Pm gov : महिन्याला तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी केंद्र सरकार यांनी 'Pm Surya Ghar Yojana | pm suryagarh gov in login' ही मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत छतावर सौरऊर्जानिर्मिती युनिट बसवून मोफत वीज मिळवणाऱ्या ग्राहकांना आता महावितरणकडून नेट मीटरही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आता नेट मीटर मोफत
महावितरणने आता ग्राहकोना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना मोबाइलवरच सर्व माहिती उपलब्ध होईल. यापूर्वी हे नेट मीटर वीज ग्राहकांना विकत घ्यावे लागत होते.
शासनाची सबसिडी किती?
एक किलो वॅटसाठी ३० हजार, दोन किलो वॅटसाठी ६० हजार, तर तीन किलो वॅटसाठी जास्तीतजास्त ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळेल.
कोणाला घेता येतो लाभ?
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत ज्या ग्राहकांनी आपल्या घरावर सौरऊर्जानिर्मिती युनिट बसवून घेतले आहे, अशा ग्राहकांना नेट मीटरचा लाभ घेता येईल.
जिल्ह्यात 4227 घरांवर तयार होते वीज
जिल्ह्यात 4227 ग्राहकांनी या योजनेंतर्गत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविले आहेत. या सर्व ग्राहकांच्या घरावर एकूण 16.97 मे. वॅट वीज तयार होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधी विकत घ्यावे लागत होते नेट मीटर
घराच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविल्यानंतर सौर प्रकल्पात किती वीज तयार झाली, किती वापरली गेली आणि किती अतिरिक्त्त वीज विकली गेली, यासाठी ग्राहकांना नेट मीटर विकत घ्यावे लागत होते.
Pm Surya Ghar Yojana Apply Link
Pm Surya Ghar Yojana | pm suryagarh.gov.in login प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. या योजनेतील लाभार्थ्यांना आता नेट मीटर मोफत देण्यात येणार आहे. जास्तीतजास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- विकास आढे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण,