गाय गोठा अनुदान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत

गाय गोठा अनुदान योजना : नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विविध प्रकारचा वैयक्तिक लाभच्या योजना  100% अनुदान वरती राबली जातात, अशीच हि योजना आहे ती म्हणजे  शरद पवार ग्राम समृद्धि गाय गोठा अनुदान योजना ह्यात तुम्हाला गाय, मशी साठी गोठा बांधण्यासाठी १०० % अनुदान दिले जाणार आहे. चला तर मग गाय गोठा अनुदान योजनाची सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत. 

गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करावा.
 गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करावा.

गाय गोठा अनुदान योजना म्हणजे काय ? 

हि योजना मुख्यता राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांनी पाळलेले गायी, म्हशी, शेळ्या, किंवा मेंढ्यांसाठी शेड नसतात. त्यांना राज्य सरकार शेड बांधण्यासाठी १०० % अनुदान देऊन आर्थिक मदत करते. आणि ज्यांच्या कडे फक्त 3 ते ४ गाय म्हशी असते त्यांना देखील हि योजना दिली जाते. 

गाय गोठा अनुदान योजना

या आर्टिकल चे नाव काय आहे?

गाय गोठा अनुदान योजना अर्ज कसा करावा.

या योजनेचे नाव काय ?

शरद पवार ग्राम समृद्धी गाय गोठा अनुदान योजना

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

मागील काही दिवसा पासून चालू झाली

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

२०२४ जानेवारी पर्यंत

मंत्रालय

कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय द्वारा

या योजनेत किती अनुदान दिले जाते ?

१०० % अनुदान ७० हजार रुपये.

लाभार्थी कोण ?

ग्रामपंचायत चे नागरिक

आधिकारिक वेबसाइट

अजून सुरवात झालेले नाही.

ह्या योजनेचा उद्देश काय आहे?

हि योजना ग्रामीण भागात राहण्याऱ्या  शेतकऱ्यांचा अधिक विकास व्हावा. राज्य सरकार अर्जदारांना आर्थिक मदत करून रोजगार देऊन, सोबत गाय गोठा साठी शेड उपलब्द करून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारणा होईल असा उद्देश ठेऊन हि योजना चालू केली आहे.

गाय गोठा अनुदानसाठी योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे 

  • १ ) आधार कार्ड झेरॉक्स
  • २) बँक पासबुक झेरॉक्स
  • 3) राशन कार्ड झेरॉक्स
  • ४) घराचा ८ नंबर नमुना उतारा झेरॉक्स
  • ५) ग्रामपंचायत ठराव 
  • ६) पासपोर्ट फोटो 
  • ७) अनुसूचित जाती / जमाती असल्यास जातीचा दाखला.
  • ८) वन अधिकार मान्यता असलेले वन प्रमाण पत्र 
  • ९) कुटुंब ओळख पत्र  (जॉब कार्ड )

शरद पवार ग्राम समृद्धि गाय गोठा अनुदान योजनासाठी अर्ज कसा करावा.

आम्ही दिलेल्या अर्ज प्रमाणे सर्वप्रथम फॉर्म वरती ग्रामपंचायत चे नाव लिहा, तालुका, जिल्हा, टाकावा. दिनांक टाका. पासपोर्ट फोटो चीपकावा आपले संपूर्ण नाव किंवा अर्जदाराचे नाव लिहा, त्या नंतर संपूर्ण पत्ता लिहा ज्या ज्या कागदपत्रे ची पुरतात केली असेल. त्या कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत ला जमा करा. आणि एक झेरॉक्स प्रत वर Received पोच घ्या.  

गाय गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करावा.
गाय गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करावा.

गाय गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाई अर्ज कसा करावा.

