![]() |
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी – आपल्या फार्मची नोंदणी करा आणि मिळवा कृषी समकक्ष दर्जाचा लाभ! जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, नंदुरबार यांच्याकडून आवाहन. (पशुपालकांसाठी योजना सुरु | Pashupalan Yojana)
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, राज्यातील लाखो पशुपालकांना याचा थेट लाभ होणार आहे. या निर्णयामुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन यासारखे व्यवसाय आता कृषी व्यवसाय म्हणून गणले जाणार आहेत, आणि त्यामुळे त्यांना अनेक शासकीय सवलती व योजना मिळणार आहेत.
*आपला फार्म नोंदवा आणि योजनांचा लाभ मिळवा:
नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, ब्रिडर युनिट, हॅचरी, लेयर फॉर्म, मेंढी-शेळी, वराहपालन युनिट्स* यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी खालील Google Form वर आपली फार्म नोंदणी त्वरित करावी.
नोंदणीसाठी अंतिम दिनांक: २५ जुलै २०२५
https://forms.gle/fkj1FdFKRHx1deeq8
नोंदणीपूर्वी तयार ठेवा खालील माहिती व कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. मोबाईल नंबर
3. शेत / फार्मचे Latitude आणि Longitude
4. पालन व्यवसायाचा प्रकार (उदा. गाय, म्हैस, कुक्कुट, मेंढी, शेळी, वराह)
5. गोठा / शेडची क्षमता
6. विजेच्या मीटरचा प्रकार
7. विद्युत ग्राहक क्रमांक
8. मंजूर विद्युत लोड (KW मध्ये)
9. सरासरी वार्षिक विद्युत वापर (युनिटमध्ये)
कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यावर मिळणारे लाभ:
⦁ कृषी वीज दराने विद्युत पुरवठा
⦁ ग्रामपंचायत करात सवलत
⦁ शेतीसारखी व्याजदर सवलत असलेले कर्ज
⦁ सोलर पंपासाठी अनुदान
⦁ शासनाच्या विविध योजना आणि निधीचा लाभ
हा पशुसंवर्धन क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय असून, आपला फार्म वेळेत नोंदवा व या योजनांचा लाभ घ्या. राज्यातील 75 लाख पशुपालकांना या निर्णयामुळे आर्थिक स्थैर्य, रोजगार व उत्पादनवाढीचा मोठा फायदा होणार आहे.
जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय, नंदुरबार यांच्यातर्फे सर्व पशुपालक बांधवांना आवाहन आहे की, २५ जुलै २०२५ पर्यंत आपली माहिती Google Form मध्ये भरून ही महत्त्वाची संधी गमावू नये.
आपला व्यवसाय पुढच्या टप्प्यावर घ्या – आजच फार्म नोंदवा!
.
.
.
#पशुसंवर्धन #कृषीसमकक्षदर्जा #महाराष्ट्रसरकार #DairyFarming #PoultryFarming #GoatFarming #AnimalHusbandry #Nandurbar #AgriEquivalence