Battery Operated Spray Pump Hamipatra PDF :नमस्कार शेतकरी मित्रांनो, MAHA DBT पोर्टल अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अर्ज केला असेल. आणि तुमची निवड झाली असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये देखील SMS आला असेल. मग तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप कसा मिळेल. आणि कोणकोणते कागदपत्रे लागणारे कुठे अर्ज कुठे सादर करावा लागेल अशी संपूर्ण माहिती देत आहे.
![]() |
Battery Operated Spray Pump Hamipatra PDF |
तुम्हाला एक अर्ज भारावा लागणार आहे. आणि त्या सोबत इतर कागदपत्रे देखील जोडावे लागणार आहे. तेव्हाच १०० % बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मिळणार आहे त्या साठी तुम्हाला एक हमीपत्र अर्ज भरावे लागणार आहे. मग तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मिळणार आहे. खालील हमीपत्र नमुना फॉर्म हा तुम्हाला तुमचा तालुका कृषी कार्यालय मध्ये मिळेल नंतर तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हमिपत्र कसा भरावा ? : Battery Operated Spray Pump Hamipatra PDF
सन २०२४-२५- राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृति योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप मला नामे मौजे ( ज्या व्यक्तीचे नावाने मंजूर झाले असेल त्याचे नाव लिहावे. ) ता. ( तालुक्याचे नाव लिहा ) जि.( जिल्ह्याचे नाव लिहा ) सर्व्हे क्र. ( शेताचे ७/१२ असेल किंवा / वन धारक प्रमाणपत्र धारक असेल त्यांनी सर्व्हे क्र. लिहा ) असून मला (कापूस /सोयाबीन पिकासाठी) बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप सुस्थितीत मिळाला असून सदरिल फवारणी पंपाचा मी दुरुपयोग करणार नाही व विक्री करणार नाही.सदरिल फवारणी पंपाचा दुरुपयोग केल्यास किंवा विक्री केल्यास शासनाच्या नियमानुसार मी योग्य कार्यवाहिस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे.
करिता हमिपत्र लिहून देण्यात येत आहे.
- ठिकाण:-
- दिनांक:-
- स्वाक्षरीः-
- नाव:-
- मोबाईल क्र.:-
कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- वन प्रमाणपत्र धारक ( वन हक्क दावा)
- अनुसूचित जाती / जमाती चा दाखला
- Battery Operated Spray Pump Hamipatra
Battery Operated Spray Pump Hamipatra PDF Download