बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया
महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सुरू झालेली आहे. बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती? इत्यादी संपूर्ण माहिती संबंधित लेखामध्ये देत आहे. तसेच महाडीबीटी शेतकरी पोर्टल ची अधिकृत संकेतस्थळ देखील उपलब्द करून देत आहे. आणि नवीन नोंदणी कशी करावी हे देखील आपणास देत आहे.MahaDBT Farmer Battery Favarni Pump Yojana : शेतकरी फवारणी पंप योजना
महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या (agricultural machinery) हस्तचलित व स्वयंचलित उपकरणासाठी अनुदान, ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांवर अनुदान तत्वावर विविध योजना राबविण्यात येतात. आता शेतकऱ्यांना (Battery Favarni Pump Yojana ) बॅटरी फवारणी पंपासाठी सुलभ पद्धतीने करता यावी यासाठी 100% अनुदानावर दिला जाणार आहे.
कृषी आयुक्तालयाची प्रेस नोट दि. ०६ ऑगस्ट, २०२४
कृषी आयुक्तालयाची प्रेस नोट विषयान्वये राज्य पुरस्कृत कापुस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी दि. 26 ऑगस्ट, २०२४ अखेर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणेबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सदर बाबीसाठी अर्ज करताना जवळपास १२ दिवस शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नसलेबाबत निदर्शनास आले आहे. याबाबत MahalT यांना पोर्टल सुरळीत करणेबाबत सूचित करण्यात आले होते.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप साठी मुदत वाढ ?
त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्य पुरस्कृत कापुस, सोयाबीन व इतर तेलविया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी "दि. 31 ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याबाबत आपले स्तरावरून योग्य ती प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. जेणे करून योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणे शक्य होईल. असे (विनयकुमार आवटे) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.बॅटरी संचलित फवारणी पंप नवीन नोंदणी कशी करावी?
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (Battery Favarni Pump) शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर सर्वप्रथम नवीन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर संबंधित उपकरणासाठी खालील प्रमाणे शेतकऱ्यांनी अर्ज करावा.
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अर्जासाठी आवश्यक कागदपत्र कोणते?
- जमनीचा 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- अनुसूचित जमाती वन हक्क प्रमाणपत्र धारक
- शेतकऱ्यांचा आधारकार्ड
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिकांची माहिती
- मोबाईल क्रमांक
बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी आँनलाईन अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम शेतकऱ्यांना MahaDBT Farmer येथे क्लिक करा पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला युजरनेम व पासवर्ड टाकावा लागेल.
- युजरनेम व पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होईल.
- लॉगिन केल्यानंतर कृषी विभाग या पर्यायात पुढील अर्ज करा हा ऑप्शन निवडावा.
- त्यानंतर तुमच्याकडे कृषी यांत्रिकीकरण, या पर्यायासमोरील बाबी निवडा
- कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय > मनुष्य चलित अवजारे बाबी निवडा
- > पीक संरक्षण अवजारे बाबी निवडा
- > बॅटरी संचलित फवारणी पंप बाबी निवडा
- असा पर्याय व्यवस्थित निवडून > जतन करा या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज जतन होईल.
- बॅटरी संचलित फवारणी अर्जासाठी तुम्हाला ऑनलाईन 23.60 पैसे इतकी रक्कम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा paytm, PhonePay Google Pay, इतर यूपीआयच्या माध्यमातून भरावी लागेल.
- पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्ज केल्याची पावती भेटून जाईल.
- बॅटरी संचलित फवारणी अर्ज केल्यानंतर पुढील काही दिवसात लॉटरी पद्धतीने तुमची निवड होईल.
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीसाठी मुदतवाढ देणेबाबत कृषी आयुक्तालयाची प्रेस नोट जाहीर खालीलप्रमाणे आहे.
निष्कर्ष
बॅटरी फवारणी पंप योजना सुरू; 100 टक्के अनुदान, ऑनलाईन अर्ज कसा करावा याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. MahaDBT Farmer Favarni Pump Yojana 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.
Follow Us