Lek Ladki Yojana 2024 Online Apply Maharashtra |
राज्य शासनाने 'लेक लाडकी' ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू केली आहे. या योजनेत मुलींना प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे असा असून , मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मिळेल यासाठी जन्मलेल्या मुलींना एक लाख रुपयांचा लाभ हा टप्प्याटप्याने मिळणार आहे. योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
लेक लाडकी योजनेचा तपशील
या आर्टिकल चे नाव काय आहे? | राज्य शासनाची नवी योजना मुलीचा जन्मनंतर मिळेल १ लाखाचा लाभ |
या योजनेचे नाव काय ? | लेक लाडकी योजना |
योजनचे सुरवात केव्हा झाली.? | 1 एप्रिल 2023 मध्ये |
योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जानेवारी 2024 पर्यंत |
कोणत्या विभागामार्फत ? | जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत द्वारे |
या योजनेत किती ? रुपयाचा लाभ मिळेल? | १ लाखापर्यंत. |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
आधिकारिक वेबसाइट |
Lek Ladki Yojana या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय ? .
यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासन 'माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवित होती. नंतर राज्य शासनाकडून महिला व बालकल्याण विभागामार्फत, लेक लाडकी योजना मध्येच सुधारणा आवश्यक असल्याचे पाहून आता 'लेक लाडकी' ही योजना सुरू केली आहे. विशेष करून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये दिले जाणार असून, एकूण पाच टप्यांत १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
लेक लाडकी योजना काय आहे ? Lek Ladki Yojana
१ राज्यात १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच टप्प्यांत देण्याचा निर्णय शासनाने दिला असून, अनुदान वाढवून एक लाख एक हजार रुपये मुलीच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहे असे देखील म्हटले गेले आहे .
योजना कुणाला लागू होणार?
- पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका लाभार्थ्यांना ही योजना मिळते.
- १ एप्रिल २०२३ व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना योजना लागू राहील.
- तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास योजना मुलीला लागू राहील.
कागदपत्रे काय लागणार?
- मुलीचा जन्माचा दाखला,
- कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
- तसेच लाभार्थीचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी अपात्र कोण असेल?
उत्पन्न १ लाखापर्यंत हवे म्हणजे लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी कुटुंब प्रमुखाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे. आणि एक मुलगा किंवा मुलगी असेल तर चालेल परंतु २००१ नंतर तीसरे अपत्य देखील नसावे असल्यास या योजनेसाठी अपात्र ठेवण्यात येते.
Lek Ladki Yojana ऑनलाईन अर्ज करा.
किती टप्यात, कसे मिळणार एक लाख ?
मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रुपये, ती पहिलीत गेल्यानंतर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये मिळणार आहेत.
कोठे संपर्क साधाल ?
'लेक लाडकी ही योजना' जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यासंदर्भात तहसीलदारांचा दाखला महत्त्वाचा आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो, तसेच अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांकडे चौकशी करता येते.
💢 Related Scheme : विश्वकर्मा योजना Linkलेक लाडकी योजनाची इतर माहिती
Frequently Asked Questions | Link |
Toll Free Number | 1800-11-4477 |
CONTACT US Helpline: | |
Link | |
Telegram | Link |
Follow Us