![]() |
PMGOV : जागतिक आरोग्य दिनापासून राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे आता राज्यातील कामगार रुग्णालये केवळ कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता, सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठीही खुली झाली आहेत.
यामुळे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना आता या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांचा लाभ घेता येणार आहे. मात्र, औषधांपासून ते अल्प सोयीसुविधांचा व रिक्त पदांमुळे आधीच शेवटची घटका मोजत असलेल्या या रुग्णालयाचा रुग्णांना लाभ कसा मिळणार, हा प्रश्न आहे.
प्रारंभी स्त्री रुग्णांवर उपचार
योजनेच्या सुरुवातीला महिला रुग्णांना उपचारासाठी विशेष प्राधान्य. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना आता चांगल्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.आधीच शेवटची घटका मोजत असलेल्या या रुग्णालयाचा रुग्णांना लाभ मिळणार?
- महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड आवश्यक
- उपचार आणि शस्त्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी योजनेचे कार्ड असणे अनिवार्य.
- या योजनेच्या प्रारंभी, विशेषत्वाने महिला रुग्णांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या समस्यांना प्राधान्य देत त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.
गरिबांचा वेळ, पैसा वाचणार
आता गरीब आणि गरजू नागरिकांना दर्जेदार उपचार त्यांच्याच परिसरातील कामगार विमा रुग्णालयात मिळणार आहे. ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.योजना चांगली परंतु रिक्त पदे, सुविधांचे काय ?
नागपूरच्या कामगार विमा रुग्णालात १० बेडचे आयसीयूचे बांधकाम होऊन व उपकरणे येऊन वर्षे झाले, परंतु अद्यापही हा विभाग कुलूपात आहे. त्यामुळे अपघातातील गंभीर जखमी किंवा प्रसूती दरम्यान गुंतागुंत झालेल्या रुग्णांना ठेवणार कुठे आहे, हा प्रश्न आहे.दुसरीकडे रुग्णालयातील ३३२ मंजूर पदांपैकी तब्बल १६८ पदे रिक्त आहेत. शिवाय, सोयी-सुविधाही तोकड्या आहेत. परिणामी, आलेल्या रुग्णाला 'रेफर' करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शासनाची ही योजना फोल ठरण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
कामगार विमा रुग्णालय आता सर्वांसाठी खुले
आता ईएसआयसी रुग्णालयात केवळ कामगारांनाच नव्हे, तर महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना उपचार घेता येणार आहेत.जागतिक आरोग्य कार्ड नानिमित्त घोषणा
आरोग्य सर्वांसाठी या ध्येयाने प्रेरित होऊन, जागतिक आरोग्य दिनी कामगार रुग्णालयांमध्ये या योजनेचा शुभारंभकरण्यात आला. या योजनेंतर्गत, मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.९९६ गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया
सुरुवातीला ९९६ गंभीर आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हेही वाचा :
- Jan arogya card download
यामध्ये हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार आणि अपघातातील जखमींवर उपचाराचा समावेश असणार आहे. योजनेच्या यशस्वी कार्यान्वयन नंतर उपचारांच्या यादीत आणखी वाढ केली जाऊ शकते