![]() |
विवाह नोंदणी का करावी ?
- १. विवाहास कायदेशीर मान्यता व कायदेशीर आधार मिळण्यासाठी.
- २. शासकिय कामात विवाह प्रमाणपत्र हा एक महत्वाचा दस्तावेज ठरतो म्हणून.
- ३. विवाहानंतर पत्नीचे आधार कार्ड / मतदान ओळखपत्र इ. वरील नाव व पत्ता बदलण्यासाठी एक महत्वाचा दस्तावेज.
- ४. विवाहानंतर नौकरी / व्यवसाय संबंधित कागदपत्रावर महिलांचे माहेरकडील नाव असल्यास सासरकडील नावासाठी एक महत्वाचा दस्तावेज म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र कायदेशीर आहे.
- ५. विवाहानंतर शिधापत्रिका (रेशन कार्ड) मध्ये पत्नीचे नाव समाविष्ट करण्यासाठी.
- ६. पती किंवा पत्नीच्या ओळखपत्रावरील नावात बदल असल्यास विवाह प्रमाणपत्र हे त्या दोघांना पती-पत्नी म्हणून कायदेशीर ओळख देते.
विवाह नोंदणी कधी करावी ?
- १. विवाह झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत विहित नमुन्यात विवाह नोंदणीचे ज्ञापन, ज्याच्या अधिकारितेत पती सर्वसाधारणपणे राहत असेल किंवा पक्षकारापैकी एक जण सर्वसाधारपणे राहत असेल, त्या निबंधकासमोर प्रस्तुत करणे ही पतीची जबाबदारी राहिल. (विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मधील नियम ६)
- २. विवाह नोंदणी निश्चित कालावधीची मुदत संपल्यानंतर ही करता येते, परंतु एक वर्ष व एक वर्षानंतर विवाह नोंदणी करताना विवाह नोंदणीच्या फी मध्ये बदल/वाढ होते.
विवाह संबंधी महत्त्वाचे अधिनियम
- १. हिंदू विवाह अधिनियम, १९५५
- २. मुस्लिम विवाह विघटन अधिनियम, १९३९
- ३. पारशी विवाह आणि विवाह विच्छेद अधिनियम, १९३६
- ४. भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२
- ५. विशेष विवाह अधिनियम, १९५४ (आतंरजातीय विवाह नोंदणी या कायद्याद्वारे केली जाते.)
- ६. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१
- ७. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६
(महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मधील नियम २० नुसार हा अधिनियम विशेष विवाह अधिनियम, १९५४, भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२ किंवा पारशी विवाह आणि घटस्फोट अधिनियम, १९३६ वाखाली लागलेल्या विवाहांना लागू होणार नाही.)
विवाह नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- १. विवाह नोंदणी ज्ञापन (नमुना ड) विवाह झाल्यापासुन ९० दिवासांचे आत निबंधक यांचेकडे समक्ष वधु-वराने स्वतः उपस्थित राहून सादर करणेचे आहे. तसेच ज्ञापनावरील तिन्ही साक्षीदार यांनीही निबंधक यांचे समक्ष उपस्थित राहून सह्या करणे आवश्यक आहे. तसेच विवाह ज्ञापनासोबत रू. १००/- मात्र चे कोर्ट फो स्टॅम्प जोडणे आवश्यक आहे.
- २. वधू आणि वर यांचे प्रत्येकी ०५-०५ पासपोर्ट साइज फोटो, तसेच ०३ साक्षीदारांचे प्रत्येकी ०२ पासपोर्ट
- साइज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
- ३. वधु व वराची जाहीर निमंत्रण पत्रिका मुळ प्रत. पत्रिका नसेल तर त्याबाबत शपथपत्र सोबत जोडावे. ४. संबंधित वधु-वराचा लग्न विधी समारंभ प्रसंगी वेळेचा एकत्रित फोटो.
- ५. विवाह ज्या ठिकाणी झाला तेथिल विवाह पुरोहीत अगर विवाह विधी संपन्न करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाणपत्र किंवा ज्ञापनावर स्वाक्षरी तसेच मुस्लिम व्यक्तींच्या विवाहात काझी यांची माहिती व त्यांची स्वाक्षरी असावी. तसेच सोबत निकाहनाम्याची अटेस्टेड प्रत जोडावी. निकाहनामा जर उर्दू भाषेत असेल, तर त्याचे मराठी भाषांतर करून त्यावर संबंधित काझी यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत ज्ञापनासोबत जोडणे आवश्यक आहे.
- ६. वधु-वर दोघांचे जन्म प्रमाणपत्र अगर शाळा सोडल्याबद्दलचा दाखला.
- ७. यापूर्वी कोणत्याही कार्यालयात विवाह नोंदणी केली नसलेबाबतचे व विवाहासंबंधी खरी माहीती पुरवित असलेबाबतचे सक्षम अधिकारी यांचे समक्ष रू. १०० च्या स्टॅम्प पेपर वर कोर्टातून अॅफिड्यूट केलेले प्रतिज्ञापत्र.
