PM Kusum Yojana : सावधान, सौर कृषिपंपाच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून होतेय शेतकऱ्यांची फसवणूक! फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा महाऊर्जा विभागाच्या वतीने तसेच केंद्र आणि राज्य सरकार, पोलिसांनी देखील दिला सल्ला.
![]() |
Kusum Yojana Frod Website |
PM Kusum Yojana 2024 : महाराष्ट्र ऊर्जा विकास (पीएम कुसुम योजना घटक-ब) ही अधिकृत वेबसाईट आहे, हे अभिकरण महाऊर्जाच्या वतीने महाकृषी ऊर्जा अभियानयोजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर ३HP, ५ HP व ७.५HP अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषिपंप देण्यात येत आहे.
फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा सल्ला
नेमकी हीच संधी साधून सायबर चोरट्यांनी फसवे संकेतस्थळ, बनावट एसएमएस पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब समोर येत आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांनी फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा सल्ला 'महाऊर्जा'ने दिला.या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अनुदान किती मिळते :
अनुसूचित जाती / जमाती यांच्या साठी
3 HP 5 % Subsidy
5 HP 5 % Subsidy
7.5 HP 5 % Subsidy
खुला प्रवर्ग जनरल यांच्या साठी
3 HP 10 % Subsidy5 HP 10 % Subsidy
7.5 HP 10 % Subsidy
पीएम कुसुम योजनेंतर्गत (घटक -ब)
सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो.
महाऊर्जाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते?
ही योजना राबविण्याकरिता लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महाऊर्जाने अधिकृत संकेतस्थळ निर्माण केले आहे. कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम /सोलर/बेनिफिशरी/रजिस्टर/कुसुम-योजना कंपोनंट-बी आणि कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम/बेनिफिशरी या दिलेल्या ऑनलाइन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जाच्या वतीने कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत, असे महाऊर्जा विभागाने स्पष्ट केले.
PM Kusum महाऊर्जाच्या वतीने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत सायबर चोरट्यांकडून वेगवेगळे बनावट संकेतस्थळ, सौशल मीडिया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश (एसएमएस) पाठविण्यात येते.
या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.