![]() |
Mahiti Adhikaracha Arj Kasa Karava : महाराष्ट्रातील सामान्य जनता साठी कुठल्या कारणांनी काही कागदपत्रे शासकीय कार्यालय मधून मागणी करतात, तर माहिती अधिकार अर्ज मधून मागणी करत असतात तर Mahiti Adhikaracha Arj Kasa Karava त्याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती देत आहोत.
शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची माहिती सर्वाना व्हावी शासन कारभार पारदर्शक व्हावा यासाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ अस्तित्वात आला.
माहिती अधिकारात कोणताही नागरिक कोणत्याही शासकीय कार्यालयात व शासनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निधी दिला असलेल्या प्राधिकरणात अर्ज करू शकतो..
माहिती अधिकार अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी Mahiti Adhikaracha Arj Kasa Karava
- १.माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये नियम ६(१) नुसार* असे वर लिहावे.
- २.प्रति,जन माहिती अधिकारी लिहून पुढे (कोणत्या कार्यालयात अर्ज करणार आहात त्या कार्यलयाचे नाव)लिहावे.
- ३.अर्जदार मध्ये आपले नाव,संपूर्ण पत्रव्यव्हाराचा पत्ता,संपर्क क्रमांक,ई-मेल आयडी लिहावे.
- ४.माहितीचा विषय व कालावधी-(कोणती माहिती कोणत्या कालावधीची लागणार आहे त्याचा तपशील.)
- ५.माहितीचा तपशील -(आपल्याला आवश्यक असलेल्या माहितीचा सविस्तर तपशील मुद्देनिहाय*)
- ६.माहिती आपणास प्रत्यक्ष हवी आहे का टपालाने याचा उल्लेख करावा
- ७. माहिती कशासाठी हवी आहे हे विचारण्याचा अधिकार कुणाला नाही परंतु त्यातून व्यापक जनहित साध्य होणे हा कायद्याचा उद्देश असल्याने *माहिती जनहितार्थ आवश्यक आहे असे लिहावे*
- ८.आपण ज्या ठिकाणी वास्तव्यास असून माहिती मागवत आहात त्या गावाचे नाव *स्थळ-* (*लिहुन पुढे लिहावे.)*
- ९.*दिनांक* टाकावा.
- १०.आपली *सही* करावी
- *महत्वाचे*
- ११. *माहिती अधिकार अर्जावर १० रुपयांचे कोर्ट फी तिकीट लावावे.
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्या अर्जाची झेरॉक्स काढून संबंधित कार्यलायात अर्ज जमा करावा व झेरॉक्स वर पोहोच घ्यावी.
अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी 9921600800
चळवळ माहिती अधिकाराची. Link
खालील माहिती देखील वाचू शकता.
- माहिती अधिकारातून ग्रामपंचायतची माहिती कशी मांगावी?
- माहिती अधिकार वापरा, पोलीस स्टेशनची कामगिरी तपासा
- ग्रामपंचायत तक्रार अर्ज कसा लिहावा? माहिती वाचा
आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.