राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (CET/JEE) प्रवेश परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण देण्याची योजना आदिवासी विकास विभागाने सुरू केली आहे.
![]() |
Adivasi Vikas Vibhag Yojana NEET CET JEE शासकीय प्रसिद्धी पत्र
असून या योजनेअंतर्गत, इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या मदतीने शासकीय आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांचे मार्गदर्शन केले जाणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
योजनेचा उद्देश काय?
आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना आयआयटी (IIT) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.कोठे कोठे मार्गदर्शन केंद्रे सुरू करणार?
असून शासकीय आश्रमशाळा मुढेंगांव/बोपेगांव (नाशिक प्रकल्प) नाशिक, एकलव्य शेडेंगांव (शहापूर प्रकल्प) ठाणे, शासकीय आश्रमशाळा चिंचघाट (पांढरकवडा प्रकल्प) अमरावती आणि शासकीय आश्रमशाळा सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) नागपूर या चार ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी प्रत्येकी 40 जागा उपलब्ध असतील.
योजनेसाठी पात्रता निकष:
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- तो अनुसूचित जमातीचा असावा आणि त्याच्याकडे जातीचा दाखला असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- विद्यार्थ्यांनी त्याच शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.
- मार्च 2025 मध्ये इयत्ता 10 वीची परीक्षा देणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.