![]() |
नंदुरबार, दिनांक 14 जानेवारी 2025:
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, छायाचित्रण, दूरचित्रवाणी वृत्तकथा, समाज माध्यमातील योगदान आणि स्वच्छता अभियानासाठी जनजागृतीपर लेखनासाठी 2024 साठीची पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.Submit a proposal for the State Government Excellence in Journalism Award! स्पर्धेसाठी कालावधी:
👉 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित किंवा प्रसारित झालेल्या लेखन, छायाचित्रे आणि वृत्तकथांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.🗓️ प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
🏢 प्रवेशिका सादर करण्याचे ठिकाण:
स्पर्धकांनी अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, maharashtra.gov.in आणि mahasamvad.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करून, परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा माहिती कार्यालय, 206 नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे सादर करावेत.
🏆 पुरस्कार व स्वरूप:
- राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार:
- • 🌐 अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार: ₹1,00,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 📰 बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 📘 अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • ✒️ बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 🖋️ मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 🏛️ यशवंतराव चव्हाण शासकीय गट पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 📺 पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 📸 तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 📷 केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (शासकीय गट): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 🌐 समाज माध्यम पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 🚮 स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
- • 🖌️ पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार: ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
🎖️ विभागीय पुरस्कार:
राज्यातील विभागीय पुरस्कारांचे स्वरूप:
• 🏅 दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद व लातूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
• 🏅 ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर): ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
🎤 जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत Ranjitsing Rajput यांचे आवाहन
“जिल्ह्यातील पत्रकार, आणि छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वेळेत प्रवेशिका सादर करणे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
📢 स्पर्धकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा! आपल्या कामगिरीला मिळवा राष्ट्रीय व राज्यस्तरीय बहुमान !
#पत्रकारिता_पुरस्कार
#महाराष्ट्रशासन
#ExcellenceInJournalism #JournalismAwards2024 #DistrictInformationNandurbar