Complaint application form regarding various facilities available in government college, hospital : शासकीय महाविद्यालय, रुग्णालयात विविध सोयी-सुविधा उपलब्ध बाबत तक्रार अर्ज नमुना.
प्रती,मा. अधिष्ठाता, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार.
अर्जदार :
संपूर्ण पत्ता :
मोबाईल नं :
विषय :- शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार रुग्णालयात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणेबाबत.
मा.महोदय,
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून सर्वसामान्य जनतेला सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टरांची सेवा मिळणे, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाद्वारे योग्य रोगनिदान करणे यासारखे तात्काळ व योग्य उपचार मिळणे यासाठीच या आदिवासी बहुल जिल्ह्याला मेडिकल कॉलेज स्थापन करून जिल्ह्यातील लोकांना योग्य अशा आरोग्य सुविधा पुरवणे यासाठीच हे मेडिकल कॉलेज स्थापन केले गेलेले आहे.
परंतु या सर्व सुविधा या जिल्ह्यातील गरीब आदिवासी जनतेला मिळत नसल्याचे संघटनेच्या निदर्शनात आलेले आहे त्यामुळे या सर्व आरोग्य सुविधा जनतेला मिळाव्या म्हणून संघटना खालील मागण्यांकडे आपले लक्ष वेधत आहे.
1) शासन नियमाप्रमाणे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शासकीय रुग्णालय परिसरामध्ये राहण्याकरता/थांबण्याकरता योग्य अशी सुविधा निर्माण करून देण्यात यावी.
तसेच रुणांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहाची पुरेशी व्यवस्था करावी.
2) औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना योग्य अशी आरोग्य सुविधा पुरवणे तेथील स्टाफला अडचणीचे जात आहे व यामुळे गरीब जनतेला सुद्धा बाहेरून औषधे आणून आर्थिक भार सहन करावा लागत आहे व गरीब जनतेजवळ पैसे नसल्याकारणाने ते शासकीय मेडिकल कॉलेज येथे येत असतात. पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध नसल्याकारणाने रुग्णांची गैरसोय सुद्धा होत आहे. त्यामुळे आवश्यक असा सर्व औषधी साठा रुग्णांना तात्काळ पुरवण्यात यावा.
3) एक्स-रे व सोनोग्राफी विभागात एकच तज्ञ डॉक्टर असल्यामुळे सोनोग्राफी, एक्स-रे, एम. आर. आय व सिटी स्कॅन इत्यादी सेवा तत्कालिक उपलब्ध होत नाहीत. वया तपासण्या वेळेवर न झाल्यामुळे रुग्णाच्या आजाराचे योग्य असे निदान लागण्यास वेळ लागतो व पर्यायाने रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे याकरिता लागणारे आवश्यक डॉक्टर व तज्ञ यांची लवकरात लवकर नियुक्ती करावी.
4) रुग्णालयामधील सर्व कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरावी व रुग्णांची गैरसोय टाळावी.
5) रुग्णालयीन व महाविद्यालयीन कंत्राटी कर्मचारी यांचे 5 महिन्यापासूनचे वेतन अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाही. संघटनेस मिळालेल्या माहितीप्रमाणे महाविद्यालयीन क्लास 3 कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनाचे चुकीचे बिल जाणीवपूर्वक आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांनी पाठवल्यामुळे आतापर्यंत त्यांचे वेतन झालेले नाही.
संबंधित कर्मचारी यांना याविषयी समज देण्यात यावी व अशा कामचुकार कर्मचारी यांची या आस्थापनेवरून तात्काळ बदली करण्यात यावी.
नियमित वेतन न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक तणावमधून जावे लागत आहे. यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि याचा परिणाम रुग्णालयीन दैनंदिन कामकाजावर होऊन रुग्णालयातील साफसफाईची कामे तसेच रक्त तपासण्या व इतर कामावर त्यांचा परिणाम होऊन रुग्णांना हा सहन करावे लागू शकते. म्हणून या सर्व रुग्णालयीन व महाविद्यालयीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ करण्यात यावे.
6) रुग्णालयीन कर्मचारी खासकरून महिला कर्मचारी यांचे करता प्रत्येक वार्डामध्ये स्वतंत्र वाशरूमची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. अलीकडे पश्चिम बंगाल येथील कलकत्ता आर.जी.मेडिकल कॉलेज येथे घडलेल्या घटनेतून आपण काहीतरी बोध घ्याल व या महिला कर्मचारी यांचे करता प्रत्येक वार्डामध्ये वाशरूमची व्यवस्था तात्काळ करून द्याल ही विनंती.
सदरील आरोग्य सुविधा जनतेला तात्काळ उपलब्ध करून द्याल तसेच रुग्णालयीन कर्मचारी यांच्या समस्या तात्काळ निकाली काढाव्यात याकरिता आम्ही हे निवेदन आपणास देत आहोत.
संघटन चर्चेद्वारा वरील विषय निकाली काढू इच्छिते. त्यामुळे या पत्राद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की संघटनेस चर्चेकरिता 7 दिवसाच्या आत वेळ द्यावा अन्यथा दिनांक 30/08/2024 ला संघटने द्वारा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
सदर आंदोलन हे संविधानिक व शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे आपली व आपल्या कार्यालयाची बदनामी झाल्यास यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल.
धन्यवाद.
वरील तक्रारी अर्ज हा आम्हाला whatsapp ग्रुप मधून मिळालेला आहे. तसेच जर का आपणास आपल्या जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय, रुग्णालयात विविध सोयी-सुविधा उपलब्ध बाबत तक्रार अर्ज करावयचा असल्यास हा नमुना वापरू शकता.
खालील माहिती देखील वाचू शकता ?
निष्कर्ष
शासकीय महाविद्यालय, रुग्णालयात विविध सोयी-सुविधा उपलब्ध बाबत तक्रार अर्ज नमुना मोफत माहिती उपलब्ध करून देत आहे. Complaint application form regarding various facilities available in government college, hospital हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us