
विद्यार्थ्यांमधील गोंधळ दूर करणे आवश्यक : Swadhar Yojana In Marathi
वसतिगृहासाठी अर्ज करणे अनिवार्य केल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. Swadhar साठी वसतिगृह अर्ज भरण्यासाठी अट रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांची आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरु असलेला गोंधळ दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागाने जनजागृती करावी.
Swadhar Yojana In Marathi : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर Swadhar योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांना महाआयटी पोर्टलवर वसतिगृहासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करूनही प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यास स्वाधार मिळते.
वसतिगृहासाठी अर्ज करणे अनिवार्य
वसतिगृहासाठी अर्ज केला तरच प्रवेश न मिळाल्यास 'Swadhar 'चा अर्ज करता येणार आहे. वसतिगृहासाठी अर्ज न केल्यास विद्यार्थ्यांना स्वाधार मिळणार नाही.महाआयटी पोर्टलवर करा अर्ज
महाआयटी पोर्टलवर वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नियम, अटींची माहिती घेऊन विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. Swadhar Yojana मधून शासकीय वसतिगृहासाठी अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक विद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. शासकीय वसतिगृहासाठीही 'स्वाधार' योजनेतून महाआयटी पोर्टलचा वापर करता येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्टची मुदत
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच स्वाधारचा लाभ घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी महाआयटी पोर्टलवर अर्ज भरावा. वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणारअसल्याची समाजकल्याण माहिती विभागाने दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाची सुसज्ज अशी वसतीगृहे आहेत. शालेय विद्यार्थिनींसाठी निवासी शाळा व वसतीगृहे तसेच मुलांसाठी वसतीगृहांची सोय होत आहे. याठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी संबंधित निवासी वसतीगृहात जावून विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची माहिती घेत प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाने कळवले.खालील शासकीय योजना देखील सुरु होणार आहेत.
निष्कर्ष
शासकीय वसतिगृहासाठी 'स्वाधार' योजनेतून मिळेल लाभ ऑनलाईन अर्ज कसा करावा याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Swadhar Yojana In Marathi 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो. म्हणून आम्ही सांगतो कि आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.