Navin Vihir Anudan Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आंनदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर का तुम्हाला तुमच्या शेतामध्ये विहीर बांधायची असेल तर शासन देत आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ४ लाख अनुदान तेही मागेल त्याला नवीन विहीर अनुदान चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय आहे? नवीन विहीर अनुदान योजना
हि योजना मुख्यता राज्य सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत चालवीत आहे. ज्या शेतकरी बांधवांना अजून पर्यंत Offline पंचायत समिती किंवा MAHA DBT योजने द्वारे नवीन विहीर मंजूर झालेले नाही. त्यांच्या साठी हि योजना राबवीत आहे. परंतु मागेल त्याला विहीर योजना दिनांक 17 डिसेंबर, 2012 पासून सुरवात झालेली आहे. आता मात्र नवीन विहीर साठी ४ लाख अनुदान असून सर्वच शेतकरी योजना घेण्यसाठी उत्सुक आहे.
नवीन विहीर अनुदान योजना 2024
या आर्टिकल चे नाव काय आहे? | नवीन विहीर अनुदान योजना 2024 |
या योजनेचे नाव काय ? | नवीन विहीर अनुदान योजना 2024 |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 17 डिसेंबर, 2012 मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | २०२४ जानेवारी पर्यंत |
मंत्रालय | महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंत्रालय द्वारा |
या योजनेत किती रुपया पर्यंतचे अनुदान दिले जाते ? | ४ लाख रुपया पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | ग्रामीण भागातील शेतकरी |
आधिकारिक वेबसाइट |
नवीन विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट काय ?
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती./ जमाती असलेले बांधव आणि त्याच क्षेत्रातील आर्थिक दृष्ट्या असलेल्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा उदिष्ट्य आहे.
संबंधित लेख : MahaDBT अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना
मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान किती ?
नवीन विहीर बांधण्यासाठी शेतकरी बांधवाला ह्या मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभार्थी यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासन देणार 4 लाख रुपयांचे अनुदान.
नवीन विहीर अनुदान योजना योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया कशी आहे ?
- या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि संबंधित ग्रामपंचायत द्वारे असेल.
- प्रथम मोबाईल EGS Apps द्वारे नोंदणी केल्यानंतर
- ग्रामसेवक याची पळताळणी एका महिन्याच्या आत करेल
- प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर
- आपल्या तालुक्यातील BDO 15 दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी करेल.
नवीन विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता काय ?
१) अर्जदार हा शेतकरी असायला पाहिजे.२) शेतकरी कडे 2.5 एकर पर्यंत शेतजमीन असायला पाहिजे.
3) अल्प भूधारक शेतकरी असेल तर 5 एकरपर्यंत शेतजमीन असायला पाहिजे.
४) महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मधील शेतकरी असायला पाहिजे.
नवीन विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर / ई-मेल आयडी
- रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क अधिनियम 2006 वन हक्क प्रमाण पत्र धारक
विहीर अनुदान योजनासाठी खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी हि योजना मंजुर केली जाईल. असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
- 1.अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती
- 2. अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क अधिनियम 2006 वन हक्क प्रमाण पत्र धारक
- 3.भटक्या जमाती
- 4.विमुक्त जाती
- 5.दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- 6.स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- 7.विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- 8.जमीन सुधारणांचे लाभार्थी
- 9.इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- 10.सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
- 11.अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)
नवीन विहीर अनुदान योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा ?
सर्वप्रथम मोबाईल वर च्या Playstore वरून MAHA - EGS Horticulture Apps Download करून घ्या. नंतर लाभार्थी लॉगीन करा. विहीर अर्ज या नावावर क्लिक करून पुढील माहितीप्रमाणे अर्ज करा.
- १) अर्जदार लाभार्थी तपशील ( अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा)
- २) मोबाईल नंबर टाका
- 3) जिल्हा निवडा
- ४) तालुका निवडा
- ५) ग्रामपंचायत निवडा
- ६) गावाचे नाव लिहा
- ७) मनरेगा जॉब कार्ड क्रमांक लिहा
- ८) मनरेगा जॉब कार्ड चे चित्र किंवा PDF अपलोड करा
- ९) एकूण जमीन टाका २.० हेक्टर पर्यंत
- १० ) विहिरीचा भू मापन क्रमांक टाका.
- ११) धरण क्षेत्र टाका
- १२) शेताचे कागदपत्रे उपलोड करा.
- १३ ) सिंचन विहीर बांधकामासाठी प्रस्तावित जॉब कार्ड होय किंवा नाही करा.
- १४ ) पुढे जा वरती क्लीकं करा.
- १५ ) मोबाईल otp टाका आणि सबमिट नावावर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.
निष्कर्ष :
आम्ही दिलेली नवीन विहीर अनुदान योजना 2024 ची वरील माहिती नक्कीच आवडली असेल तर इतरांना हि शेअर करा जेणेकरून ग्रामीण भागातील / ग्रामपंचायत मधील लोकांना या योजनेचा अधिक लाभ घेता येईल तसेच या योजनेपासून वंचित राहणार नाही. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत राहा.