![]() |
परभणी : अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते. तांत्रिक मान्यतेसाठी विहिरी रखडल्या नसल्या तरी अनुदान वेळेवर मिळत नसल्याने विहिरींची कामे करण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात यदा दोन्ही योजनांच्या माध्यमातून २५ विहिरींचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अनुसुचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांची २०२४-२५ वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून आर्थिक लक्षांकानुसार २०० विहिरींचे भौतिक उद्दिष्ट देण्यात आले आहे.
त्यापैकी १५६ विहिरींना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी २२ विहिरींचे काम सुरू आहे. यात अद्यापपर्यंत १०९ सिंचन विहिरींचे काम सुरु झाले नसल्याचे कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन पुढे आले आहे.
![]() |
एका लाभार्थ्यास किती अनुदान ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहीर खोदकामासाठी यापूर्वी २ लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात होते. आता यात वाढ करण्यात आलेली असून, हे अनुदान ४ लाख रुपये करण्यात आलेले आहे. सदर अनुदान लाभार्थीच्या बँकेत जमा होते.
प्रमाणपत्राअभावी कामे रखडली का?
जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षणाकडून प्रमाणपत्राअभावी कामे होत नसल्याचे म्हटले जात असले, तरी स्थिती यावर्षी तरी इदभवलेली नाही. त्यामुळे विहिरी खोदण्यासाठी अडचणी येणार नाहीत, अशी शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांत विहिरींचे खोदकाम सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
विहिरींची कामे उन्हाळ्यातच का करतात?
पावसाळ्यात खोदकाम करताना अडचणींचा सामना करावा लागातो. त्यामुळे विहीर खोदकाम, बांधकाम करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरींचे बांधकाम केले जाते. जिल्ह्यात २५ विहिरींची कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
२२ विहिरी : Birsa Munda Krushi Kranti Yojana And Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
जिल्ह्यात २०२४-२५ वर्षासाठी १५६ विहिरींना कार्यरंभाचे आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र २२ विहिरींचे काम सुरू असून १०९ विहिरींचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले.
![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून किती विहिरी?
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवन उंचावणे, त्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जाते.
जि.प. कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात असून, ५ विहिरींना मंजुरी दिली असून तीन विहिरींचे काम सुरू आहे.
पाणीपातळीचा विचार करून कामे व्हावीत.
पाणी शोधण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा आजही वापर होत आहे. भूजल पातळी ज्या भागात कमी झाली आहे अशा गावात पाणीपातळीत वाढ होण्यासाठी प्रयत्न हवेत. प्रमाणपत्रांमुळे मंजुरी रखडलेल्या नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जलसाठ्यासाठी प्रयत्न गरजेचे
ज्या गावात भूजलपातळीत घट झाली आहे. अशी गावे पाणलोट सुरक्षितमध्ये मोडत नाहीत. त्या गावामध्ये पाणीपातळीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. यासाठी ग्रामस्थांनी जागरुक होऊन जलसाठा होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. (Birsa Munda Krushi Kranti Yojana And Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana)