शेतकऱ्यांना लुटले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे. माहिती अधिकारात महत्व पूर्ण माहिती
उघड 👇👇
उघड 👇👇
![]() |
माहिती अधिकार मधून मांगितलेली माहिती
प्रश्न 1) सोलर चे साहित्य शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट साठी कंपनीला अथवा शेतकऱ्यांना दिला जाणारा खर्च त्याची माहिती देण्यात यावी.
उत्तर : सोलर साहित्य वाहतुकीच्या खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट असल्याने वाहतूक संबंधित कंपनीने करण्याची आहे.प्रश्न नं 2 ) साहित्य शेतात आणून देणे खड्डा करणे सिमेंट वाढू गिट्टी यांसाठी कंपनीला दिला जाणारा खर्च याबाबत माहिती देण्यात यावी.
उत्तर : साहित्य शेतात आणून देणे खड्डा करणे सिमेंट वाळू गिट्टी यांसाठी कंपनीला दिला जाणार खर्च पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे शेतकरी यांनी कोणतेही पैसे न देणे बाबत.सोलर पंप ला कंपन्या प्रतिसाद देत नसतील तक्रार नोंदवावी.
जर शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यात विलंब होत असेल किंवा कंपन्या प्रतिसाद देत नसतील, तर त्यांनी खालील क्रमांकांवर तक्रार नोंदवावी.
- राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक: 1912 आणि 19120
- महावितरण टोल फ्री क्रमांक:
1800 212 3435 आणि 1800 233 3435