- ८. वधुवरांचे ओळख पटविणारे दस्तऐवज- शासकिय कार्यालयाचे ओळखपत्र / बँक पासबुक / पॅनकार्ड /
- आधारकार्ड / ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक स्वसाक्षांकित (सेल्फ अॅटिस्टेड) सोबत जोडणे आवश्यक आहे.
- ९. ज्ञापनावर साक्षीदार म्हणून सहया करणा-या व्यक्तींनी आपले ओळखपत्र / बैंक पासबुक / पॅनकार्ड /आधारकार्ड / ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक स्वसाक्षांकित (सेल्फ अॅटिस्टेड) सत्यप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
- १०. विवाह प्रमाणपत्र एकदाच दिले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
- ११. विवाह नोंदणी करणेबाबत वरील कागदपत्रे सादर केल्यावर खालील प्रमाणे आवश्यक फी या कार्यालयात भरुन त्याबद्दलची पावती करुन घेणे आवश्यक आहे.
विवाह नोंदणी शुल्काचा तपशिल खालीलप्रमाणे सुधारीत शुल्क (रू)
- १. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आतील नोंदणी: ५०/-
- २. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतरच्या ९० दिवसांनंतर, परंतु १ वर्षे पूर्णहोण्यापूर्वी नोंदणी:- १००/-
- ३. विवाह शास्त्रोक्त पध्दतीने झाल्यानंतर एकवर्षाहून अधिक कालावधी झालेस विवाह नोंदणी:- २००/-
- ४. विवाह नोंदणी अर्ज तपासण्यासाठी सोबत घ्यावयाचे शुल्क :- १५/-
- ५. विवाह नोंदणीतील उत्तान्याची प्रमाणित प्रत मिळविणेसाठी अर्जासोबत घ्यावयाची शुल्क: २०/-
विवाह नोंदणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-तपासणी सूची तपशील, वराचे / वधूचे शेरा
- १ विवाहाचे ज्ञापन-नमुना 'ड'
- २ वर आणि वधूचे ओळखपत्र (उदा. आधार कार्ड/मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स, इ.)
- ३ वयाचा पुरावा (उदा. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- ४ राहण्याचा (पत्त्याचा) पुरावा (उदा. राशन कार्ड, वीजबील, टेलिफोन बील, पासपोर्ट, इ.)
- ५ लग्नपत्रिका (लग्नपत्रिका उपलब्ध नसल्यास रु.१०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र)
- ६ सदर विवाहाची नोंदणी यापुर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबत शपथपत्र
- ७ वर आणि वधूचे प्रत्येकी ५ पासपोर्ट फोटो- १ विज्ञाप्ती 'ड' साठी, २ विवाह प्रमाणपत्रासाठी (दोन (१ प्रती), १ गोषवारा, १ विवाह नोंदणीची नोंदवही)
- ८ तीन साक्षीदारांचे प्रत्येकी २ पासपोर्ट फोटो (१ विज्ञाप्ती 'ड' साठी, १ विवाह नोंदणी गोषवारा)
- ९ लग्नाचे फोटोग्राफ्स-
- १० वर किंवा वधू यापैकी एखादी व्यक्ती घटस्फोटीत असल्यास, घटस्फोटाच्या आदेशाची प्रत
- ११ वर किंवा वधू यापैकी एखादी व्यक्ती विधवा/विधूर असल्यास, पुर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्राची प्रत.
टीप : १ अनुक्रमांक ०१ ते ११ बाबी तपासले असून सदर विवाह नोंदणी प्रस्ताव परिपुर्ण आहे.
२ अनुक्रमांक ०१ ते ११ बाबी तपासले असून सदर विवाह नोंदणी प्रस्ताव अपूर्ण असून उपरोक्त त्रुटीची पुर्तता करून नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा.
२ अनुक्रमांक ०१ ते ११ बाबी तपासले असून सदर विवाह नोंदणी प्रस्ताव अपूर्ण असून उपरोक्त त्रुटीची पुर्तता करून नव्याने प्रस्ताव सादर करण्यात यावा.
![]() |
विवाह नोंदणी माहिती फॉर्म नमुना / Vivah Nondani Mahiti Namuna |
Vivah nondani form Marriage Registration online Maharashtra.
विवाह नोंदणी प्रतिज्ञापत्र
- मा. कार्यकारी दंडाधिकारी साहेब/ मे.नोटरी साहेब शिरपूर ,
- शिरपूर यांचे समोर ..
