ई-पीक पाहणी DCS प्रकल्पामुळे शेतीविषयक डेटा संकलन आणि अचूक नोंदणी करणे अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहे. मात्र, सहाय्यक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना या प्रक्रियेदरम्यान काही अडचणी येतात.
अधिकाऱ्यांना भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावर उपाय: e peek pahani questions and answers
शंका: मोबाईल अॅपमध्ये डेटा अपडेट होत नाही.
- उपाय: इंटरनेट कनेक्शन तपासा, अॅप अपडेट आहे का ते पाहा आणि कॅशे क्लिअर करा.
शंका: पीक माहिती अपलोड करताना त्रुटी दाखवते.
- उपाय: नकाशातील लोकेशन योग्य आहे का ते तपासा आणि रेकॉर्डिंग करताना जीपीएस ऑन ठेवा.
शंका: शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष नोंदणीमध्ये फरक आहे.
- उपाय: शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करा आणि आवश्यक त्या सुधारणा नोंदवा.
शंका: DCS प्रणालीमध्ये लॉगिन प्रॉब्लेम येतो.
- उपाय: पासवर्ड योग्य आहे का तपासा, गरज असल्यास IT विभागाशी संपर्क साधा.
सहाय्यक व ग्राम महसूल अधिकारी यांना उद्भवणारे प्रश्न व त्यांचे निराकरण : e peek pahani questions and answers
१) फोटो काढताना गटापासून चे अंतर लांब दाखवत आहे.
शेतकरी किंवा सहाय्यक यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना संपर्क करून माहिती द्यावी, ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांच्या दफ्तरात उपलब्ध असलेला नकाशा सर्वे नंबर किंवा गटाचा आहे, याची खात्री संबंधित तालुका भूमी अभिलेख (TLR) कडून करून घ्यावी तसेच गावचे वाढी विभाजन झालेले आहे का याची सुद्धा खात्री करावी व तसा अहवाल संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना द्यावा व जिल्हाच्या whats up ग्रुपला मोबाईल स्क्रीन शॉट, गाव नकाशाची Pdf करून शेअर करावी. जेणेकरून संबंधित GIS टीम त्याची तपासणी करून ती दुरुस्त करेल.२) भौगोलिक नकाशा उपलब्ध नाही.
अशा वेळेस ok यावर क्लिक करून पीक पाहणी करून घ्यावी व शेतकरी किंवा सहाय्यक यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावा व ग्राम महसूल अधिकारी यांनी तसा अहवाल संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांना द्यावा व जिल्हाच्या whats up ग्रुपला मोबाईल स्क्रीन शॉट व गाव नकाशा शेअर करावा.३) वेब पोर्टल मध्ये तलाठी लॉगीनसाठी OTP येत नाही.
संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना जर otp प्राप्त होण्यास अडचण येत असेल तर अशा वेळी DBA लॉगीनमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी मोबाईल क्रमांक चेक करावा व सध्या वापरत असलेला मोबाईल क्रमांक DBA लॉगीनमधून अपडेट करून घ्यावे.संबंधित अडचण दूर होत नसेल तर divisional co-ordinator शी संपर्क साधावा.
४) ७/१२ वर पिकांची नोंद आली नाही.
संबंधित पिकांची नोंद जर ७/१२ वर दिसत नसेल तर MIS मध्ये जाऊन पीक पाहणी अपलोड झाली किंवा नाही याची खात्री करावी.ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील १०% तपासणी व सहाय्यक स्तरावरील १००% तपासणी मध्ये चेक करावी.
संबंधित अडचणीचे निवारण होत नसेल तर मदत कक्ष क्रमांक ०२० २५ ७१२ ७१२ वर संपर्क करावा.
तसेच जिल्हाच्या ग्रुपवर संपर्क साधावा.
आपले गाव, तालुका, जिल्हा, खाते क्रमांक, गट क्रमांक, तसेच नोंदविलेल्या पिकांची संपूर्ण माहिती द्यावी.
५) सहाय्यक नोंदणी (रजिस्ट्रेशन) करते वेळी e-Mail व आधारला OTP येत नाही.
मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी व आधार लिंक मोबाईल क्रमांकवर पाठविण्यात आलेला सांकेतांक सारखाच असेल. वेगवेगळे सांकेतांक पाठविण्यात येणार नाही. तरी मोबाईल क्रमांक वर आलेला सांकेतांक प्रविष्ट करून पुढे जा वर क्लिक करावे.६) शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदविल्यानंतर ७/१२ वर प्रतिबिंबित झाली नाही.
