![]() |
प्रतिनिधी, शिरपूर : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या निवडणुकीत ग्रामपंचायत भोईटी येथील वार्ड क्र. ३ मधून अनुसूचित जमाती या राखीव जागेवर रविंद्र पोपट कोळी हे सदस्य म्हणून निवडून आलेले होते.
रविंद्र कोळी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी टोकरे कोळी या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र दाखल केले होते. त्यासोबत त्यांनी जात वैधता समितीकडे दाखल केलेली पोच पावती सादर केली होती. मात्र विहीत मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी धुळे यांनी रविंद्र कोळी यांना ऊर्वरित कालावधिकरीता सदस्य म्हणून अपात्र घोषित केले.
महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अधिनियम २०१८ यामध्ये सुधारणा करण्याकरीताचा अध्यादेश दि. १४ फेब्रुवारी २०१९ अन्वये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी सहा महिन्याऐवजी एक वर्ष करण्यात आलेला आहे.

तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सन २०२३ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ दि. १० जुलै २०२३ मधील ३(१) (क) अन्वये या अध्यादेशाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून बारा महिन्याच्या मुदतीत आत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
उपरोक्त नियमानुसार १० जुलै २०२४ पर्यंत रविंद कोळी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३०-१(अ) मधील तरतुदीनुसार रविंद्र कोळी हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून पदावर राहण्यास उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी धुळे यांनी आदेश दिले आहेत.

भोंग्य पावरा यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे रविंद्र कोळी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती केली होती. तक्रारदार भोंग्या पावरा यांच्या बाजूने ॲड. संतोष पाटील यांनी काम पहिले.
केवळ जातीच्या प्रमाणपत्रावर अनु. जमाती कोट्यातून ग्रा. पं. सदस्य राहीले मात्र जात वैधता सादर न करू शकल्याने जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले. सदर निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
भोंग्या पावरा | तक्रारदार तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भोईटी.