![]() |
तलाठी हे खाजगी कार्यालय वापरत असल्याबाबत तक्रारी अर्ज नमुना : Talathi Khajgi Karyalay Takrari Arj Namuna
- मंत्रालयीन सेवा
- महाराष्ट्र शासन
- महसूल व वन विभाग, मंत्रालय,
- मादाम कामा मार्ग, १ ला मजला, हुतात्मा राजगुरु चौक,
- मुंबई-४०० ०३२
- दूरध्वनी क्र. ०२२ २२७९३७५४
- Email ID: deske10-rfd@mah.gov.in
- क्रमांक : संकीर्ण २०२४/प्र.क्र.३६३/ ई-१० प्रति,
- दिनांक : १९.१२.२०२४
- १) सर्व विभागीय आयुक्त,
- २) सर्व जिल्हाधिकारी,
विषय :- तलाठी हे खाजगी कार्यालय वापरत असल्याबाबत व खाजगी
मदतनीस नेमत असल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करावयाच्या कारवाईबाबत.महोदय,
उपरोक्त' विषयाच्या अनुषंगाने अपर महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी सापळा / पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या खाजगी जागेतून (खाजगी कार्यालयात) करतात.
तसेच त्यांचे शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खाजगी इसम नेमतात व त्यांचेकडून शासकीय कामे करवून घेतात. तसेच, खाजगी कार्यालयात शासकीय दस्तऐवज ठेवतात. ही बाब उचित कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार ग्राम महसूल अधिकारी (पूर्वीचे पदनाम तलाठी) यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत. सदर कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडताना ग्राम महसूल अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
तसेच, म.ना.से. (वर्तणूक) नियम, १९७९ अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचारी / अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य पालन करताना, वर्तणूकविषयक नियम विहित्त करण्यात आलेले आहेत. सदर नियमांचे पालन प्रत्येक शासकीय कर्मचारी / अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.
याठिकाणी असेही नमूद करण्यात येते की, ग्राम महसूल अधिकारी हे नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी काम करतात. सदर सज्जा कार्यालये शासकीय जागांमध्ये अथवा शासन मान्यता प्राप्त भाड्याच्या जागांमध्ये आहेत.
याठिकाणी असेही नमूद करण्यात येते की, ग्राम महसूल अधिकारी हे नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी काम करतात. सदर सज्जा कार्यालये शासकीय जागांमध्ये अथवा शासन मान्यता प्राप्त भाड्याच्या जागांमध्ये आहेत.
त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच, ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज करण्यासाठी खाजगी व्यक्ती / मदतनीस नेमण्याबाबत शासन स्तरावरून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
सबब, तलाठी हे शासकीय कामकाज खाजगी कार्यालयातून करत असल्याचे, खाजगी जागेमध्ये शासकीय दस्तऐवज ठेवत असल्याचे निर्दशनास आल्यास तसेच, शासकीय कामकाज करण्यासाठी खाजगी व्यक्ती नेमत असतील तर संबंधित तलाठी यांच्याविरूद्ध म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम, १९७९ नुसार तात्काळ उचित कार्यवाही करण्यात यावी.
तसेच, या सूचना सर्व तलाठ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणण्यात याव्यात, ही विनंती.