10 वी 12 वीच्या परीक्षा संपल्या की प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एकच विचार सुरू होतो पुढचा टप्पा कोणता? या संभ्रमाच्या काळात अनेकदा एक मोठी चूक घडते इतरांना पाहून निर्णय घेणं.
आजच्या काळात अनेक विद्यार्थी केवळ त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या निवडीवर आधार घेत आपलं करिअर ठरवत आहेत, कुणी NEET JEE इ. परीक्षांची तयारी करत आहे म्हणून आपणही तिथेच झेप घ्यायची ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे.
अनेकदा अशा निवडीनंतर काही महिन्यांतच लक्षात येतं की हे क्षेत्र आपल्या आवडीनिवडी, क्षमतांशी सुसंगत नाही आणि मग वेळ, मेहनत, पैसा आणि आत्मविश्वास वाया जातो. ही चूक टाळायची असेल, तर विद्यार्थी आणि पालक दोघांनीही पुढील टप्प्याच्या निर्णयासाठी विचारपूर्वक, जागरूक आणि वास्तववादी पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे. दहावी किंवा बारावी नंतरचा टप्पा म्हणजे फक्त पुढच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात नाही, तर स्वतःच्या स्वप्नांना दिशा देण्याची संधी आहे.
यश म्हणजे फक्त गुणपत्रिकेत मिळालेले गुण नव्हे, तर आयुष्याला दिलेली योग्य दिशा आणि मानसिक समाधान आहे. योग्य दिशेने प्रगती करायची असल्यास खाली दिलेल्या गोष्टींचा नक्की विचार करा.
'मला काय आवडतं?" "मी कुठल्या कामात उत्साही राहतो?", "मी सर्जनशील आहे की विश्लेषण क्षम? हे प्रश्न स्वतःला विचारा. ही स्वतःची ओळख पुढील यशाचं प्रथम पाऊल ठरते.
ह्या सॉट स्किल्स तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी बनवू शकतात.
सकारात्मक लोकांमध्ये राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा चांगले मित्र, प्रेरणादायी शिक्षक, सहकार्य करणारे पालक हे तुमचं बळ असतं. पण सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा. 'मी करू शकतो/शकते हा विचारच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतो.
यश म्हणजे फक्त परीक्षा उत्तीर्ण होणं नव्हेतर स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवणं, योग्य दिशेनं सातत्याने वाटचाल करणं आणि प्रत्येक टप्प्यावर शिकत राहणं. विद्यार्थयांनी आणि पालकांनी मिळून योग्य निर्णय घेतले, तर प्रत्येक विद्यार्थी आपलं यश स्वतः कोरू शकतो.
स्वतःला ओळखण्यापासून सुरुवात करा.
कोणतंही क्षेत्र निवडण्यापूर्वी स्वतःच्या आवडीनिवडी, ताकद, आणि स्वप्नांचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.'मला काय आवडतं?" "मी कुठल्या कामात उत्साही राहतो?", "मी सर्जनशील आहे की विश्लेषण क्षम? हे प्रश्न स्वतःला विचारा. ही स्वतःची ओळख पुढील यशाचं प्रथम पाऊल ठरते.
करिअरचे विविध पर्याय जाणून घ्या चौकट मोडा
पारंपरिक इंजिनिअरिंग, डॉक्टरकी, लॉ. CA अशा वाटा आजही महत्त्वाच्या आहेतच, पण त्यापलिकडेही अनेक नवीन दिशा आहेत डिजिटल मार्केटिंग, अॅनिमेशन, डिझाइन, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, फॅशन डिझाइन, फोटोग्राफी, आधुनिक शेती, पर्यावरणशास्त्र, AI सायकोलॉजी, पेंथ लेंब तसेच गव्हर्नमेंट जॉब मध्ये UPSC] MPSC मधील इतर पोजीशन मध्ये संधी शोधण्यासाठी करिअर गाईड्स, सेमिनार्स आणि मार्गदर्शकांचं सहकार्य घ्या.गुणांपेक्षा कौशल्यांवर लक्ष द्या
गुण हे मूल्यमापनाचं एक साधन असलं तरी यशस्वी होण्यासाठी संवाद कौशल्य, निर्णय क्षमता आणि विचारशक्ती, वेळेचं व्यवस्थापन, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि भावनिक समज अश्या कौशल्यांची गरज असते.ह्या सॉट स्किल्स तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी बनवू शकतात.
