पीएम विश्वकर्मा योजना 2024 काय आहे? What Is PM Vishwakarma Yojana
या योजनेअंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास आणि जे कुटुंब खालील दिलेल्या यादीमधील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना कर्जच मिळणार नाही तर त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे म्हणून कौशल्य चे प्रशिक्षणही देखील मिळणार आहे.अशी हि 2024 ची पीएम विश्वकर्मा योजना आहे.पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्देश काय आहे ? : What is the purpose of PM Vishwakarma Yojana?
या योजने अंतर्गत पारंपरिक कामगारांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे, त्यांचे कौशल्य विकास वाढविणे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आधुनिक साधनांची मदत करणे, गरजूंना कर्ज पुरवठा करणे आणि डिजिटल व्यवहारास चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.विश्वकर्मा योजनेचे फायदे कोणते आहे? : PM Vishwakarma Yojana Benefits in Marathi
भारत देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अवजारे व साधने यांचा वापर करून तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर किंवा हस्तकलेच्या लोकांना एक वेगळी ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारत सरकारने पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कार्यान्वित केली आहे.पीएम विश्वकर्मा योजनेत काय काय दिले जाते? : What is provided in PM Vishwakarma Yojana?
विश्वकर्मा म्हणून ओळखपत्र मिळते, कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत पाचशे रुपये विद्यावेतन आणि त्यानंतर १५००० पर्यंत ते २०००० पर्यंत चे किट मिळते. त्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.योजनेच्या लाभासाठी कोण पात्र असणार? : PM Vishwakarma Yojana in marathi Eligibility
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कारागीर, सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार, टेलर, नाव्ही काम करणारे, चर्मकार, बोट बांधणारे, सोनार, कुलूप बनवणारे, हॅमर बनवणारे, गवंडी कामगार, दगड फोडणारे, माळी हार बनवणारे, झाडू टोपली बनवणारे, धोबी, मासेमारी जाळी बनवणारे, खेळणी बनवणारे आदी १८ पारंपरिक कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहे.विश्वकर्मा योजनेची अंतिम तारीख कोणती? : What is the last date for Vishwakarma Yojana? :
पीएम विश्वकर्मा योजना हि 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु झालेली आहे, परंतु सध्या च्या स्तिथीत आज हि लोकं या योजनेचा ऑनलाईन फोर्म भरत आहे, तसेच आता पर्यंत अनेक लोकांनी या योजनेचा खूप फायदा घेतलेला आहे. आणि या योजनेची अंतिम तारीख केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही.पीएम विश्वकर्मा योजनेसाठी वयोमर्यादा किती आहे?
पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी पात्रता अठरा वर्षांवरील असलेला व्यक्ती आणि 50 वर्षांपेक्षा कमी असलेला पारंपरिक कामगार, यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसलेले कामगार, हाताने किंवा अवजारे वापरून किंवा हस्तकलेचे पारंपरिक कारागीर, एका कुटुंबातील एका व्यक्तीला याचा लाभ मिळतो.पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एका क्षेत्रात पात्र असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
- मान्यताप्राप्त संस्थेचे 18 क्षेत्रापैकी एका क्षेत्रा संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पीएम विश्वकर्मा योजना 2024 साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? : What documents are required for PM Vishwakarma Yojana in Marathi 2024?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- वैध मोबाईल नंबर
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी किती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पीएम विश्वकर्मा योजने च्या लाभासाठी पाच कागदपत्राची आवश्यकता आहे. आणि ती खालील प्रमाणे आहे.
आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पारंपरिक व्यवसायाचा पुरावा म्हणजे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र , रहिवासी पुरावा, जसे दहा वर्षाचे जुने मतदान कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचा फोटो असे कागदपत्रे लागतात.पीएम विश्वकर्मा योजनेची ऑनलाइन नोंदणी कशी करावी? : How to registration PM Vishwakarma Yojana online? :
- प्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जाणे.
- नंतर मुख्यपृष्ठावर जाऊन How TO Register नावावर क्लिक करणे.
- तुम्हाला विचारलेली माहिती टाका
- शेवटी मोबाईल. नंबर टाका.
- OTP टाकून Submit नावावर क्लिक करा.
- आणि आपले Registretion झाले असे समजावे.
How to apply for vishwakarma yojana in csc portal? : सीएससी पोर्टलमध्ये विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- प्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जाणे.
- मुख्यपृष्ठावर जाऊन login नावावर क्लिक करणे.
- त्यानंतर CSC login नावावर क्लिक करणे.
- नंतर CSC Register Artisan नावावर क्लिक करणे.
- नंतर CSC ID टाकणे आणि नंतर फोर्म भरायला सुरवात करणे?
पीएम विश्वकर्मा योजना लॉग इन कसे करावे?
- प्रथम अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जाणे.
- मुख्यपृष्ठावर जाऊन login नावावर क्लिक करणे.
- त्यानंतर Applicant and Beneficiary log in नावावर क्लिक करणे.
- आणि आपण केलेल्या Register मोबाईल नंबर टाकणे.
- OTP टाकून Submit नावावर क्लिक करा.
निष्कर्ष :
वाचक मित्रांनो आम्ही दिलेली पीएम विश्वकर्मा योजने ची मराठी मध्ये संपूर्ण माहिती वाचलीच असाल, तसेच आपले जवळचे नाते संबधित व्यक्ती या योजनेसाठी पात्र होत असेल तर त्याचा पर्यंत हि माहिती नक्कीच शेअर करा. कारण कि कोणकोणते कागदपत्रे लागणार, आणि किती दिवसांची मुदत आहे. हे देखील त्यास कळेल.खालील योजनांची माहिती देखील वाचू शकता ? जे कि पुढच्या महिन्यात चालू होणार आहे.