अशा वेळी ग्राम महसूल अधिकारी यांनी १०% तपासून योग्य असल्यास पीक पाहणीला middle ware मधून मान्यता द्यावी. जेणेकरून आपली माहिती ७/१२ वर प्रतिबिंबित होईल.७) सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी नोंदविल्यानंतर ७/१२ वर प्रतिबिंबित झाली नाही.
अशा वेळी ग्राम महसूल अधिकारी यांनी पीक पाहणी १००% तपासने बंधनकारक आहे. योग्य असल्यास पीक पाहणीला middle ware मधून मान्यता द्यावी.८) एका गावासाठी किती सहाय्यकांची नियुक्ती होऊ शकते?
एका गावाकरिता एकच सहाय्यकाची नियुक्ती करू शकते.९) गावातील owner count जास्त असल्यास सहाय्यक यांची संख्या कशी ठरवावी?
गावातील owner count ची संख्या जर १५०० पेक्षा कमी असेल तर १ सहाय्यक निवडणे आवश्यक आहे व १५०० पेक्षा जास्त असल्यास २ सहाय्यक यांची निवड करावी.१०) सहाय्यक यांना मान्यता कशी द्यावी?
प्रत्येक गावच्या सहाय्यक यांना मान्यता देण्याचा अधिकार हा त्या गावातील ग्राम महसूल अधिकारी यांना आहे व त्या तालुक्यातील तहसिलदार यांनी आदेशीत केल्याप्रमाणे संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी यांनी सहाय्यकाला मान्यता द्यावी.११) सहाय्यक यांना पीक पाहणीसाठी गट उपलब्ध होत नाही
त्याकरिता MIS मध्ये शेतकऱ्यांनी आधीच पीक पाहणी केलेली आहे का ते तपासून पाहावे. तसेच पीक पाहणी प्रलंबित /अंशतः पीक पाहणी नोंदणी अहवाल तपासून पाहावे.१२) ग्राम महसूल अधिकारी यांनी सहाय्यक यांना मान्यता कोठे द्यावी?
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://115.124.110.14/agri_e/loginयेथे ग्राम महसूल अधिकारी यांनी आपला विभाग निवडा व सेवार्थ आयडी प्रविष्ट करा. व सेवार्थ आयडीला जोडलेल्या मोबाईल नंबर वर पाठविलेला otp प्रविष्ट करून लॉगीन करा व सहाय्यक यांना मान्यता द्यावी.
१३) पीक पाहणी मध्ये चूक असल्यास काय करावे?
नोंदविलेल्या पीक पाहणीमध्ये चूक असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी यांच्या कडून पीक दुरुस्ती करून घ्यावी.१४) शेतकारी स्तरावर चुकीची पीक पाहणी ७/१२ वर प्रतिबिंबित झाल्यास काय करावे?
मंडळ अधिकारी यांच्या कडून पीक पाहणी दुरुस्ती करून घ्यावी.१५) सहाय्यक यांचे कडून पीक पाहणीची नोंद चुकीची झाल्यास काय करावे?
सहाय्यक यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनात आणून द्यावे, व ती पीक पाहणी रद्द (reject) करून घ्यावी. ग्राम महसूल अधिकारी यांनी अशी पीक पाहणी नष्ट केल्यानंतर सहाय्यक यांना मोबाईल अॅप द्वारे "पुन्हा नियुक्त केले" या अंतर्गत पीक पाहणी करणेकरिता उपलब्ध करून देण्यात येईल.१६) सहाय्यक यांची पीक पाहणी अपलोड होत नाही अशा वेळी काय करावे?
संपूर्ण गटाची पीक पाहणी करणे गरजेचे आहे, एक आर जरी शिल्लक क्षेत्र असेल तर ती पीक पाहणी अपलोड होणार नाही यांची दक्षता घ्यावी.१७) मोबाईल अप्लिकेशन मधील ग्राम महसूल अधिकारी टॅब मधून लॉगीन होते का?
सध्या ती टॅब ग्राम महसूल अधिकारी यांच्या करिता उपलब्ध नाही.१८) पीक पाहणी नोंदवितांना काही अडचण असल्यास कोठे संपर्क साधावा?
गावातील नियुक्त केलेले सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, तसेच मदत कक्ष ०२० २५ ७१२ ७१२ या क्रमांकाशी संपर्क करावा. तसेच ई-पीक पाहणी मोबाईल अॅप मध्ये मदत बटनवर क्लिक केल्यास पीक पाहणी संदर्भात बनविलेल्या यूट्यूब व्हिडीओच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची अचूक माहिती मिळवणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून हा प्रकल्प अधिक प्रभावी केला जात आहे!
#EPeekPahani #DCSProject #DigitalAgriculture #शेतकऱ्यांसाठी_तंत्रज्ञान #SmartFarming