Eligible Beneficiary Check Subsidy for Pradhan Mantri D Gharkul Yojana : आपणही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ड घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहे. त्यांनी सदर अनुदान आपल्या खात्यात जमा झाले आहे का नाही याची शहानिशा करा.
![]() |
ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून कळविण्यात आनंद होत आहे की, आपणास 'प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२' अंतर्गत घरकुल मंजूरी देण्यात येत आहे.
आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या टप्प्यानिहाय खालीलप्रमाणे चार हप्त्यांमध्ये रु.१.२० लक्ष अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये (DBT द्वारे) प्राप्त होईल.
Eligible Beneficiary Check Subsidy for Pradhan Mantri D Gharkul Yojana
खालील प्रमाणे सर्व हप्ते आपल्याला ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा करून वेळोवेळी माहिती घेत चला.याव्यतिरिक्त मगांराग्रारोहयो व स्वच्छ भारत मिशन चे अनुदान देखील मिळेल.
हप्ता देयक पातळी अनुदान : Eligible Beneficiary Check Subsidy for Pradhan Mantri D Gharkul Yojana :
- 👉पहिला हप्ता =मंजूरी=१५,०००/-
- 👉दुसरा हप्ता =जोता पातळी=७०,०००/-
- 👉तिसरा हप्ता =छज्या पातळी=३०,०००/-
- 👉चौथा हप्ता =घरकुल पूर्ण=५०००/-
- 👉एकूण १,२०,०००/-
- 👉 मगांराग्रारोहयो* अंतर्गत=९०= मनुष्यदिन =२६,७३०/-
- 👉 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत=शौचालय=१२,०००/-
हेही वाचा 👉🏻 : घरबसल्या प्रधानमंत्री ड घरकुल साठी सर्वे करा.
घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेनंतर सदर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतीकडे कुटुंबातील महिलेच्या अगर पती-पत्नी दोघांच्या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील.प्रधानमंत्री ड घरकुल यादी चेक करण्यासाठी क्लिक करा.
घरकुल बांधकाम मार्गदर्शनासाठी आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा राज्यस्तरा वरील हेल्पलाइन (१८००२२२०१९) क्रमांकावर संपर्क साधावा.प्रचार -प्रसारक, R. Mule. अहिल्यानगर