Digital 7/12 आणि 8 अ उतारा, 25 रुपयांत, पहा शासन निर्णय!

Mahabhulekh Digital Satbara : नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या www.pmgov.com वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक शेतकरीला आता स्वतः चा  शेती मालकी हक्क दाखवण्यासाठी 7/12 आणि 8 अ उतारा ही कागदपत्रे खूप महत्वाची झालेली आहे. म्हणून आता राज्य सरकारने digital केला आहे.

Digital 7/12 आणि 8 अ उतारा 25 रुपयांत, पहा शासन निर्णय!
Digital 7/12 आणि 8 अ उतारा 25 रुपयांत, पहा शासन निर्णय!


Digital Satbara काय आहे? ( 7/12  online Maharashtra ) 

शेतकरी मित्रांनो सांगायला गेले तर 7/12 उताऱ्यावरून जमिनीचा मालकी हक्क कोणाचा आहे. याची माहिती मिळते. तर ७/१२ जवळील 8 अ उताऱ्यावरून शेतकऱ्याच्या नावावर एकूण किती ( जमीन ) क्षेत्र आहे. याची माहिती मिळते. चला तर मग अजून विस्तार नुसार हा संपूर्ण लेख वाचूया.

Digital Satbara online सेवा शुल्क काय आहे?

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने 7/12 आणि 8 अ उतारा तसेच इतर ई -फेरफार उतारे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र / ऑनलाईन सायबर दुकाने / प्रचलित सेवाशुल्क कोणत्याही खातेदार नागरिकांना वैयक्तिकरित्या सदर कागदपत्रे निशुल्क देण्याचे सूचना जाहीर केले आहे.

Mahabhulekh Digital Satbara online कसा मिळेल? ( 7/12 उतारा )

हे सर्व ई फेरफार उतारे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.आता सदरचे उतारे काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.आपण आपल्या मोबाईल वरून देखील सदरचे उतारे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकणार आहेत.

आपले सरकार सेवा केंद्रात मिळेल सुविधा

काही व्यक्तींना तर अजून देखील घरबसल्या 7/12 आणि 8 अ उतारा हा काढता येत नाही. तर काही व्यक्ती जवळच्या तलाठी कार्यालयात हेलपाटे मारतात तर काही व्यक्ती हे जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर, ऑनलाईन सायबर वाल्यांकडून जाऊन हे उतारे काढून घेतात.  7/12 आणि 8 अ उतारा तसेच वारस नोंद साठी काही ऑनलाईन सेतू केंद्र वाले जास्तीचे पैसे घेतात त्यांना आळा बसावा म्हणून महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय काढला आहे.

शासन निर्णय काय आहे? ( Mahabhulekh Digital Satbara online Maharashtra GR )

दिनांक .23.11.2020 च्या शासन परिपत्रक नुसार आता गाव नमुना नं. 7/12 आणि 8 अ उतारा तसेच वारस नोंद किंवा ई-फेरफार असो राज्य सरकार प्रत्येक प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामधील कामे हे संगणकीकृत करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग शासन निर्णय नुसार संगणकीकृत अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिजिटल स्वाक्षरीत असलेला डेटाबेस च्या आधारावर संगनिकृत असेल, आणि सर्व कायदेशीर वा शासकीय कामकाजसाठी ग्राह्य समजण्यात यावेत असा सक्त निर्देश दिलेला आहे.आता  7/12 आणि 8 अ उतारा तसेच वारस नोंद त्यांची नक्कल काढण्यासाठी २५ रुपये फी नागरिकांकडून प्रत्येक ऑनलाईन दुकान चालकाने घ्यावी असा शासन निर्णयान्वये फी निश्चित करण्यात आली आहे.

ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार अर्ज नोंदवण्यासाठी निश्चित दर खालीलप्रमाणे 

  1. ई करार ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  2. बोजा दाखल करणे /गहाणखत ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  3. बोजा कमी करणे ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  4. वारस नोंद ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  5. मयताचे नाव कमी करणे ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  6. अ.पा.क शेरा कमी करणे ₹२५- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  7. एकुम्या (एकत्र कुटुंब प्रमुख) नोंद कमी करणे ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.
  8. विश्वस्थांचे नाव बदलणे ₹२५/- मागे पुढे दोन्ही पृष्ठ.

ई हक्क प्रणालीद्वारे फेरफार अर्ज नोंदवण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे निश्चित दर खालीलप्रमाणे 

  1.  इ करार साठी सोसायटी ई करार प्रत लागणार
  2.  बोजा दाखल करण्यसाठी बँकेची प्रत व गहाण खताची प्रत लागणार
  3.  बोजा कमी करण्यसाठी बँकेची प्रत व अधिक एक कागदपत्र लागणार
  4.  वारस नोंदसाठी  मृत्यू दाखला सत्य प्रत लागणार
  5.  मयताचे नाव कमी करण्यसाठी अर्जदाराचे ओळखपत्र मृत्यू दाखला संयघोषणापत्र संमती पत्र लागणार
  6.  अपाक शेरा कमी करण्यसाठी खातेदाराचा वयाचा पुरावा व अधिक कागदपत्र लागणार
  7.  एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करण्यसाठी संबंधित फेरफार सहधारक वारस स्वयंघोषणापत्र लागणार
  8.  विश्वस्तांचे नावे बदलण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांचे आदेश पत्र लागणार

Important Links

७/१२,८-अ उतारा डाऊनलोड करण्यासाठी 


येथे क्लिक करा 

Digital 7/12 8 अ उतारा चा शासन निर्णय!


येथे क्लिक करा 

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On WhatsApp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

Join Us On Facebook

येथे क्लिक करा

साराउंश 

आशा करितो कि, आम्ही दिलेले Mahabhulekh चा Digital Satbara तसेच वारस नोंद फी विषयी ची माहिती वाचली असाल. तसेच राज्य सरकारने दिलेला शासन निर्णय माहिती देखील आवडली असेल. तरी माझा शेतकरी मित्रांना विनंती आहे. कि या Digital 7/12 आणि 8 अ उतारा तसेच वारस नोंद फक्त 25 रुपयांत मिळतो, असा शासन निर्णय देखील आम्ही उपलब्द करून दिला आहे. मी आशा करितो कि, हि माहिती  जवळील मित्रां पर्यंत शेअर करा. जेणेकरून करून 7/12 आणि 8 अ उतारा तसेच वारस नोंद फी विषयीच्या शासन निर्णय वाचू शकेल. धन्यवाद  ( Mahabhulekh Digital Satbara online Maharashtra GR )

[👇 इतर योजना ची माहिती 👇]
1 ) Saur Kumpan Yojana Link
2 ) CMEGP Loan Link
3 ) Pandit Dindayal Link
4 ) Jeevan Pramaan Patra Link
5 ) PMEGP Loan Link

Post a Comment (0)
Previous Post Next Post