![]() |
दिनांक ४ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत फत्तेपूर फॉरेस्ट येथील सर्व गावकऱ्यांची सभा पार पाडण्यात आली. यात भोंगऱ्या बाजार व होळी सणा निमित्त चर्चा करण्यात आली. यात विशेष करून होळी व्रत धारकांना गावातील पंचमंडळी करून विशेष सूचना देण्यात आले आहे.
Adivasi Samaj Bhongarya Bajar Holi Utsav
खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहे.
- १) होळी पाच दिवसांची राहील.
- २) होळीत परंपरेने चालत आलेले पात्र बावा- बुद्या गेर बनण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
- ३) आवश्यक असल्यास मंडली मध्ये एक काली (होळी) माता, एक रिसळा/ निस्क्या (स्थानिक आदिवासी शब्द) राहतील.
- ४) आदिवासीची संबंधित असलेले पात्र बनू शकतात जसे की, याहा मोगी, कणी माता, बेनू हेजा, वाघदेव, नागदेव, अग्निदेव, वृक्ष देव, जलदेव, वायू देव, जननायक बिरसा मुंडा इत्यादी.
- ५) आदिवासी समाजाची मान शर्मेने खाली जाईल असे कैदी , चोर , लुटारूचे पात्र बनू नये.
- ६) डांबरी रस्त्यावर, लहान - मोठी वाहन असल्यास गाडी अडवून पैसे मांगू नये.
- ७) आपल्या गावाचे तालुक्यात उंच मानाने नाव येईल, वा गावाचे नाव लौवकिक होईल असेच काम करावे.
- ८) होळी पाच दिवसांची असेल कोणाच्या भावना दुखेल असले कृत्य करू नये.
- ९) गावातील गाव पाटील - गाव डायला यांचे शब्दांचा मान राखावे.
- १०)
वरील 6 पासून ते 9 पर्यंत ज्या सूचना दिल्या आहे. त्या महत्वाच्या वाटल्या होत्या म्हणून टाकल्या जर आपणास योग्य नाहीसे वाटल्यास त्या delete मारल्या जातील त्या साठी खाली कमेंट सेक्शन आहे. तेथे कमेंट करू शकता.
टीप : वरील 10 नंबर वर आपली प्रतिक्रिया काय योग्य वाटेल ते सांगावे नक्कीच लिहिले जाईल. तसेच आपल्या आदिवासी समाजाच्या दररोज अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या WhatsApp ग्रुप ला चॅनेल ला जॉईन व्हा ला.
हेही वाचा : 👉🏻 आदिवासी समाजाचे भोंगऱ्या बाजार व होळी सणाची माहिती वाचा.
Adivasi Samaj Bhongarya Bajar Holi Utsav होळी पारंपारिक वेशभूषेतचा आनंदात साजरा करणे बाबत.
- प्रति.
- मा.गाव पाटील
- मा.गाव पुजारा
- मा.गाव डायला
- मा.गाव वारती
- मा.कारभारी
- मा.कामदार
महोदय,
जोहार जय आदिवासी.....
आपणास माहीतच आहे की काही दिवसात सातपुड्यातील आदिवासीचा सर्व्यात मोठा व महत्वाचा सण उत्सव म्हणजे होळी येत आहे.
विशेष दुसरे काय हि नाहीं पण आपल्या गावा मधील तरुण मंडळी विकृती संस्कृती स्वीकारली आहे त्यास आळा घाला हीच विनंती मूळ संस्कृती सोडून उगीच रिकामे वेशभूषा धारण करून महिला भगिनींचे मान खाली होईल अशी असे करू नये गावातील पांच पंच मंडळी ने या कडे जातीने लक्ष घालावे व आपली संस्कृती कशी वाचेल या कडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल
जे पारंपारिक वेशभूषा आहेत तेच असू द्यावे जर ते नसतील आवडत तर जेही आदिवासी देवी देवता क्रांतिकारी आहेत त्यांचे हि इतिहास समाजा समोर आणले तरी समाजाचे ऋण आपणं फेडू शकतो पण काही महाभाग आहेत ते तर सर्व आगळे वेगळेच करतात की ज्याची आपण उच्चार हि करू शकत लिखाण हि करू शकत असे असतात
म्हणून येणारी पिढीला होळी काय असते त्यात कोण कोणते रुपधारण,वेशभुषा असते हे कडणे आवश्यक आहे* म्हणून सर्व गावकरी मंडळींना माझी कड कडीची विनंती राहील की आपण आता होळीचा निर्णय घेण्यासाठी आज उद्या बसणारच आहोत त्यात ठाम पणे आपण संस्कृती जोपसण्याबद्दलचाच योग्य निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो
आपलाच समाज बांधव
दशरथ पावरा