मागेल त्याला वैयक्तिक शेततळे या योजनांची संपूर्ण माहिती वाचा

वैयक्तिक शेततळे योजना : नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला शेततळे योजना, म्हणून राज्य सरकार वैयक्तिक शेततळे ७५ हजार वर अनुदान योजना राबवीत आहे. हि योजना MAHA DBT फार्मर पोर्टल वर राबवली जात आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मागेल त्याला वैयक्तिक शेततळे योजना या योजनांची संपूर्ण माहिती वाचा
मागेल त्याला वैयक्तिक शेततळे योजना या योजनांची संपूर्ण माहिती वाचा

मागेल त्याला वैयक्तिक शेततळे योजना तपशील 

या आर्टिकल चे नाव काय आहे?

मागेल त्याला वैयक्तिक शेततळे योजना या योजनांची संपूर्ण माहिती

या योजनेचे नाव काय ?

वैयक्तिक शेततळे योजना

योजनचे सुरवात केव्हा झाली.?

मागील काही दिवसा पासून चालू झाली

योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

२८ फेब्रुवारी २०२४  पर्यंत

मंत्रालय

महाराष्ट्र मंत्रालय द्वारा

या योजनेत किती अनुदान दिले जाते ?

७५ हजार रुपये.

लाभार्थी कोण ?

शेतकरी बांधव 

आधिकारिक वेबसाइट

लिंक 

प्रस्तावना:

हवामान बदलाचा महाराष्ट्र राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या हवामान बदलाविषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. शेततळे (इनलेट आऊटलेट सह शेततळे/ इनलेट आऊटलेट विरहित शेततळे/ शेततळ्यास अस्तरीकरण)

शेततळे म्हणजे काय ?

राज्यात शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येत आहे. त्या साठी परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सरकार शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा MAHA DBT फार्मर पोर्टल वर वैयक्तिक शेततळे अनुदान योजना सुरु करण्यात आलेला आहे.

शेततळे चे मुख्यता

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट होईल म्हणून व जलसंधारणाच्या माध्यमातून शेतात उत्पादकता वाढविण्यासाठी MAHA DBT फार्मर पोर्टल योजनामधून अनुदानावर शेततळे योजना राबविण्यात येत आहे. राज्य सरकार शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल म्हणून सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता वैयक्तिक शेततळे लाभाचे घटक राबवीत आहे.

उद्दिष्टे:

  • १. गावातील किंवा खेड्यातील प्रत्येक अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
  • २. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
  • ३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे
  • ४. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करणे.

लाभार्थी निवडीचे निकष :

  • १. सर्वप्रथम आपल्याला अधिकृत संकेतस्थळ वर फोर्म भरावा लागेल.
  • २. MAHA DBT फार्मर पोर्टल च्या Lottery लागल्यानंतर लाभ देण्यात येईल.
  • ३. निवडलेल्या आकारमानाच्या शेततळे मिळेल.
  • ४. शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

शेततळयांच्या जागेच्या निवडीसाठी तांत्रिक निकष : खालीलप्रमाणे राहतील.

  • १. शेतक-यांकडे स्वत:च्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.
  • २. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमिन असलेल्या जागेची निवड करावी.
  • ३. काळी जमिन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
  • ४. मुरमाड व वालुकामय सच्छिद्र खडक असलेली जागा शेततळ्याकरिता निवडू नये.
  • ५. शेतातील क्षेत्र हे उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्रथम प्राधान्याने घेण्यात यावीत.
  • ६. शेततळयाच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.
  • ७. नाल्याच्या/ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येवू नये.
  • ८. ( इनलेट आऊटलेट सह शेततळ्यास अस्तरीकरण) शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील.
  • ९. इनलेट आऊटलेट सह शेततळ्यास अस्तरीकरण विरहीत शेततळ्यासाठी पाणी पुनर्भरणासाठी स्त्रोत असल्याची खात्री करण्यात यावी. या बाबी विचारात घेवून शेततळयाचा प्रकार निवड करावा.
  • १०. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्टया योग्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल..
  • ११.इनलेट आऊटलेट सह शेततळ्यास अस्तरीकरण शेततळे यासाठी लाभार्थी निवडतांना पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच, पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा नैसर्गिकरित्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे, याची प्रथम खात्री करावी.

