![]() |
pmgov : ऑनलाइन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या एका प्लॅटफॉर्मने २०२४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात स्त्रीरोगविषयक ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून सल्ला घेणाऱ्या महिलांत ६० टक्के महिला २५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत.
सर्वेक्षणाचा हा कल २०१८ मधील सर्वेक्षणाच्या आकडेवारीला छेद देणारा आहे. या सर्वेक्षणानुसार २४ टक्के महिलांनी कधीही प्रसूती किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतलेला नव्हता.
'प्राक्टो' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने केलेल्या या सर्वेक्षणानुसार अॅपवर ऑनलाइन वैद्यकीय सल्ला Online Arogya Seva घेणाऱ्या महिला २५ ते ३४ वर्षे वयोगटातील घेणाऱ्यांत १९ टक्के प्रमाण स्त्रीरोगविषयक सल्ला घेणाऱ्यांचे आहे.
हे प्रमाण जनरल फिजिशियन्सचा ऑनलाइन सल्ला घेणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे वंध्यत्व, गर्भपात, अनियमित पाळी अशा अडचणींवर महिला आता मोकळेपणाने वैद्यकीय सल्ला घेऊ लागल्या आहेत.
मानसिक आरोग्य टॉप सर्चमध्ये Online Arogya Seva
गर्भधारणा किंवा हार्मोन्सबाबत तरुण महिलांत अधिक जागरूकता निर्माण झाली असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. याशिवाय मानसिक आरोग्य हा सर्वांत संवेदनशील विषय ठरला असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच विवाहविषयक समुपदेशन आणि वैयक्तिक थेरपी हे विषय टॉप सर्चमध्ये आहेत.