![]() |
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील 12 लाख 38 हजार 712 लाभार्थ्यांचे ई-केवायसी (लाभार्थी प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे.
नोंदणी यासाठी रास्तभाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे मोफत ई-केवायसी सेवा उपलब्ध आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आता शासनाने “मेरा ई-केवायसी” (Mera E-KYC) मोबाइल ॲप कार्यरत केले आहे.
त्यामुळे लाभार्थी रास्तभाव दुकानात न जाता घरबसल्या काही मिनिटांतच स्वतःचे व आपल्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करू शकतात, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे.
ई-केवायसी का आवश्यक आहे?
शिधापत्रिकेसोबत आधार क्रमांक संलग्न असल्याची तसेच शिधापत्रिकेतील व्यक्ती खरी असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.
अद्याप 3 लाख 73 हजार 791 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.
ई-केवायसी पूर्ण न केल्यास शिधापत्रिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
घरबसल्या ई-केवायसी करण्याची सोपी प्रक्रिया!
गुगल प्ले स्टोअरमध्ये “आधार फेस आरडी सेवा ॲप” (Aadhaar Face RD Service App) शोधून इंस्टॉल करा.
- “मेरा ई-केवायसी मोबाइल ॲप” (Mera E-KYC App) डाउनलोड करा व इंस्टॉल करा.
- ॲप उघडून राज्य व ठिकाण निवडा.
- आपला आधार क्रमांक टाका, त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- माहिती सत्यापित करून सबमिट करा.
- “फेस ई-केवायसी” पर्यायावर क्लिक करा आणि:
- सेल्फी कॅमेरा सुरू झाल्यावर डोळे बंद-उघडा.
- चेहरा स्कॅन होताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
- यशस्वी ई-केवायसी नंतर मेसेज मिळेल आणि खात्री करता येईल.
“मेरा ई-केवायसी” करण्याची शेवटची तारीख काय?(Mera E-KYC)
- शेवटची तारीख – 15 मार्च 2025
- लाभार्थ्यांनी 15 मार्च 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे.
- ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिका सुविधांवर परिणाम होऊ शकतो.
- अडचण असल्यास: आपल्या रास्तभाव दुकान किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा.
- वेळेत ई-केवायसी करून तुमच्या धान्य हक्काची खात्री करा!
#MeraEKYC 📱 #DigitalIndia 🇮🇳 #RationCard 🍚 #AadhaarVerification 🔍 #Ekyc ✅ #FoodSecurity 🍞 #SmartGovernance 🏛️ #EkycOnline 💻 #MarathiUpdates 📢 #EkycProcess