महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे काय?
अधिवास प्रमाणपत्र, ज्याला राज्याच्या रहिवाशाचा पुरावा म्हणून देखील ओळखले जाते, हे एक महत्व पूर्ण दस्तऐवज आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या कायमस्वरूपी पत्त्याची पडताळणी करणे सोपे जाते. आणि या अधिवास प्रमाणपत्र द्वारे इतर कागदपत्रे देखील काढले जातात, जसे की पासपोर्ट अर्ज, व्हिसा प्रक्रिया आणि शासकीय योजनानांचा लाभ घेणे यासारख्या विविध कारणांसाठी देखील आवश्यक असलेला हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे.अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र ऑनलाइन प्रक्रिया कशी आहे ? Domicile Certificate Maharashtra Online Procedure And Apply:
सद्याच्या या डिजिटल दुनियेत अधिवास प्रमाणपत्र काढायण्यासाठी राज्य सरकारने तीन पद्धतीने अर्ज करायला सांगितले, पहिली पद्धत ही घरच्या घरी बसून ऑनलाईन पद्धतीने काढून घ्यावे, दुसरी पद्धत ही आपल्या जवळच्या एरियेत सेतू केंद्रा ला भेट देऊन काढू शकता, तिसरी पद्धतीने आपण ऑफलाईन फॉर्म भरून ऑनलाईन सेंटर ला जाऊन फॉर्म सबमिट करू शकता.महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र पात्रता निकष काय आहे?
अधिवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला काही कारणे देखील आवश्यक आहे: ते खालील प्रमाणे आहे.- - राज्याच्या नागरिक हवा.
- - तुम्ही अर्ज करत असलेल्या राज्याच्या कायमचा पत्ता धारक हवा.
- - तुमच्या कडे राशन कार्ड म्हणून सामान्य लाभ धारक हवा.
- - शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असायलाच पाहिजे.
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र चा फायदा काय आहे ?
हे एक मुख्य असे राज्याच्या रहिवासी म्हणून ओळखण्यात येणारे कागदपत्र आहे. जे कि राज्यात शासकीय किंवा निमशासकीय शाळेत शिकणारे मुंले मुलींसाठी या कागदपत्राचा फायदा आहे. तसेच राज्याच्या काही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्राचा फायदा होत आहे.पाच दिवसात अधिवास प्रमाणपत्र मिळू शकेल का?
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र ऑनलाईन काढायचे असल्यास आपके सरकार पोर्टलवर अधिवास प्रमाणपत्र फक्त 23 रुपयांमध्ये 2 दिवसांत बनवले. जाते या सेवेबद्दल काही अटी शर्ते देखील आहे. परंतु ते सद्या सरकारने गुपित ठेवलेले आहे.महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते?
- आधार कार्ड- मतदार ओळखपत्र
- शिधापत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- रहिवाशी स्वयं घोषणा पत्र
- विवाह केलेल्या स्रिया साठी हमी पत्र
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या :, https://aaplesarkar.mahaonline.gov.in आणि प्रथम आपली नोंदणी करा.
- नोंदणी करा या नावावर क्लिक करून नोंदणी करा. नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करा
- लॉग इन करा : या नावावर क्लिक करून लॉग इन व्हा. जर का आपल्या कडे एखादे खाते आधीपासूनच खाते असल्यास लॉग इन करा.
- "अधिवास प्रमाणपत्र" विभागात नेव्हिगेट करा. आणि अर्ज भरा तुमचे वैयक्तिक तपशील, पत्ता मोबाईल नंबर टाका. आणि विचारलेले दस्तऐवज अपलोड करा.
- दस्तऐवज अपलोड करा: तुमच्या कागदपत्रांच्या आणि छायाचित्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती दस्तऐवज अपलोड करा.
- शुल्क भरा: शेवटची स्टेप म्हणून लागू शुल्क ऑनलाइन भरा आणि पोच पावती जपून ठेवा जेणेकरून स्टेटस चेक करता येईल.
अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र ऑनलाइन : वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा म्हणून कोणताही एक कागदपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- RSBY कार्ड
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- मनरेगा जॉब
- ड्रायव्हिंग लायसन्स
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र
- निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र
पत्ता पुरावा ( कोणतेही एक कागदपत्र पत्ताचा पुरावा )
- पासपोर्ट
- पाणी बिल
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- टेलिफोन बिल
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वीज बिल
- मालमत्ता कराची पावती
- 7/12 आणि 8 A/ भाड्याची पावती
वयाचा पुरावा ( वय पुरावा म्हणून कोणतेही एक कागदपत्र )
- SFC प्रमाणपत्र
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र
- प्राथमिक शाळेतील प्रवेशातून उतारा दस्तऐवजांचा
- जन्म दाखला
निवास पुरावा
- तलाठ्याकडून देण्यात आलेला रहिवासी पुरावा
- ग्रामसेवकाकडून देण्यात आलेला रहिवासी पुरावा
- बिल कलेक्टरकडून देण्यात आलेला रहिवासी पुरावा
इतर कागदपत्रांचा पुरावा
- पाणी बिल
- रेशन कार्ड
- भाड्याची पावती
- मतदार यादी शुल्क
- टेलिफोन बिल
- वीज बिल
- विवाह प्रमाणपत्र
- मालमत्ता कराची पावती
- मालमत्ता नोंदणी शुल्क
- पतीचा रहिवासी पुरावा
- 7/12 आणि 8 अ/ भाड्याची पावती
महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र साठी ऑफलाईन अर्ज कसा करावा?
पहिले तहसील कार्यालय कडे अधिवास प्रमाणपत्र साठी अर्ज सादर करावे लागत असतांना सद्याच्या घडीला प्रत्येक गावा शहरात एक सेतू केद्र उपलब्द आहे. त्या ठिकाणी भेट देऊन आपण महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र साठी ऑफलाईन अर्ज करू शकता . आणि त्यांनी सांगितलेल्या दिवशी तुमचे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र घेऊ शकता.खालील माहिती देखील आहे महत्वाचे आहे वाचा :