MahaDBT Scholarship नवीन Registration कसे करावे पूर्ण माहिती वाचा.

MahaDBT Scholarship Portal : विद्यार्थी मित्रांनो MahaDBT Scholarship Portal बद्दल माहिती देण्यासाठी आणि स्कॉलरशिप लाभ मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी बनवलेल्या आमच्या अधिकृत वेबसाईट वरती आपले स्वागत आहे.
MahaDBT Scholarship नवीन Registration कसे करावे पूर्ण माहिती वाचा.
MahaDBT Scholarship नवीन Registration कसे करावे पूर्ण माहिती वाचा.

MahaDBT Scholarship Portal च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शिकत असलेल्या विद्यार्थी मित्रांना स्कॉलरशिप देण्यासाठी हा पोर्टल चालू केलेला आहे.विद्यार्थी मित्रांनो MahaDBT स्कॉलरशिप योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्वप्रथम त्यांची Registration करावी लागेल जे कि तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल, laptop च्या माध्यमातून स्वतः भरू शकतात किंवा ऑनलाईन भारता येत नसेल तर जवळच्या CSC केंद्रातून ऑनलाईन अर्ज करून घेऊ शकतात.

MahaDBT Scholarship नवीन Registration

हा लेख कशा बद्दल आहे.MahaDBT Scholarship नवीन Registration कसे करावे 
या योजनेचे नाव काय आहे.

MahaDBT Scholarship योजना

कोणी सुरु केले.राज्य सरकार 
केव्हा लांच झाली 

२४ फरवरी 2017

मंत्रालय

महाराष्ट्र राज्य मंत्रालय द्वारा

या योजनेत देण्यात येणारे पैसे किती शिकत असलेल्या विद्यार्थी प्रमाणे 

लाभार्थी कोण 

राज्यात शिकणारे विद्यार्थी यांना 

आधिकारिक वेबसाइट

https://mahadbt.maharashtra.gov.in

MahaDBT Scholarship Portal काय आहे?

mahadbt. maharashtra. gov. in हि वेबसाईट राज्य शासनाचे एक अत्यंत महत्वाचे पोर्टल असनू, शिकत असलेल्या विद्यार्थी मित्रांना स्कॉलरशिप च्या लाभ हा थेट आपल्या खात्यात पैसे देण्यासाठी विकसित केलेलं एक व्यासपीठ आहे.
MahaDBT Scholarship Portal एक यूजर फ्रेंडली इंटरफेस प्रदान करते जेथे महाराष्ट्रातील शिकत असलेल्या विद्यार्थी स्वतःचे खाते तयार करू शकतात, ऑनलाई अर्ज भरून स्कॉलरशिप चा लाभ घेऊ शकतात, आवश्यक ते ऑनलाईन द्वारे कागदपत्रे सबमिट करू शकतात तसेच ह्या अर्जाचे स्थितीचा मागोवा देखील घेऊ शकतात.

MahaDBT Scholarship Portal Features

  • MahaDBT Scholarship portal हे एक Direct Benefit Transfer (DBT) पोर्टल आहे,
  • DBT म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे योजनेस पात्र
  • विद्यार्थींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात.
  • स्वतःच्या मोबाईल वरून किंवा नजदिकच्या CSC केंद्रातून विद्यार्थीं आपली नोंदणी करू शकतात.
  • MahaDBT Scholarship Portal हे एक यूजर फ्रेंडली पोर्टल आहे

MahaDBT Scholarship साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • राज्य शासनाच्या GR नुसार आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 10वी किंवा 12वीची मार्कशीट
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • PHYSICAL FITNESS CERTIFICATE ( PDF लिंक )
  • सक्षम अधिकाऱ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र
  • अनुसूचित जाती / जमातीचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र

MahaDBT Scholarship Registration

MahaDBT Scholarship अंतर्गत येणाऱ्या माहिती व विद्यार्थी यांना लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in असे google मध्ये सर्च करावे लागेल. नंतर Post Matric Scholarship या नावाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या फोटो प्रमाणे महाडीबीटी स्कॉलरशिप पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या New Applicant Registration या बटनावर क्लिक करून Registration प्रक्रिया सुरु करू शकता.


MahaDBT Scholarship Registration
MahaDBT Scholarship Registration

नंतर दिलेल्या फोटो प्रमाणे

  • Applicant Name ( म्हणजे विद्यार्थी चे पूर्ण नाव लिहा )
  • Username ( लक्षात राहील असा युसर नेम बनवा आधार नंबर टाकला तरी चालेल )
  • Password ( पासवर्ड बनवा सार्वजनिक टाकला तरी चालेल जसे Pass@123 )
  • Confirm Password ( बनवलेला पासवर्ड तोच कन्फोर्म पासवर्ड टाका )
  • Mobile Number ( आधार कार्ड वरचाच मोबाईल नंबर टाकावा )
  • OTP ( Mobile Number वरती सहा अंकी OTP टाका ) कॉन्फोर्म करा.
  • Captcha Code ( समोर दिसलेला कोड टाका )
  • Register ( बटनावर क्लिक करा )
वरील दिलेल्या स्टेप्स प्रमाणे आपली किंवा शिकत असलेल्या त्या विद्यार्थी याची नोंदणी पूर्ण होईल

MahaDBT Scholarship Login

MahaDBT Scholarship login करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही रेजिस्ट्रेशन केलेले असावे. त्या नंतर तुम्हाला
तुम्हाला जो वापरकर्तानाव (Username) बनवलेला असेल तो आणि बनवलेला संकेतशब्द (password) या दोन्हीचा वापर करून तुम्ही स्कॉलरशिपसाठी लॉगिन करू शकता.
MahaDBT Scholarship Login
MahaDBT Scholarship Login




दिलेल्या फोटो प्रमाणे MahaDBT Scholarship पोर्टल वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या Applicant Login या बटनावर क्लिक करून वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून समोर दिसलेला Captcha कोड टाकून लॉगिन करा.

MahaDBT Scholarship Status

अशा पद्धतीने तुम्ही MahaDBT स्कॉलरशिप साठी अप्लाई करू शकता आणि प्रिंट करून आपल्या शाळेत किंवा कॉलेज ला एक प्रत द्या. आणि दुय्यम प्रत घेऊन त्या वर तुम्ही Received प्रत म्हणून OC घ्या. नंतर पैसे खात्यात आले कि नाही तेही तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in वरती युसर आणि पासवर्ड टाकून status चेक करू शकता.

निष्कर्ष

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला MahaDBT Scholarship Portal Registration कसे करावे या बद्दल माहिती दिली आहे. यासोबतच MahaDBT Scholarship Portal Log In आणि MahaDBT Scholarship Portal स्टेटस कसे चेक करायचे याची माहिती देखील देण्यात आली आहे. प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुम्हाला या लेखाशी संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी देऊ शकता.

Maha DBT पोर्टल ची इतर माहिती

Frequently Asked Questions Link
Helpline Number

022-49150800

Chief Minister Helpline:

24x7 (Toll Free) No.: 1800 120 8040

Facebook Link
Telegram Link 

MahaDBT Scholarship Registration कशी करावी? YouTube च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.



Post a Comment (0)
Previous Post Next Post