PMGOV.com : राज्यात गेल्या तीन वर्षांपासून मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे. यंदाही १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई-पीक पाहणीच्या आधारे पीकविमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्जवाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे.
पीक पेरा नोंदणीला १ ऑगस्टपासून सुरवात
राज्य सरकारच्या भूमिअभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये शेतकरी पातळीवर पीक नोंदणीसाठी ई-पीक पाहणी App उपलब्ध करून दिले. त्यामुळे 7/12 उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे न जात घरबसल्या पिकांची नोंद करता येते. यासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर अशी मुदत आहे.कोठे कराल ई-पीक पाहणीचे नोंदणी? -
E Pik Pahani भूमिअभिलेख विभागाने आता ईE Pik Pahani नवीन सोपे व्हर्जन आणले असून, या App मुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीत ४८ तासात दुरुस्ती करता येणार आहे. तसेच E Pik Pahani चे जियो फेन्सिंग या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे ठरविता येणार आहे.
E Pik Pahani App वर कशी कराल नोंदणी?
हे App डाउनलोड केल्यावर शेतकऱ्याला आपल्या शेतीची आवश्यक माहिती भरल्यानंतर पिकांची नोंदणी करता येते. या नोंदणीमुळे राज्यात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात कोणते प्रमुख पीक आहे, याची माहिती मिळणे सुलभ झाले आहे.E Pik Pahani App : साठी येथे क्लिक करा.
ई-पीक पाहणीचे नोंदणी ची शेवटची तारीख काय?
ई - पीक नोंदणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत शेवटची मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद करावी. भरपाई, अनुदान, किमान आधारभूत किंमत यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.विमा, नुकसान भरपाई हवी असेल तर करा नोंदणी App वर.
- यातील नोंद ही सातबारा उताऱ्यावर केली जाते. तीच अधिकृत आहे.
- राज्य सरकारही याच माहितीचा उपयोग करून नैसर्गिक आपत्तीतील मदत, पीकविमा आदी कामांसाठी केला जाणार आहे.
- साखर आयुक्तालय देखील याच माहितीचा उपयोग करू शकेल. हीच माहिती अंतिम असेल. सहकार विभाग, पणन विभाग तसेच बँकांनाही कर्ज वितरणात याच माहितीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.
ई-पीक पाहणी साठी कोणकोणते कागदपत्रे लागणार?
पिक विमा नुकसान भरपाई साठी, पाहिजे असेल तर, अँड्रॉइड मोबाईल हवा, आणि 7/12 उतारा, 8 अ उतारा. मॅप टॅगिंग असे दोन तीन कागदपत्रे लागणार.
हेही वाचा.