- श्री. शैलेश लालसिंग पावरा, वय : ३० वर्षे }
- रा. न्यू बोराडी , ता. शिरपूर , }
- प्रतिज्ञापत्र करणार १
- जि. धुळे }
- सौ. जमुना शैलेश पावरा, वय : २६ वर्षे }
- प्रतिज्ञापत्र करणार २
- रा. न्यू बोराडी , ता. शिरपूर , }
- जि. धुळे }
मी प्रतीज्ञापत्र करणार १ कारणे सत्य प्रतीज्ञा पत्रावर कथन
करतो कि,
करतो कि,
- वराचे नाव : श्री. शैलेश लालसिंग पावरा
- वराचा पत्ता : मु. रा. न्यू बोराडी , ता. शिरपूर जि. धुळे
- वधूचे माहेरकडील नाव : कु. जमुना जयसिंग पावरा,
- वधूचे सासरकडील नाव : सौ. जमुना शैलेश पावरा
- वधूचा पत्ता : रा. न्यू बोराडी , ता. शिरपूर जि. धुळे
- विवाहाची तारीख : २४/०४/२०२२ दुपारी
- १२ :३५ वा
- विवाहाचे ठिकाण : न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे
वरील प्रमाणे आमचा विवाहाचा तपशील असून, सदर विवाहाची नोंद आज पर्यंत कुठेही केलेली नाही. सदर
विवाहाची नोंद, ग्रामपंचायत कार्यालय, न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे येथे नोंद होणे कामी सदरचे प्रतिज्ञापत्र
विवाहाची नोंद, ग्रामपंचायत कार्यालय, न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे येथे नोंद होणे कामी सदरचे प्रतिज्ञापत्र
लिहून देत आहे.
प्रतिज्ञापत्र लिहून देणार १ यांनी दिलेली माहिती खरी असून, मी प्रतिज्ञापत्र करणार १ व २ त्याचे सत्यतेसाठी खालील सह करत आहे.
वरील माहिती खोटी आढळून आल्यास मी भारतीय न्यायसंहिता २०२३ या कायद्याच्या कलम २३६, २३७ नुसार
मी गुन्ह्यास पात्र राहील व कलम २२९ (२) नुसार शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
वरील माहिती खोटी आढळून आल्यास मी भारतीय न्यायसंहिता २०२३ या कायद्याच्या कलम २३६, २३७ नुसार
मी गुन्ह्यास पात्र राहील व कलम २२९ (२) नुसार शिक्षेस पात्र राहील याची मला जाणीव आहे.
- ठिकाण : शिरपूर
- दिनांक :२८ /०३ /२०२५
- प्रतिज्ञापत्र करणार १ -----------------------------
- प्रतिज्ञापत्र करणार २ ---------------------------
Vivah nondani online apply : विवाह नोंदणी
आपल्या जवळील csc केंद्र किंवा ऑनलाईन आपले सेवा केंद्र च्या सेंटर ला भेट देऊन त्यांना विचारणा करावी आणि विवाह नोंदणी चे ऑनलाईन फोर्म भरावे.
हेही वाचा :
विवाह नोंदणी शपथपत्र
लिहून देणार
- १. (वर) श्री. शैलेश लालसिंग पावरा [ राहणार- न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे ] वय-30
- २. (वधू) श्रीमती सौ. जमुना शैलेश पावरा [ राहणार- न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे ] वय -26
आम्ही सत्य प्रतिज्ञेवर शपथपत्र लिहून देतो की, आमच्या दोघांचा एकमेकांशी विवाह दिनांक २४/०४/२०२२ दुपारी
रोजी ठिकाण विवाहाचे ठिकाण : न्यू बोराडी, ता. शिरपूर जि. धुळे रितीरिवाजाप्रमाणे झालेला आहे.
आम्ही दोन्ही वर वधू या विवाहापूर्वी अविवाहित होतो. येथे तसेच विवाहाच्या दिनांकास आमचे वय, वर-२१ वर्षे व वधू-१८ वर्षे पूर्ण झालेले होते. परंतु आमच्याकडे आज रोजी . या कारणास्तव लग्नपत्रिका उपलब्ध नाही, त्यामुळे हे आम्ही हे शपथपत्र लिहून देत आहोत. तसेच विवाह नोंदणी अर्ज/ज्ञापना सोबत जोडलेली इतर सर्व कागदपत्रे खरी आहेत. तसेच सदर विवाहाची नोंद यापुर्वी कुठल्याही विवाह नोंदणी निबंधकाकडे करण्यात आलेली नाही.
सदरील विवाहाची नोंदणी विवाह निबंधक तथा ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी जि.... ग्रा.पं.. शपथपत्र लिहून देत आहे. तरी सदर विवाहाची नोंदणी करण्यात यावी. ही विनंती. यांचेकडे करणेकामी सदर
उपरोक्त दिलेली सर्व माहिती सत्य व बरोबर असून ती खोटी अगर असत्य आढळून आल्यास आम्ही भारतीय दंड संहिता विधान १९९, २०० व १९३(२), ४२० नुसार शिक्षेस पात्र राहू, याची आम्हाला जाणीव आहे.
- ठिकाण :
- दिनांक :
- विवाह नोंदणी शपथपत्र
- लिहून देणार :
- नाव श्री. (वर)
- श्रीमती (वधू)
- स्वाक्षरी
- साक्षीदार :
- १. श्री./श्रीमती.
- २. श्री./श्रीमती.