लखपती दीदी योजना । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये आज जळगाव मध्ये लखपती दीदी संमेलनात (Lakhpati Didi Yojana) सहभागी होणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते लखपती दीदींना प्रमाणपत्र वाटप आणि सत्कार करण्यात येणार आहे.
लखपती दीदी या आर्थिक यशापलीकडे, ते दत्तक घेण्याद्वारे प्रेरणा देतात ...
ग्रामीण विकास मंत्रालयाकडून योजना सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत १ कोटी महिला लखपती झाल्यात तर ज्याचे वार्षिक घरगुती उत्पन्न ₹1,00000 पेक्षा जास्त आहे स्वयं-मदत गटाच्या सदस्या आहेत. एकूण ३ कोटी महिलांना लखपती करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. मात्र हि योजना नेमकी आहे तरी काय?महिलांना सरकार का आणि कशासाठी मदत करत आहे? त्यासाठी पात्रता काय आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं, त्यांना जगण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे मागील काही वर्षात महिलांसाठी अनेक मोठमोठ्या योजना सरकार कडून राबवण्यात येत आहेत. लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. हि योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणेज पुरुषांप्रमाणेच महिलांचा सुद्धा उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा असा आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेची कधी झाली सुरुवात?
सध्याचे भारताचे पंतप्रधान यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना 'लखपती दीदी' योजनेची घोषणा केली. 'लखपती दीदी' या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार असे ते म्हणाले आहे. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी भारत सरकारनं ही योजना सुरु केली आहे.काय आहे पात्रता? Lakhpati Didi Yojana
- अर्जदार महिला भारताची नागरिक असावी
- तिचे वय १८ ते ५० वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.
- सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
- अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही सरकारी कर्मचारी नसावा
- महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 'सेल्फ हेल्प ग्रुप' व्यवसाय योजना तयार करावी लागेल.
- या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल.
- या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल.
- त्यानंतर सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
आवश्यक कागदपत्रे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
या योजनेत महिला कशा होणार लखपती?
Lakhpati Didi Yojana In Marathi : या योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. 'लखपती दीदी' या योजनेनुसार ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही सोप्या आणि चांगल्या चांगल्या टिप्स दिले जातील. त्याचबरोबर वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची आर्थिक विषयांची माहिती दिली जाते. व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, UPI चे सर्विसेस, मोबाईल अप्स, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते.Lakhpati Didi Yojana Officeail Website Click Here
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.
निष्कर्ष
महिलांचे भाग्य बदलणारी 'लखपती दीदी' योजना मोफत माहिती उपलब्ध करून देत आहे. Lakhpati Didi Yojana हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, किंवा आपण शहरी भागात राहत असाल तर हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.- Facebook Channel : Link
- Instagram Channel : Link
- Telegram Channel : Link
- Whats App Channel : Link
- Official Website Link :
#Lakhpati_Didi _Yojana, #Lakhpati_Didi_Yojana_2024, #Lakhpati_Didi_Scheme, #lakhpati_didi_yojana_kya_hai #lakhpati_didi_yojana_maharashtra, #lakhpati_yogana_information, #lakhpati_didi_yojana_in_marathi,#लखपती_दीदी_योजना_काय_आहे #लखपती_दीदी_योजना, #लखपती_दीदी_योजना_माहिती, #लखपती_दीदी_योजना_अर्ज
Follow Us