सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असतील. या समितीने गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंद करता येणार आहे. तसेच ऑफलाईन अर्ज यथावकाश अँप / पोर्टलवर भरण्यात येणार आहे.
आपल्या जिह्यातील जिल्हाधिकारी म्हणाले, सदर योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातीलबालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM² यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख व उचच् (City mis- sion Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी नोंदणी झाल्यानंतर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी रूपये ५० याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावणीपणे व सुलभपणे होण्यासाठी सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या पती, पत्नी व त्यांची
अविवाहित मुले, मुली अशी ग्राह्य धरण्यात आली आहे. नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
महिलेचे रेशन कार्ड मध्ये नाव नसल्यास उपाय काय?
महिलेच्या पतीचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड अथवा मतदान कार्ड हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य आहे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.ग्रामस्तरीय समिती कशी असेल? Mukyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Navin GR
ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिध्द करण्यात यावी. या योजनेचे यादी प्रसिध्द करण्यासाठी प्रथम ना हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात येईल असे देखील म्हटले गेले आहे तसेच व्दिरुक्ती (Duplication) टाळण्यात यावी.शासन निर्णय दि.०५.०७.२०२४ अन्वये "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने, सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात यावी.
शहरी वार्ड समिती कशी असेल? Mukyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Navin GR
तालुका/वार्ड स्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करुन लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द करावी. जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे.योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'अ' 'अ' व 'ब' वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरीता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
सदर समिती आता 'अ' 'अ' व 'ब' वर्ग महानगरपालिकांपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समितीगठीत करण्यात येणार आहे.
खालील योजनेची माहिती देखील वाचा :
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती?
राज्य शासन "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेसाठी लवकरच नवीन वेबसाईट चालू करणार आहे, येत्या 17 / 7 / 2024 रोजी यथावकाश ही शासनाने दिलेल्या संकेतस्थळ ला सुरवात करायला सांगितले असून लॅपटॉप आणि कॉम्पुटर वरून देखील भरता येणार आहे.लाडकी बहिण योजना फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणे कोणती?
- 1) जॉइन अकाऊंट चालत नाही रिजेक्ट
- 2) हमीपत्र वर खाडा खोड चालत नाही रिजेक्ट
- 3) बँकेत नवीन अकाऊंट ओपेन केले आहे परतू ते आधार बँक लिंक नाही रिजेक्ट
- 4) आधार आणि बँक लिंक नसेल तरी पण रिजेक्ट रिजेक्ट
- 5) डॉक्युमेंट नीट दिसत नाही रिजेक्ट
- 6) राशन कार्ड नीट दिसत नाही व आधार वर राशन चे पत्ता वेगळा आहे रिजेक्ट
- 7) आधार ची माघची व पुडची बाजू जोडले नाही रिजेक्ट
- 8) आधार वर पूर्ण जन्म तारीख नाही रिजेक्ट
- 9) फॉर्म मराठी मध्ये भरला रिजेक्ट
- 10) आधार वरचे नाव व पासबूक चे नाव चुकले आहे रिजेक्ट
- 11) राशन कार्ड मध्ये नाव नाही रिजेक्ट
- 13) आधार कार्ड ला मोबाइल लिंक नाही रिजेक्ट
- 14) मतदान कार्ड चे राशन कार्ड आधार कार्ड सारखा पाहिजे
- 15) आधार ला जी बँक लिंक आहे तेच पासबूक अपलोड करा..
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा नवा शासन निर्णय साठी येथे क्लिक करा | Mukyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Navin GR