उद्दिष्टं ठरवा पण लवचिकता ठेवा
ध्येय निश्चित करताना स्पष्टता असावी, पण गरज भासल्यास मार्ग बदलण्याची तयारी ठेवा. वय, अनुभव आणि विचारांच्या परिपक्वतेनुसार आवडी बदलू शकतात. आणि हे पूर्णपणे स्वाभाविक स्वाभाविक आहे.छंदांनाही वेळ द्या तेही तुमचं व्यक्तिमत्त्व घडवतात
अभ्यासाबरोबरच छंद देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, संगीत, लेखन, चित्रकला, खेळ, नृत्य यांमधून मिळणारा आनंद आणि मानसिक शांती तुमचं समतोल जीवन राखतात आणि सर्जनशीलता वाढवतात.तंत्रज्ञानाचा मित्रासारखा वापर करा
शैक्षणिक अॅप्स, ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूबवरील ज्ञानवर्धक चॅनेल्स यांचा सकारात्मक वापर करा. पण सोशल मिडिया, गेम्स, वेब सिरीज यामध्ये वेळ वाया जाऊ देऊ नका.आरोग्य यशाचं गुपित
मानसिक आणि शारीरिक आरोग्य कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, शांत झोप, विश्रांती, तणावग्रस्त असाल तर संवाद साधा हे सर्व घटक तुमचं एकंदर कार्यक्षमता वाढवतात.चुका घडू द्या त्यातूनच प्रगती होते
यशाचा मार्ग सरळ नसतो. चुका होतील, पण त्या पचवून पुढे जाणं हीच खरी शौर्यगाथा आहे. प्रत्येक अपयश काहीतरी शिकवून जातं. त्याला यशाच्या दिशेनं एक पाऊल समजा.जिज्ञासू बना, सतत शिकत राहा
फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता विविध विषयांमध्ये रस घ्या. वाचन, माहितीपट, चर्चा, प्रात्यक्षिकं हे सर्व तुमचं ज्ञान वाढवतात आणि तुमचा दृष्टिकोन समृद्ध करतात.सकारात्मक लोकांमध्ये राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा चांगले मित्र, प्रेरणादायी शिक्षक, सहकार्य करणारे पालक हे तुमचं बळ असतं. पण सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा. 'मी करू शकतो/शकते हा विचारच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतो.
यश म्हणजे फक्त परीक्षा उत्तीर्ण होणं नव्हेतर स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवणं, योग्य दिशेनं सातत्याने वाटचाल करणं आणि प्रत्येक टप्प्यावर शिकत राहणं. विद्यार्थयांनी आणि पालकांनी मिळून योग्य निर्णय घेतले, तर प्रत्येक विद्यार्थी आपलं यश स्वतः कोरू शकतो.
What next after 10th and 12th? | १० वी १२ वी नंतर पुढे काय?
दहावी, बारावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात जाता येते, जेणेकरून पुढे भविष्यात सरकारी नोकरी/जॉब लागेल?
दहावी, बारावीनंतर बरेच व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. त्यापैकी १ डिप्लोमा इन प्रिंटींग टेक्नोलॉजी,1 वर्ष मुदतीचे ऑफसेट प्रिंटींग असे अभ्यासक्रम पूर्ण केले कि १०० % कायमस्वरूपी नौकारीची संधी उपलब्ब्ध आहेत तसेच तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील करू शकता.प्रिंटींग टेक्नोलॉजी हा १ वैविध्यपूर्ण असलेला दहावी, बारावीनंतर नंतरचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. सदर अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) यांची मान्यता असून आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्न असा हा अभ्यासक्रम आहे.
प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कोर्सला दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल प्रिंटिंगसह, मुद्रण व्यवसाय बदल होत आहे. प्रिंटींग टेक्नोलॉजी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दहावी, बारावीनंतर विद्यार्थी प्रकाशन, पॅकेजिंग आणि जाहिरात उद्योगांमध्ये विविध नोकऱ्यांसाठी पात्र होऊ शकतात.
महाराष्ट्र फक्त पुणे ,बीड व मुंबई येतील तंत्रनिकेतन मध्ये दहावी, बारावीनंतर हा अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने रोजगारच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. जगभरात पॅकेजिंग इंडस्ट्री वाढत आहे. दहावी, बारावीनंतर दररोज वापरातील विविध उत्पादनां च्या पॅकेजिंग साठी मुद्रण तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.त्यासाठी फ्लेक्झिबल प्रिंटिंग तंत्राचा वापर केला जातो.
दहावी बारावी नंतर पुढे काय करायचे ? योग्य माहिती कोठे कशी मिळेल ?
- दहावी बारावी नंतर कितीतरी पर्याय उपलब्ध असतात.
- तुम्हाला कशात रुची आहे, आपल्याला तो अभ्यासक्रम झेपेल का, किती शिकायचे आहे, घराजवळ शिकायचे आहे,की दुसरीकडे जाण्याची तयारी आहे, किती खर्च करायला तयार आहात ह्या नुसार निर्णय घ्यावा.
- एक चार्ट देत आहे, तुमच्या आवडीनुसार योग्य तो अभ्यासक्रम निवडा.