Pm gov : पिकांवर फवारणीसाठी शेतकऱ्यांना आता मजूर शोधण्याची किंवा स्वतः फवारणी करण्याची गरज नाही. शासनाकडून यासाठी ड्रोन दिले जात असून, त्यावर चार लाखांचे अनुदानही मिळत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जात आहे.
सन २०२४-२५ साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत Drone Favarni यंत्र खरेदीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्यात आले असून लक्षांकही तितकेच होते. मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांना शासनातर्फे विविध योजनांद्वारे अनुदान दिले जाते.
कोणाला अनुदान मिळणार?
Drone Favarni साठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना अर्ज करता येणार आहे.
काय आहे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान?
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते.
Drone Favarni काय फायदा?
- एक कृषी स्प्रे Drone Favarni ज्याला मानवरहित हवाई वाहन म्हणूनही ओळखले जाते. याचा वापर पिकांवर कीटकनाशके, तणनाशके आणि खते अचूकपणे करण्यासाठी करतात.
- अचूक उपचार देऊन, Agriculture Drone Favarni केल्याने रासायनिक वापर कमी होतो.
- एकूण पर्यावरणीय प्रभाव कमी होतो. यामुळे शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळते आणि मातीची गुणवत्ता आणि पाण्याचे स्रोत जपण्यास मदत होते.
Drone Favarni साठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज
Maha DBT Portal लॉग इन करा, नंतर कृषी यांत्रिकीकरण या घटकातून ड्रोनसाठी अर्ज करावा. शेतकरी योजना टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज नोंदणीवर क्लिक करावे. नोंदणी पृष्ठावर तपशील प्रविष्ट करून नोंदणी करावी.
Maha DBT Portal Status
Maha DBT Portal वर जाऊन Application ट्रॅकिंग मेनूखाली, अर्जदार वैध Application आयडी टाकून त्यांच्या अर्जाची स्थिती पाहू शकतो.
Drone Favarni मुळे विषबाधेचा धोका कमी होणार
- जिल्ह्यात विविध पिकांवरील कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली.
- यात शेतकरी, तसेच शेतमजुरांना विषबाधा झाली त्याचे परिणाम जिल्ह्यात अजूनही अनुभवयास मिळतात.
- शिवाय गेल्या काही काळात मनुष्यबळही कमी झाले आहे. ड्रोन फवारणीने विषबाधेचा धोका कमी होण्यास मदतच होईल.
आत्तापर्यंत जिल्ह्यात Drone Favarni साठी तालुक्यातील दोन लाभार्थीना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित सात ते आठ लाभार्थी प्रलंबित आहेत.
Agriculture Drone Favarni Subsidy या लाभार्थ्यांना २०२४-२५ या वर्षापासून महा डिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सूचित केले करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी दोन ड्रोनचे लक्षांक देण्यात आले होते. ते पूर्ण झाले आहे. भविष्यात लक्षांक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे., जिल्हा कृषी अधीक्षक