Navin Vihir Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो, http://www.pmgov.com या ब्लॉग पेजवर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात मी तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजना बाबत सविस्तरपणे संपूर्ण माहिती मराठीत देणार आहे. महाराष्ट्र सरकार Maha DBT Farmer कृषी विभागांतर्गत अनेक शासकीय योजना राबवीत आहे. त्या योजना मधून बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहिरी अनुदान योजना राबवीत आहे. ( Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana in Marathi )
नवीन विहिरी योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | बिरसा मुंडा कृषि क्रांती अंतर्गत नवीन विहिरी योजना मराठीत ! |
या योजनेचे नाव काय ? | नवीन विहिरी योजना |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 3 जानेवारी 2018 मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 March २०२४ पर्यंत |
कोणत्या मंडळातर्फे ? | आदिवासी विभाग / आदिवासी उपयोजना द्वारे |
या योजनेत किती % अनुदान दिले जाते ? | 100 % पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील आदिवासी बांधवांसाठी शेतकरी बांधव |
आधिकारिक वेबसाइट |
नवीन विहिरी योजना काय आहे ?
महाराष्ट्र शासन आदिवासी बांधवांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजनेसाठी अनुदान देत आहे. या योजनेमध्ये शासन पुढील वर्षी अनुदान मध्ये वाढ करणार आहे परंतु सध्या 2.50 लाख रुपये इतके अनुदान देत आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नवीन विहिरीसाठी अनुदान देत आहे.
नवीन विहिरी योजनाचे मुख्य उद्देश काय आहे?
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकरी बांधवांना शेतात सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून त्यांची आर्थिक उत्पन्न वाढेल म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजना राबवणे. तसेच ह्या योजनेत १०० % अनुदान वरती २.५० लाख इतके रुपये. मिळतील.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकरी बांधवांना शेतात सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून त्यांची आर्थिक उत्पन्न वाढेल म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजना राबवणे. तसेच ह्या योजनेत १०० % अनुदान वरती २.५० लाख इतके रुपये. मिळतील.
नवीन विहीर योजनेसाठी पात्रता
- लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा
- लाभार्थी कडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असावे
- सातबारा व आठ अ उतारा असावा
- वनपट्टे धारक शेतकरीचे वन प्रमाणपत्र असावा
- वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादा एक लाखाच्या आत असावी
- उत्पन्नाच्या दाखला बंधनकारक
- लाभार्थी शेतकऱ्याकडे 0. 20 हेक्टर ते 6.0 हेक्टर पर्यंत जमीन असावी
- भूजल सर्वेक्षण पाणी उपलब्धतेच्या दाखला
नवीन विहिरीसाठी अपात्र
- लाभार्थी हा अनुसूचित जमाती वर्गातील असावा
- लाभार्थीचे उत्पन्न एक लाख रुपयेच्या वर नसावे
- इतर कोणत्याही योजनेतून शासकीय विहीर चा लाभ घेतलेला नसावा
- सहा हेक्टर हून जास्त हेक्टर वाले या योजनेसाठी अपात्र राहतील
- नवीन विहीर खोदण्यासाठी पाचशे मीटरच्या अंतरावर नवीन विहीर नसावा
बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजनेत अनुसूचित जमाती शेतकरी बांधवांना 100 % अनुदान मिळते. शेतातून भरघोस उत्पन्न काढता येईल. महाराष्ट्रा राज्यातील अनुसूचित जमाती शेतकरी राजाला या योजनेचा माध्यमातून शेतातील आर्थिक उत्पन्न वाढेल.
नवीन विहीर साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- शेताचे सातबारा व आठ उतारा
- वनपट्टे धारक शेतकरीचे वन प्रमाणपत्र
अनुदान कसे मिळेल
नवीन विहिरी साठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 250000 रुपये इतके अनुदान असेल परंतु नवीन विहीर पूर्ण बांधून झाल्याने अनुदान हे Maha DBT द्वारे टप्याटप्याने इलेक्ट्रिक माध्यमातून आधार कार्ड शी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
नवीन विहिरी साठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 250000 रुपये इतके अनुदान असेल परंतु नवीन विहीर पूर्ण बांधून झाल्याने अनुदान हे Maha DBT द्वारे टप्याटप्याने इलेक्ट्रिक माध्यमातून आधार कार्ड शी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
मंजूर झाल्यानंतर कागदपत्रे सादर करणे
महाडीबीटी द्वारे संगणीय सोडतीत निवड झाल्यानंतर नवीन विहिरी योजनासाठी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लाभार्थीचा मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे कळविण्यात येते जर का नवीन विहिरी योजनासाठी मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास त्यांची निवड Automatic रद्द करण्यात येते.
अर्जाची छाननी व मंजुरी
महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागाच्या बिरसा मुंडा कृषि क्रांती अंतर्गत नवीन विहिरी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला अर्जाची छाननीसाठी मंजुरी हि तालुक्यातील सुपर वायजर, कृषी मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे त्यांच्या Maha dbt पोर्टलचा डेस्क वर करतील. नवीन विहिरी योजनासाठी अर्जाची छाननी करत कागदपत्रे योग्य असतील तर या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल.
नवीन विहिरी साठी अर्ज कुठे करायचा :
बिरसा मुंडा कृषि क्रांती नवीन विहिरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या सेतू केंद्र वर, किंवा CSC ऑनलाई सेंटर वर जावे लागेल. आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला बिरसा मुंडा कृषि क्रांती नवीन विहिरी योजनेचा अर्ज भारावून घ्यावा लागेल कारण ते योग्य माहिती टाकून अर्ज करून देतात. तसेच नवीन विहिरी योजनेचा अर्ज केला असेल तो तुमचा युजर नेम आणि पासवर्ड जमून ठेवावा लागेल कारण तो आता कायमस्वरूपी झाला असे समजावे.
मंजूर नवीन विहिरी योजेसाठी कुठे संपर्क करावा?
नवीन विहिरीसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तुम्हाला आपल्या जवळील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा लागेल. नंतर ते आपला शेतात येतील आणि ज्या ठिकाणी नवी विहीर बांधायची आहे त्या ठिकाणाचा फोटो GPS ट्राकर ने काढतील. काम पूर्ण झाल्यानंतर मोका तपासणीसाठी पुन्हा येतील.
नवीन विहिरीसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तुम्हाला आपल्या जवळील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा लागेल. नंतर ते आपला शेतात येतील आणि ज्या ठिकाणी नवी विहीर बांधायची आहे त्या ठिकाणाचा फोटो GPS ट्राकर ने काढतील. काम पूर्ण झाल्यानंतर मोका तपासणीसाठी पुन्हा येतील.
Maha DBT Farmer नवीन विहीर योजनाचा शासन परिपत्रक PDF
निष्कर्ष :
आम्ही दिलेली बिरसा मुंडा कृषि क्रांती अंतर्गत नवीन विहिरी योजनाची माहिती मराठीत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मित्रांनो नवीन विहिरी योजना ची माहिती बरोबर इतर नवनवीन योजनांची माहिती जाणून घेण्यसाठी आम्हाला फॉलो करत राहा, तसेच या योजनेपासून अनुसूचित जमातीच्या शेतकरी लोकांना नवीन विहिरी योजना लाभ घेता येईल, म्हणून हा लेख इतरांना हि शेअर करा. (Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana in Marathi )