
शिरपूरः तालुक्यात व त-हाडी, बोराडी परिसरातील, पळासनेर, सांगवी, कोडीद, अर्थे, थाळनेर परिसरातील, शेतकऱ्यांनी 'बॅटरी ऑपरेडेट फवारणी पंप साठी अर्ज करण्यास शिरपूर कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या शिरपूर कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. यंदा २०२४- २०२५ या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकिकरण या अंर्तगत 'बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप'व बियाणे औषधे व खते याअंर्तगत कापूस साठवून बॅग या उपकरणासाठी अर्ज करता येणार आहे.
यासाठी कृषी अधिकारी संजय पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहन म्हटले की, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी १५ ऑगस्टपर्यत मुदत होती. परंतु सर्वर चालत नसल्याने शेतकऱ्यांना हि मुदतवाढ आता २६ आगष्ट २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. आणि आता सर्वर चालू झाले आहे. तर कापूस साठवून बॅगसाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत अर्ज महाडीबीटी पोर्टवर ऑनलाईन पध्दतीने करावे. ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी पोर्टवर केलेल्या अर्जातून शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे? Favarni Pump Yojana
ही योजन शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच बॅटरीपंपासाठी २६ ऑगस्ट म्हणजेच सोमवार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
बटरी ऑपडेटेड फवारणी पंप यासाठी शिरपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत. तर कापूस साठवणूक बॅगेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले.
कोणकोणते कागदपत्रे लागणार? त्यासाठी येथे क्लिक करा.
निष्कर्ष
शेतकऱ्यांनी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची माहिती मोफत उपलब्ध करून देत आहे. Favarni Pump Yojana Online Apply 'फॉर्म' कसा भरायचा आहे त्या साठी आम्ही Video उपलब्ध करून देत आहे. Video पाहण्यासाठी आमच्या खालील सोअसिअल मिडीयाला मिळेल. तसेच हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती कडे, हि माहिती शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आम्ही शेअर करत असतो.