Mukhyamantri Tirth Darshan Yojana | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पुण्य पदरी पडले आर्थिकदृष्ट्या असक्षम नागरिकांना मोफत यात्रेची सुविधा.
PM Gov : आर्थिकदृष्ट्या असक्षम नागरिकांनाही देशातील तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करता येणार आहे. राज्यातील सर्वधर्मीयांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत तीर्थयात्रा करता येणार आहे. भारत देशातील एकूण ७३ व राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana यांच्यासाठी आहे.
राज्यातील सर्वधर्मीयांमधील ६० वर्षांवरील नागरिकांना भारतातील तीर्थस्थळांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असून, निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana तीर्थस्थळे एकदाच मुभा
निर्धारित तीर्थ क्षेत्रांपैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा ३० हजार रुपये मिळतील. यामध्ये प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना मिळू शकतो.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana अर्ज कुठे करावा?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. मोबाइल Apps द्वारे किवा सेतू केंद्रातून विनामूल्य अर्ज सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसारित केली जाईल.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Apply Link Click Here
२.५ लाखांपेक्षर उत्पन्न जास्त नको लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक नसावे, अशी अट आहे.अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक...
- रेशन कार्ड.
- मतदार ओळखपत्र.
- जन्म तारखेचा दाखला या चारपैकी एक ओळखपत्र वा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.