Pik Vima Yojana Maharashtra in Marathi – अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची योजना. म्हणजेच पीक विमा योजना आता शेतकऱ्यांना मोफत मध्ये पीक विमा मिळणार आहे. वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांसाठी पीक विमा बद्दलची संपूर्ण माहिती तसेच विमासाठी लागणारे कागदपत्रे, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेच्या लाभ घेऊ शकता व 2024 विमाचा हप्ता कसा भरला जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.
पिक विमा म्हणजे काय? (What is Pik Vima in Marathi)
महाराष्ट्र राज्याच्या वन हक्क मान्यता प्रमाणपत्र धारकांना पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान करिता शेतकऱ्यांना विमा योजना मार्फत संरक्षण देणे. प्रमाणपत्र धारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या वेळेस व कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना आधार देणे अशी हि योजना आहे.पीक विमा तर हप्ता कोण भरणार ( Pik Vima Yojana Maharashtra in Marathi )
वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांसाठी पिक विमा योजनाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. परंतु वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांसाठी हा पिक विमा बाकीचा हप्ता कोण भरेल. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. तर पिकाचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त हा फोर्म ऑफलाईन पद्धतीने भरावा लागेल, आणि बँकेत जाऊन जमा करावा लागेल.वनहक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांसाठी कोणत्या पिकांसाठी खरीप हंगामात शेतकऱ्याना सहभाग घेता येईल?
2024 च्या खरीप हंगामात कापूस, तीळ, भात, बाजरी, नाचणी, उडीद, मुंग, मका, तुर, कारले, भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, व कांदा असे एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी शेतकरी बांधवांना सहभाग घेता येणार आहे. आणि वनहक्क प्रमाणपत्र धारकांनी आपल्या लागवड केल्या नुसार याचा सहभाग घ्यावा.पीक विमा योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Pik Vima Yojana Apply Last Date)
चालू रब्बी/ खरीप हंगामासाठी पीक विमा लाभ घेण्यासाठी वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांसाठी शेतकरी पीक विमा फॉर्म भरण्याची जवळ जवळ फक्त 1 महिन्याची मुदत असते. परंतु सध्या च्या दिनांक 19/10/2024 अशी तारीख जाहीर केलेली आहे. पीक विमा योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांवर कर्ज असेल त्यांनाही ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांना बँके वाले कुठलेही कर्ज देत नाही.पिक विमा योजना ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी आहे. (Pik Vima Yojana 2024 Form Fillup Proces)
पिक वीमा योजनाचा लाभ घेण्यासाठी वन हक्काची मान्यता प्रमाणपत्र धारकांना आपले सेवा केंद्र यांचा कडे प्रधानमंत्री पिक विमाचा फोर्म घ्या, आणि त्या सोबत पिक पेरा स्वयंघोषणा पत्र देखील मान्गुन घ्या जर आपण सामाईक खातेदार असाल तर सामाईक शपतपत्र देखील मांगा हे तिन्र्जही फॉर्म भरून घेऊन बँकेत जाऊन जमा करा. आणि पोच पावती देण्यात येणार ती जपून ठेवा,पिक विमा योजना काही अडचण असल्यास संपर्क कुठे करावे.?
वन हक्क मान्यता प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा संदर्भात काही अडचण असल्यास तालुका संबंधित पिक विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, यांच्या शी संपर्क करावा. जर का पिक वीमा योजनाचा फॉर्म बँक कर्मचारी जमा करत नसेल तर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या कडे त्या बँक विरुद्ध तक्रार करा. आणि बँक कर्मचारी कढून नुकसान भरपाई मांगू शकता.किती व्यक्ती या पिक वीमा योजनाचा लाभ घेऊ शकतो?
वनहक्क प्रमाणपत्र धारकांना अशी काही अटी शर्ते नाही परंतु जे जीवित व्यक्ती आहे, अशा व्यक्तींचे नावे फोर्म भरावे जेणेकरून काही अडचणी निर्माण होणार नाही. काही व्यक्ती आई वडील यांच्या नावे देखील फोर्म भरू शकता. जर का वडील जिंवंत नसेल तर आई च्या नावे पिक वीमा चा अर्ज करावे, आई जीवित नसेल तर वडिलांच्या नावे पिक वीमा चा अर्ज करावे.पीक विमा योजना साठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार.
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) प्रमाणपत्र
- पिक पेरा स्वयंघोषणा पत्र Link
- प्रधानमंत्री पिक विमा फॉर्म Link
- सामाईक खातेदार असल्यास सामाईक शपतपत्र Link
खालील योजना होणार आहे चालू : कोणते कागदपत्रे लागणार त्या साठी वाचा.