पीएम कुसुम सौर अनुदान योजना 2024: शेतात सौर पॅनेल बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार देत आहे. 75% अनुदान अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

PM Kusum Solar Subsidy Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार आदिवासी बांधवांना आणि कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पीएम कुसुम सौर अनुदान योजना सुरू केली आहे, या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी 75% अनुदान देत आहे. या योजनेद्वारे 3 HP, 5HP, आणि 7.5HP च्या सौरपंपांवर शासनाकडून अनुदान दिले जात असून, 40 लाख शेतकऱ्यांना पीएम कुसुम सौर अनुदान योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पीएम कुसुम सौर अनुदान योजना : PM Kusum Solar Subsidy Yojana 2024
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात, 18.5 लाख सौर पॅनेल देण्यात येणार होते, जे आदिवासी बांधवांना आणि कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणखी वाढ करून सौरऊर्जा पॅनेल देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या कडे ७/१२ उतारा असेल किंवा वनदावे म्हणजे वन हक्क प्रमाणपत्र असेल तरी तुमच्या शेतात सौर पंप बसवू शकता. जर तुम्हाला सौर पॅनेल या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, पीएम कुसुम सौर अनुदान योजनेशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पीएम कुसुम सौर अनुदान योजना ची मुदत वाढ किती आहे?
महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार पीएम कुसुम योजनेअंतर्गत, नोंदणी करण्याचे आव्हान केलेले आहे. तसेच २०२४ च्या चालू वर्षात प्रत्येकी जिल्ह्यात शेतकरी बांधव याचा जास्त लाभ घ्यायला पाहिजे म्हणून अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देखील केलेली आहे.
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेचे उद्दिष्ट
आपल्या सर्वांना माहीत आहे की, महाराष्ट्र मध्ये उन्हाळ्यात काही गावात दुष्काळ पडला होता. आणि तेथील शेतकऱ्यांना शेतात पेरणी केल्यानंतर दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पीएम कुसुम सौर अनुदान योजना सुरू केली आहे. ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे कि, जे आदिवासी बांधव शेती करत आहे ते आणि कृषी क्षेत्रातील शेतकरी बांधव यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून ते आपल्या शेतात चांगले सिंचन करू शकतील, या योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेचे लाभार्थी
- 1. ७/१२ उतारा असलेले शेतकरी
- 2. वन हक्क प्रमाणपत्र धारक शेतकरी.
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेचे फायदे
- 1. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- 2. 3HP, 5HP, 7.5HP सवलतीच्या दरात सिंचन पंप उपलब्ध करून देणे.
- 3. कुसुम योजनेच्या पहिल्या टप्प्यात सिंचन पंप सौरऊर्जेवर चालवले जातील.
- 4. या योजनेमुळे 3HP, 5HP, 7.5HP अतिरिक्त मेगावॉट वीज निर्माण होईल.
- 5. या योजनेंतर्गत बसवलेल्या सौर पॅनेलसाठी सरकार 75% अनुदान देईल, शेतकऱ्यांना फक्त 25% भरावे लागेल.
पीएम कुसुम सौर अनुदान योजना अर्ज फी
या योजनेंतर्गत, अर्जदाराला सौर पॅनेलसाठी अर्ज केल्यानंतर सर्वे झाल्या नंतर पेमेंट करण्याच्या Option येईल मगच समजेल कि सौर अनुदान योजना अर्ज फी किती आहे. तसेच 3HP, च्या सौर पॅनेल 5HP, च्या सौर पॅनेल आणि 7.5HP च्या सौर पॅनेल साठी कमी जास्त पैसे भरावे लागतील.
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- 1. आधार कार्ड
- 2. बँक खाते पासबुक
- 3. पासपोर्ट आकाराचा फोटो
- 4. अनुसूचित जाती/ जमाती असल्यास ( जातीचा दाखला)
- 5. जमीन संबंधित कागदपत्रे 7/12 उतारा
- 6. वन धारक असाल तर वन हक्क प्रमाणपत्र
- 7. मोबाईल नंबर
- 8. पाण्याचा दाखला
- 9. शेताचा नकाशा
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
पीएम कुसुम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या माहिती प्रमाणे अर्ज करावा लागेल.
- 1. पीएम कुसुम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- 2. यानंतर, वेबसाइटच्या होम पेजवर Maharashtra राज्य निवडा आणि ऑनलाइन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा.
- 3. तुम्ही क्लिक करताच, पीएम कुसुम सौर अनुदान योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
- 4. यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, टाकावा लागेल, नंतर नाव, लिहावे लागेल, मोबाईल नंबर इत्यादी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल.
- बँकेची माहिती नाव, लिहावे लागेल, विचारेल ती माहिती टाकावी लागेल.
- 5. त्यानंतर तुम्हाला सबमिट करावा लागेल.
- 6. यानंतर नोंदणी करण्यासाठी एक OTP येयील तो टाकावा लागेल.
- 7. त्यानंतर मोबाईल वर एक MK नंबर आणि पासवर्ड येईल.
- 8. MK नंबर आणि पासवर्ड आलेला आहे म्हणजे नोंदणी झालेली आहे असे समजावे.
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावे ?
पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी अर्ज करावयाच्या असल्यास तुम्हाला आपल्या जवळील क्षेत्रात सेतू केंद्राला भेट द्यावी लागेल. त्यांना सांगावे लागेल, कि मला पीएम कुसुम सौर अनुदान योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे ते नक्कीच करून देणारा. त्या साठी आजच भेट द्या.
खालील शासकीय योजनांचे माहिती देखील वाचा :
निष्कर्ष :
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनो आम्ही तुम्हाला PM Kusum योजना च्या संपूर्ण माहिती आणि अधिकृत वेबसाइट https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B दिलेली आहे. त्या साठी आजच नोंदणी करा. अशाच सध्या चालू असलेल्या शासकीय योजना च्या नवनवीन माहिती आम्ही आमच्या सोसिअल मेडिया ला शेअर करत असतो. म्हणून सांगत असतो कि आजच जॉईन व्हा.