प्रथम ग्रामपंचायतीकडे तक्रार द्या
- तुमची तक्रार लेखी स्वरूपात द्या.
- अर्जात संपूर्ण माहिती द्या - अतिक्रमण/बांधकाम कुठे आहे, कोण करत आहे, किती क्षेत्रफळ व्यापले आहे, याचे पुरावे (फोटो, व्हिडिओ) असल्यास संलग्न करा.
- अर्जावर तुमचे नाव, पत्ता व सह्या असाव्यात.
ग्रामसेवक व सरपंच यांची कारवाईची जबाबदारी
- ग्रामसेवक किंवा सरपंच यांना ते स्थान तपासून "अतिक्रमण हटाव नोटीस" पाठवावी लागते.
- 7 ते 15 दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले जातात.
कारवाई न झाल्यास वरिष्ठ प्राधिकरणाकडे तक्रार
- जर ग्रामपंचायत कारवाई करत नसेल, तर पुढील ठिकाणी तक्रार कराः
- तालुका पंचायत समिती / गट विकास अधिकारी (BDO)
- जिल्हा परिषद / जिल्हाधिकारी कार्यालय
- तक्रार अर्जात "ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याची" नोंद करा.
पोलिसात मदतीसाठी अर्ज
जर अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्ता अडवला असेल, किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, तर पोलिस ठाण्यात तक्रार द्या. Grampanchayat Hadditil Atikraman |माहितीचा अधिकार (RTI) वापरून माहिती मिळवा
आपण मागील परवानग्या, मालमत्तेची स्थिती, तक्रारीवर झालेली कारवाई याबाबत RTI दाखल करू शकता.महत्वाची टीप
तक्रार करताना शांतपणे व पुराव्यांसह काम करा.
एकाच वेळी ग्रामपंचायत आणि जिल्हा स्तरावर तक्रार केल्यास जलद कारवाई होण्याची शक्यता वाढते.
एकाच वेळी ग्रामपंचायत आणि जिल्हा स्तरावर तक्रार केल्यास जलद कारवाई होण्याची शक्यता वाढते.
Grampanchayat Hadditil Atikraman | तक्रार अर्जाचा नमुना (Complaint Letter Sample)
प्रति,- मा. सो. सन्माननीय सरपंच / ग्रामसेवक
- [ग्रामपंचायतीचे नाव],
- [गावाचे नाव],
- [तालुका], [जिल्हा].
- दिनांक :
विषयः ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण / अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार.
महोदय,
वरील विषयावरून आपणास विनंती तक्रारी अर्ज करितो की, मी, [ शैलेश लालसिंग पावरा ( पूर्ण नाव) लिहा ], रा. (ग्रामपंचायत संपूर्ण पत्ता, लिहा ) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहे. माझी आपल्याकडे खालीलप्रमाणे तक्रार आहे:
[तक्रारदाराचे संक्षिप्त वर्णन जसे की "गावातील अमुक ठिकाणी, अमुक व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर किंवा शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा व त्रासाचा सामना करावा लागत आहे."]
तरी आपण कृपया याची तात्काळ दखल घेऊन सदर अतिक्रमण / अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करावी, आणि संबंधित व्यक्तीस नोटीस बजावावी, अशी विनंती आहे.
आपल्याकडून होणाऱ्या कारवाईची लेखी माहिती मला देण्यात यावी.
महोदय,
वरील विषयावरून आपणास विनंती तक्रारी अर्ज करितो की, मी, [ शैलेश लालसिंग पावरा ( पूर्ण नाव) लिहा ], रा. (ग्रामपंचायत संपूर्ण पत्ता, लिहा ) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहे. माझी आपल्याकडे खालीलप्रमाणे तक्रार आहे:
[तक्रारदाराचे संक्षिप्त वर्णन जसे की "गावातील अमुक ठिकाणी, अमुक व्यक्तीने सार्वजनिक रस्त्यावर किंवा शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा व त्रासाचा सामना करावा लागत आहे."]
तरी आपण कृपया याची तात्काळ दखल घेऊन सदर अतिक्रमण / अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करावी, आणि संबंधित व्यक्तीस नोटीस बजावावी, अशी विनंती आहे.
आपल्याकडून होणाऱ्या कारवाईची लेखी माहिती मला देण्यात यावी.
- आपला विश्वासू,
- [तुमचे नाव]
- [तारीख]
- [मोबाइल नंबर]
- [स्वाक्षरी]
Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण नमुना अर्ज |
Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे अधिकार कोणाला आहे?
ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण तक्रार असेल तर ६ महिन्याच्या आतील असेल तर नोटीस देऊन ग्रामपंचायत ते काढू शकते. जर का ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण ६ महीण्यापेक्षा जुने असेल तर ग्रामपंचायत तहसीलदार कडे अतिक्रमण काढण्यासाठी विनंती करु शकते. ग्रामपंचायत च्या हद्दीतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार तहसीलदार यांना असतात. तलाठी , मण्डल अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यान्हा भेटून लेखी तक्रार करावी नंतर महिना भरात माहितीच्या अधिकारात आपण काय कार्यवाही केली याचे उत्तर मागावे.Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण अर्ज नमुना pdf
Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत जमिनीवर अतिक्रमण कसे काढावे?
Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण सरकारी रस्त्यावर अतिक्रमणाच्या तक्रारीवर ग्रामपंचायतने कायद्याने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी:
तक्रार नोंदविणे:
संबंधित तक्रार ग्रामपंचायतीमध्ये लेखी स्वरूपात नोंदवून घ्यावी. तक्रार दाखल झाल्याची पावती तक्रारदाराला द्यावी.तपासणी करणे:
ग्रामपंचायत प्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी तक्रार तपासण्यासाठी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी.अतिक्रमणाची मोजणी:
ग्रामपंचायत मधील सरकारी रस्ता किंवा सार्वजनिक जागा असल्यास भूमापन विभागाच्या सहाय्याने मोजणी करून अतिक्रमण निश्चित करावे.नोटीस देणे:
जर ग्रामपंचायत मधील अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाले, तर अतिक्रमण करणाऱ्याला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 (कलम 53) अंतर्गत नोटीस दिली जावी. नोटीसमध्ये अतिक्रमण हटविण्याची सूचना व ठराविक वेळ दिला जावा (सामान्यतः 7-15 दिवस).स्वतः अतिक्रमण हटविणे:
जर संबंधित व्यक्तीने दिलेल्या वेळेत ग्रामपंचायत मधील अतिक्रमण हटवले नाही, तर ग्रामपंचायतीने त्याबाबत पुढील कार्यवाही करावी: अतिक्रमण स्वतः हटविणे. या कामाचा खर्च अतिक्रमण करणाऱ्याच्या कडून वसूल करणे.पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य:
जर ग्रामपंचायत मधील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असेल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी.
नियमांचे पालन:
ग्रामपंचायतीने सर्व कार्यवाही कायदेशीर आणि ग्रामसभा चा ठरावांनुसार करावी.नियोजनबद्ध अहवाल:
ग्रामपंचायत मधील अतिक्रमण हटविल्यानंतर त्याचा अहवाल तयार करावा. अहवालामध्ये सर्व तपशील, मोजणी रेकॉर्ड, नोटिसा, आणि हटविल्याची प्रक्रिया नमूद करावी.
हेही वाचा :
अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करा. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती हवी असल्यास किंवा Grampanchayat Hadditil Atikraman | ग्रामपंचायत च्या हद्दीतील अतिक्रमण फॉर्म हवे असल्यास कमेंट करा.