योजने अंतर्गत ९५१८१ पेक्षा जास्त अंगणवाड्या व सुमारे दहा हजार मिनी अंगणवाड्यामध्ये ८६.३ । ९१० बालके या योजनेचा लाभ घेत आहे.
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय आप्ल्या गावातील अंगणवाडीची सन २०१४-१५ मधील माहिती मिळणेबाबत.
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (पुढीलप्रमाणे)
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत ५५३ प्रकल्प सुरू आहेत. त्यात ३६४ ग्रामीण ८५ आदिवासी व १०४ नागरी वसाहतीमधील झोपडपट्टयामध्ये कार्यान्वित आहेत. योजने अंतर्गत ९५१८१ पेक्षा जास्त अंगणवाड्या व सुमारे दहा हजार मिनी अंगणवाड्यामध्ये ८६.३ । ९१० बालके या योजनेचा लाभ घेत आहे.
अंगणवाडी तपासणी साठी काही सूचना काही प्रश्न : FAQ
- १) अंगणवाडी ताई व मदतनीस सेविकांचे उपस्थिती नोंदवही
- २) चव रजिस्टर अर्थात आहाराची चव घेऊन अभिप्राय नोदविण्यासाठी नोदंवही
- ३) अंगणवाडीत आहाराचा तक्ता लावला आहे काय ?
- ४) तक्त्यानुसार बालकांना आहार मिळतो काय ?
- ५) बालकांना टीएचआर (टेक होम रेशन अर्थात घरी घेऊन जाण्यासाठीचा दिला जाणारा कच्चा पोषण आहार) मिळतो काय ?
- ६) मुलांना कोणता टीएचआर आवडतो याची नोंद आहे काय ?
- ७) बालकांच्या वजनांची मासिक नोंद ठेवली आहे काय ?
- ८) कमी वजन व तीव्र कमी वजनांच्या बालकांची विशेष नोदं घेऊन त्यांना संदर्भसेवा व जास्तीचा पुरक आहार दिला जात आहे काय ?
- ९) असा जास्तीचा अतिरिक्त आहार केव्हा किती वेळा दिला बाची नोंद आहे काय ?
- १०) अंगणवाडी ताई माता, किशोरी मुली गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांच्यासाठी स्वतंत्र बैठका घेत काय?
- ११) अंगणवाडी ताई बैठकामध्ये आहार लहान बाळांचे कमी वजन असणे, आरोग्य लसीकरण व वैयक्तीक स्वच्छता या बद्दल माहिती सांगते काय ?
- १२) अंगणवाडी ताई गर्भवती स्त्रिया कमी वजनाची बालके यांच्या घरी जावून गृहभेटी देते काय ?
- १३) अंगणवाडीत लसीकरण होते काय ?
- १४) मागील सहा महिन्यात डॉक्टर एकदातरी अंगणवाडीत आले होते काय ?
- १५) अंगणवाडीत जंत अॅनिमिया, ताप या आजारावर औषधे व कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात काय ?
हेही वाचा :
आपल्या गावातील अंगणवाडी अर्थात एकात्मिक बालविकास योजनेच्या विषयी माहिती मागविण्यासाठीचा नमूना अर्ज : complete Information of Anganwadi Sevika in Marathi
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अर्ज (जोडपत्र " अ "नियम ३ नुसार)
- प्रति,
- जनमाहिती अधिकारी - ग्रामपंचायत कार्यालय
- ता....... जि........
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय आप्ल्या गावातील अंगणवाडीची सन २०१४-१५ मधील माहिती मिळणेबाबत.
४) आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील व कालावधी (पुढीलप्रमाणे)
- A) अंगणवाडी ताई व मदतनीस सेविकांचे उपस्थिती नोंदवही
- B) चव रजिस्टर अर्थात आहाराची चव घेऊन अभिप्राय नोदविण्यासाठी नोदंवहीची झेरॉक्स
- C) बालकांच्या वजनांची मासिक नोंद असलेल्या रजिस्टरच्या झेरॉक्स प्रत मिळावी.
- D) अंगणवाडीमध्ये मध्ये २०१५ मध्ये सरकारी स्तरावरून आलेल्या सर्व प्रकारच्या आहाराची व औषधाची
- E) नोंद असलेल्या रजिस्टरच्या झेरॉक्स प्रती मिळाव्यात ) अंगणवाडी ताईनी सन २०१५ मध्ये वरिष्ठांना सादर केलेल्या मासिक अहवलाच्या प्रती ची झेरॉक्स द्याव्यात.
- F) अंगणवाडीतील स्टॉक रजिस्टरची झेरॉक्स मिळावी.
- G) अंगणवाडीत नोंद घेतलेल्या सन २०१४-१५ मधील बालकांची संख्या मिळावी.
- H) सन-२०१४-१५ मध्ये अंगणवाडीच्या लाभार्थी किशोरी, स्तनदा माता व गर्भवती महिला अशा लाभार्थ्यांना कोणते काय लाभ मिळाले यांची नोंदं असणाऱ्या रजिस्टरची झेरॉक्स मिळावी
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)
- ठिकाण :
- दिनांक :
- अर्जदाराची सही
- (नाव)
अंगणवाडी सेविकांची संपूर्ण माहिती you tube Video माध्यमातून