नावात चूक झाली. बदलायची कशी |Navat Chuk Zali Badlayachi Kashi
Admin
3:27 AM
0
नावात चूक झाली. बदलायची कशी असे झाले तर ? नावात बदल करायचा असेल तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती. (शैलेश पावरा सामाजिक कार्यकर्ता.) Navat Chuk Zali Badlayachi Kashi :
बाळाच्या जन्मानंतर नाव नोंदणी झाल्यापासून अगदी मृत्यूची नोंद होईपर्यंत एक ना अनेक शासकीय कामांसाठी ओळखपत्राची गरज असते. कधी वारसदार म्हणून तर कधी आपण स्वतः तीच व्यक्ती आहोत हे सिद्ध करायलाही शासन दरबारी जावे लागते.
अनेकदा वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांवर एकच नाव अनेक प्रकारे लिहिले गेलेले असते. शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आणि रेशन कार्डवर नावात 'राव' किंवा 'बाई' असा नावाशिवाय उल्लेख असला तरीही याचा त्रास पेन्शन, पासपोर्ट, वारस नोंदी करताना होतो.
अंकशास्त्रीय) कारणासाठी नाव बदलणे
काही दा मूळ कागदपत्रात नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या असतात. काहींना आपले नाव किंवा आडनाव आवडत नसते म्हणून ते बदलतात. लिंगबदल केलेल्या व्यक्तीही आपले नाव बदलतात. न्यूमरॉलॉजिकल (अंकशास्त्रीय) कारणासाठी नाव बदलणे हा प्रकारही सुरू झाला आहे.
नावात बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
नाव बदलल्यानंतर त्याची कायदेशीर नोंद करणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर असते. अशी नोंद केल्यावर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड बैंक अकाउंटस मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना आणि इतर अनेक ठिकाणी नावात बदल करता येतात.
नावात बदल करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे.
नावात बदल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सोपी आहे, शिवाय यासाठी फारसा खर्चही येत नाही, पण ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही दिवस अथवा महिनेही लागू शकतात. ग्रामपंचायत/नगरपालिका/महापालिकेच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
गॅझेटमध्ये नाव बदलायचे
तिथे नोंद झाल्यावर गॅझेटमध्ये नाव बदलल्याची जाहिरात प्रसिद्ध करावी. या संपूर्ण प्रक्रियेची तपशीलवार माहिती स्थानिक इ सेवा केंद्र, नोटरी यांच्याकडे मिळू शकते.