जनावरांचा गाय गोठासाठी  शासना कडून ७० हजार अनुदान हे दिले जाते. जनावरांचा गोठासाठी ही योजना  100% अनुदान वरती योजना राबली जाते. तर या योजनेचा लाभ घेण्यसाठी अशी कोणतीहि ऑनलाईन वेबसाईट शासनाने चालू केले नाही. ह्या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. जर का शासनाने एखादी वेबसाईट चालू केल्यास आम्ही नक्की उपलब्द करून देऊ.

ही शासकीय योजना आहे अत्यंत लाभदायक लिंक 

गाय गोठा कामाचा प्रकार 

गाय गोठा १०० % अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे  योग्य झाल्यानंतर तुम्हाला शासनाच्या कामाच्या प्रकार नुसार गाय गोठा बांधावा लागेल, म्हणजे गोठ्याचे कांक्रेटीकरण, मुत्रासंचाय, गव्हाण व योग्य असे छत नुसार बांधावे लागेल. नंतर तुम्हाला ७० हजार चे पैसे खात्यात मिळेल.

गाय गोठा अनुदान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत
गाय गोठा अनुदान योजना सविस्तर माहिती जाणून घ्या मराठीत

गाय गोठा कामाचाप्रमाण / तपशील 

तुम्हाला ह्या योजनेचे पूर्वसंमती मिळाल्यानंतर DPR नुसार बांधावे लागेल. DPR म्हणजे कामाचा अंदाज आणि गाय गोठा हा २६. ९५ चौ. मीटर आणि लांबी ७.७० मीटर व रुंदी. 3.५० असे बांधावे लागेल.

गाय गोठा कामासाठी अंदाजित रक्कम आणि कार्यविंत यंत्रणा.

आपल्या कडे 3 ते ४ किंव त्या हून आधील जनावरे असेल तर तुम्हाला मिळेल ७० हजार अनुदान परंतु आता च्या घडीला राज्य सरकार ने शरद पवार ग्राम समृद्धि गाय गोठा अनुदान योजनासाठी अधिक रक्कम देण्याचे ठरवले आहे. म्हणजे अंदाजित एक लाख देण्याचे ठरवले आहे. आणि कार्यविंत अर्ज हा आपल्याला आपल्या ग्रामपंचायत च्या कार्यालयात जाऊन जमा करावे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना पीडीएफ फॉर्म कसा डाउनलोड करायचा? 

महाराष्ट्र सरकार यांच्या अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धि गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रथम या योजनेशी संबंधित माहिती जाऊन घ्या नंतर आम्ही दिलेलें अर्ज डाउनलोड करा. जर तुम्हाला या गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर आम्ही खाली लिंक दिलेला आहे. ह्या योजनेचा योजना PDF फॉर्म सहज डाउनलोड करू शकता.

गाय गोठा अनुदान योजनाची इतर माहिती

गाय गोठा अनुदान योजनाची PDF Link
Helpline Number

022-49150800

Chief Minister Helpline:

24x7 (Toll Free) No.: 1800 120 8040

Facebook Link
TelegramLink 

गाय गोठा अनुदान योजना अर्ज नाकारल्यास

आर्ज करूनही आपले अर्ज काही करणासाठी अर्ज बाद झाल्यास आपल्याला कळत सुद्धा नाही, किंवा अर्ज नाकारल्यानंतर काय करावे हे देखील समजत नाही म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत. गाय गोठा अनुदान योजना अर्ज नाकारल्यास माहिती चा अधिकार चा वापर करा. अर्ज का नाकारे म्हणून माहिती मांगीताल्यास तुम्हाला साजेल नंतर पुन्हा अर्ज करा नक्कीच या योजनेचा लाभ मिळेल.

निष्कर्ष

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला गाय गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा  करावे या बद्दल माहिती दिली आहे. यासोबतच गाय गोठा अनुदान योजनाची संपूर्ण माहिती देखील देण्यात आली आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुम्हाला या लेखाशी संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी देऊ शकता.

गाय गोठा अनुदान योजनासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसा करावा.? YouTube च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.



Post a Comment (0)
Previous Post Next Post