५० % अनुदान योजनेत मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा ! |
मधमाशी पालन योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | ५० % अनुदान योजनेत मधमाशी पालन करा अन् मालामाल व्हा ! |
या योजनेचे नाव काय ? | मधमाशी पालन योजना |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 3 जानेवारी २०२४ मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जानेवारी २०२४ पर्यंत |
कोणत्या मंडळातर्फे ? | महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मध केंद्र योजना द्वारे |
या योजनेत किती % अनुदान दिले जाते ? | 50 % पर्यंत. |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव, सर्व नागरिक |
आधिकारिक वेबसाइट |
मधमाशी पालन योजना म्हणजे काय?
ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) राबविण्यात येत आहे. यात ५० टक्क्यांपर्यंत अनुदान साहित्याच्या स्वरूपात मिळणार असून, शेतकरी बंधुना राज्य सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी लाभार्थी निवड कशी आहे.
योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील; तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहणार आहे. जास्तीतजास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकान्यांनी केले आहे. साहित्य व प्रशिक्षणासोबतच शासनाच्या हमीभावाने मध खरेदी केली जाणार असल्याने यातून अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी मिळण्यास मदत होणार आहे.
मधमाशी पालनासाठी ५० टक्के अनुदान
पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशी संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मधमाशी पालन योजनेचे फायदे
हा व्यवसाय केल्याने लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो.
मधमाशीपालन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यक्ती करू शकतो.
शेतातील इतर उत्पन्न बरोबर मधमाशीपालन करून अधिक नफा करू शकतो.
मधमाशीपालनचे फायदे घेत घेत पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो.
अर्ज कोणाला करता येतो?
- शेतकरी : शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदार साक्षीदार असावा, वैयक्तिक स्वरूपात अर्ज करता येणार आहे.
- सुशिक्षित बेरोजगार: सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे, यातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
- संस्था : मधमाशी पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेल्या संस्थांनाही अर्ज करता येणार आहे.
मधमाशी पालन योजनसाठी ऑनलाई अर्ज करा.
कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँकेचे पास बुक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट साइज फोटो
- शेताचे कागदपत्रे
निकष पात्रता काय आहे?
- वैयक्त्तिक मधपाळ योजनेत स्वतःची शेती असल्यास प्राधान्य,
- वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
- केंद्रचालक योजनेत लाभार्थी केंद्रचालक असावा.
- किमान १० वी उत्तीर्ण असावा,
- वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे.
- लाभार्थी अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावे किमान एक एकर शेती असावी.
- भाडेतत्त्वावरील शेती, मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी,
- केंद्रचालक संस्था योजनेत संस्था नोंदणीकृत असावी,
- १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावरील एक एकर शेती आदी निकष आवश्यक आहेत.
योजेसाठी कुठे संपर्क करावा?
पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्यातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, या पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूरचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केले आहे.

निष्कर्ष :
आम्ही दिलेली ५० % अनुदान असलेली मधमाशी पालन माहिती नक्कीच आवडली असेल, तर इतरांना हि शेअर करा जेणेकरून शहरातील गावा खेड्यातील, लोकांना Madhmashi Palan Yojana : लाभ घेता येईल तसेच या योजनेपासून वंचित देखील राहणार नाही.