अर्थसहाय्य:

शेततळ या घटकांतर्गत खालील पैकी एका आकारमानाचे शेततळे घेण्यास मुभा राहील. शेततळ्याचे आकारमान हे त्यात होणारा पाणीसाठा वर अवलंबून आहे. तसेच पाणलोट क्षेत्रातुन उपलब्ध होणा-या अपधावेच्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने ठेवण्यात येयील. आकारमान निहाय शेततळयाचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ (चौ.मी.) आणि अपेक्षित खोदकाम (घ.मी.) खालील प्रमाणे राहील.



शेततळ्यासाठी निवड कशी करावी 

वरीलप्रमाणे कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३० X ३० X ३ मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान १५X१५X३ मीटर या आकारमानाचे व इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये किमान २० X १५ X३ मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.

शेततळ्यासाठी वरील आकारमान दर्शविण्यात आले असले तरी शेततळ्याचे आकारमान, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व होणारे प्रत्यक्ष खोदकाम यानुसार अनुदान देय राहिल. लाभार्थ्याची मागणी व शेत परिस्थितीनुसार शेततळयाची लांबी, रुंदी कमी जास्त करण्यास मुभा राहिल. उपरोक्त मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतक-याने स्वतः करावयाचा आहे. तथापि देय.

शेततळयाचे फक्त अस्तरीकरण (इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यासाठी अस्तरीकरण)-

शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरते व आवश्यक त्यावेळी संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही म्हणून शेतकरी यांना MAHADBT अंतर्गत लाभ साठी ऑनलाई अर्ज करावयाचे निर्दशनास आणले आहे. तसेच या पूर्वी इतर योजनेमधून खोदलेल्या इनलेट आउटलेट विरहित शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान देय राहील. त्यानुषंगाने शेततळे अस्तरीकरणासाठी मार्गदर्शक माहिती खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत.

लाभार्थी

  • १. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा. MAHA DBT Lottery लागल्यानंतर तसेच आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावीत.
  • २. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर मार्गदर्शक सुचानामधील अटी, नियम आराखडयाप्रमाणे (Design) व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरुन प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • ३. लाभार्थ्याने स्वतः/ मजुराद्वारे / अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी, पोकलेन सारखे मशिन्स) सहाय्याने शेततळे पूर्ण करावयाचे आहे. शेततळे योजना साठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम ) तुम्हाला मिळणार नाही.
  • ४. शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करावी आणि शेततळ्याची निगा, दुरूस्ती व गाळ काढणे इ. ची जबाबदारी संबंधीत लाभार्थीची राहील.
  • ५. निवडलेल्या लाभार्थीनी त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार निवडून शेततळ्याचे काम स्वत: करुन घेण्याची मुभा राहणार आहे. परंतू याबाबींची उभारणी मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकष, आराखडे व दर्जाप्रमाणे करणे बंधनकारक असणार आहे.

निवड झाल्यानंतर आवश्यक लागणारे कागदपत्रे अपलोड करणे.

MAHA DBT Lottery ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्व अर्ज व अपलोड करणे जसे कि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, चा जातीचा दाखला आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ व ८ अ उतारा , बंधपत्र , हमीपत्र.

Conclusion :

आम्ही दिलेली वरील मागेल त्याला वैयक्तिक शेततळे योजना या योजनांची संपूर्ण माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा. हि योजना ऑनलाईन करावयाची आहे, आणि अशाच माहिती साठी आम्हाला नक्कीच फोल्लो करा. , 

शेततळे योजना साठी बंधपत्र अर्ज नमुना PDF

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :

Related Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 


Post a Comment (0)
Previous Post Next Post