![]() |
सातपुड्यात देवाची होळी पेटली, होलिकोत्सवाला प्रारंभ पर्यटकांचे आकर्षण, नवागाव होळी 12 रोजी तर 13 तारीख ला न्यू बोराडी, चोंदीपाडा येथील होळी आहे, पहाटे होळी पेटवण्यात येणार.
Holi Festival 2025 : आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असलेल्या होलिकोत्सवाला सातपुड्यात मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. शिरपूर तालुक्यातील (बुडकी) नवागाव येथील प्रसिद्ध देवाची होळी पहाटे पेटवण्यात येणार. त्यानंतर आता आगामी महिनाभर जागोजागी भोंगऱ्या बाजारांसह होळी पेटल्यानंतर मेलादे होणार आहेत.
धडगाव तालुक्यातील ९ मार्च रोजी डाब येथील मोरीराही ही देवाची होळी देखील साजरी झाली. पुढे काठी येथील राजवाडी होळीची प्रतीक्षा आदिवासींसह पर्यटकांना आहे. यंदा काठीच्या राजवाडी होळीसह, बिजरी येथील होळी विशेष आकर्षण ठरणार आहे. १३ मार्च रोजी संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली सातपुड्यातील काठी येथील राजवाडी होळी साजरी करण्यात येणार आहे.
होळी, भगोरिया महोत्सन काय आहे.
सातपुड्याच्या कुशीत एकाच दिवशी होळी पेटविली जात नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवण्याची परंपरा आहे.सातपुड्यात देवाची होळी पेटली, होलिकोत्सवाला प्रारंभ : Holi Festival 2025
धडगाव तालुक्यातील डाब येथे रविवारी पहिली होळी पेटल्यानंतर होळीभोवती फेर धरुन विविध ढोल पथकांनी पारंपरिक वेशभुषेत नृत्य सादर केले.सातपुड्यातील होळीचे वेळापत्रक
होळी महोत्सव नवागांव – Holi Festival 2025
परिसरातील तमाम हिंदु, व समाज बांधवांना दुकानदारांना व ढोल, वादय, होळी मानतेचा बंधन बांधणाऱ्या व संस्कृतीचे जतन करणाऱ्या समाजबांधवांना कळविण्यात अत्यंत आंनद होत आहे की, परंपरेने चालत आलेल्या नवागांव गावाची देवाची होळी पुजन महोत्सव या वर्षी ही दिनांक 12/03/2025 रोजी रात्री पासून सुरु होणार आहे.
![]() |
या निमित्ताने देवाची होळी मैदान नवागांव येथे खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे....
कार्यक्रमचे रुपरेखा
रात्री 8 ते 10 वाजता ढोल गेर (गेल्या) उपस्थित रात्री 11 ते 4 वाजता आदिवासी परपरेनुसार ढोल वाजंत्री, बाबा बुध्या, गेर (गेल्या) यांचे नाच गाणे पहाटे 5 वाजता होळी पुजन व दहन
- होळी : 12-03-2025 रोजी बुधवार
- भोंगऱ्या (मेलादा) : 13-03-2025 रोजी गुरवार