शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद येथील केंद्र शासनाच्या जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत धरती आबा जन भागीदारी अभियान अंतर्गत शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चाकडू येथे सिकल सेल तपासणी शिबिर संपन्न करण्यात आला.
ह्यावेळी शाळेतील एकूण ८४ मुलामुलींची सिकल सेल तपासणी करण्यात आली. ह्यापैकी २४ मुलांची तपासणी सकारात्मक आली असून पुढील ईलेक्ट्रोफोरेसिस तपासणी साठी संदर्भित करण्यात आले आहे.
तसेच असंसर्गजन्य आजार शोध मोहिमेत NCD शिबिर, टी.बी.स्क्रिनिंग रुग्ण तपासणी करण्यात आले तसेच, आयुष्मान कार्ड आभा कार्ड काढण्यात आले.!
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी सर व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश पावरा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील शिबिर आयोजित करण्यात आले. ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, शाळेचे मंगलसिंग पावरा सर, नटराज पावरा सर व सर्व स्टाफ, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, आरोग्य सेवक सागर पावरा, गटप्रवर्तक ज्योती पावरा सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले.!