मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2022-23 GR
केंद्र शासनाचे परिपत्रकांनुसार मागेल त्याला विहीर अनुदान योजना दि ४ऑक्टोबर, २०२१ निती आयोगाद्वारे महाराष्ट्रात सध्या १४.९ टक्के कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत. हे विचारात घेऊन भारतातील प्रत्येक राज्यां मधील दारिद्रय संपवणे शक्य होईल म्हणून. महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा अंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान योजना देण्याचा निर्णय घेतला आहे.
काळपरत्वे रोजगार हमी योजना कायदा मध्ये बदल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेला आहे. अलीकडेच वैयक्तिक कामांमध्ये किमान ५० ते ६० टक्के राशी खर्च करण्याचे निर्देश भारत सरकारकडून प्राप्त झाले आहे. अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना अस्तित्वात आणली आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे. सध्याच्या भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून वाढीव म्हणून ३,८७,६०० विहीरी खोदणे शक्य आहे. मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या सख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनाचा शासन निर्णय
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शासन निर्णय दि.१७ डिसेंबर, २०१२ अन्वये सिंचन विहिरींची कामे अनुज्ञेय करण्यात आली होती नंतर. काही शासन निर्णय मध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना दि.२१ ऑगस्ट, २०१४ अन्वये निर्गमित करण्यात आल्या. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासन परिपत्रक दि.२८ ऑगस्ट, २०२० नुसार नवीन सिंचन विहिरींची कामे मंजूर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. सिंचन विहिरींच्या प्रत्यक्ष कार्यवाही करतांना प्रस्तावाबाबत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मंजूरीच्या कार्यवाहीबाबत विविध स्तरावरुन काही अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते हे पाहता. इतर कोणालाही समस्या होऊ नये म्हणून पुन्हा वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊन सिंचन विहरींसदर्भात शासन निर्णय, दि. १७ डिसेंबर, २०१२ व शासन परिपत्रक नुसार दि. २८ ऑगस्ट, २०२० अधिक्रमित केले आणि महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या लोकांना मागेल त्याला विहीर अनुदान योजना देण्याच्या विचार केला आहे.
शासन निर्णय :-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ( मागेल त्याला विहीर ) सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने ( मागेल त्याला विहीर ) सिंचन विहिरी बाबत काही सुधारित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.
सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.
१) शासन निर्णय क्र मग्रारो-२०१२/प्र.क्र.३०/रोहयो-५, दि. १७ डिसेंबर, २०१२
२) शासन परिपत्रक क्र. मग्रारोहयो २०१४/प्र.क्र.४५/मग्रारो-१, दि.२१ ऑगस्ट, २०१४
३) शासन परिपत्रक क मग्रारो २०१८/प्र.क्र. १५५/मग्रारो-१, दि.दि.२८ ऑगस्ट, २०२०
४) शासन निर्णय क्र. मग्रारो २०१६/प्र.क्र.८५/मग्रारो-०१, दि.४ मार्च, २०२१
५) मास्टर अॅन्युअल सर्क्युलर २०२०-२१
६) केंद्र शासनाचे पत्र कDO# J-२१०६०/४/२०१९-RE-VI (३६६८१६), दि ४ऑक्टोबर, २०२१
या योजनेसाठी लाभधारकाची निवड कशी होईल :-
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या लोकांना अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा ( ( मागेल त्याला विहीर ) म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय राहतील.
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- (वन हक्क प्रमाणपत्र धारक ) अधिनियम २००६ (२००७ ) अंतर्गत लाभार्थी
- सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा) एल)
- अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
- लाभधारकाची पात्रता
- लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
( पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) महाराष्ट्र भुजल अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास सरकारने या संधर्भात प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील शहरात किंवा ग्रामीण भागात पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
या योजनेची अटी शर्ते काय आहे?
- दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतर असावे.
- विहीर हि Run off Zone मध्तये असावी
- अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता १५० मीटर अंतर नाही
- या योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी अथवा इतर विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
- लाभधारकाच्या नावावर ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
- लाभधारकाकडे (Online) एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
- एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील
- शेतकरी यांचे जमीनीचे क्षेत्र ०.४१ हेक्टर पेक्षा जास्त असावे.
- लाभार्थ्यां कडे जॉब कार्डधारक असला पाहिजे.
विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती
वैयक्तिक विहीर ( मागेल त्याला विहीर ) इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन भरून ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन संबंधित पंचायत समिती कार्यालयात जमा करावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
- १) ७/१२ चा ऑनलाईन उतारा
- २) ८ अ चा ऑनलाईन उतारा
- ३) जॉबकार्ड ची प्रत
- ४) सार्वजनिक विहीर जमीन हि ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावी.
- ५) सार्वजनिक विहीर पाणी वापराबाबत असल्याचे करारनामा ( १०० रु. चा स्टंप )
मागेल त्याला विहीर योजनाचा "अर्ज पेटीत टाका"
या योजनेचा अर्ज भरून नंतर आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन "अर्ज पेटीत" टाका. ग्रामपंचायतची अर्ज पेटी हि दर सोमवारी उघडण्यात येते. आणि अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायत करते नंतर हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे ग्राम रोजगार सेवक किंवा डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या मदतीने भरते. याप्रमाणे या योजनेचा अर्ज भरला जातो.
मागेल त्याला विहीर योजना ग्रामपंचायत/ ग्रामसभा मंजुरी कशी करते :-
मंजूर झालेली विहिर कोठे खोदावी -
- शेतात असल्यास दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात
- ३० से.मी.चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
- नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात किंवा नाल्यांचे संगमाजवळ
- ३० से.मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो तेथे..
- नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे,
- सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
- घनदाट व गर्द पानांच्या झाडाच्या प्रदेशात
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह असेल तिथे.
- वाळु, रेतीव गारगोट्या थर दिसून येते तिथे.
- नदीचे / नाल्याचे गोलाकार भूभाग मध्ये.
- अचानक दमट वाटणाऱ्या जागेत.
मंजूर झालेली विहिर कोठे खोदू नये -
- भूपृष्ठावर कडक खडक जागेत.
- डोंगराचा कडा वरती
- १५० मीटरचे अंतर असलेल्या जागेत.
- मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असलेल्या भूभागात जागेत.
- मुरमाची खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभाग जागेत.
Magel Tyala Vihir Shasan Nirnay GR Pdf
Important Links
Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf | |
मागेल त्याला विहीर योजनाचा शासन निर्णय! | |
Notification (जाहिरात) | |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | |
Join Us On WhatsApp | |
Join Us On Telegram | |
Join Us On Facebook |
Conclusion
२) मागेल त्याला वैयक्तिक नवीन विहिरी योजना लिंक
3) नवीन विहीर अनुदान योजना 2024 : मिळेल 4 लाख रुपये लिंक
४) Birsa Munda Kruishi Kranti Yojana in Marathi लिंक
५) गाय गोठा अनुदान योजना लिंक