![]() |
अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत. माहिती अधिकार अर्ज : Avlokan Abhilekh Mahiti Adhikar Arj
माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये सामान्य नागरिकांना एक चांगले हत्यार मिळाले आहे. परंतु अनेक चतुर कर्मचारी, अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी माहिती नाकारत असतात. त्याविरुद्ध अपील दाखल करता येते मात्र अपीलाचा निकाल वर्षानुवर्षे लागत नाही हे त्यांना देखील माहिती झाले आहे. त्यामुळे माहिती नाकारण्याकडे कल वाढला आहे. जरी निकाल लवकर लागला तरी फक्त दंड होतो त्यामुळे दंडाला कुणीही घाबरत नाही.
यावर उपाय म्हणून अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत चे परिपत्रक रामबाण उपाय ठरले आहे. दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत अभिलेख उपलब्ध करुन देण्यात यावे अशी तरतूद परिपत्रक मध्ये केलेली आहे. त्यामुळे माहिती नाकारण्याची गंमत त्यांना करता येणार नाही. अभिलेख निरीक्षण करायचे आणि आपल्याला हव्या त्या कागदपत्रांची नक्कल मागायची.
यामुळे 30 दिवस वाट पहायला नको, पैसे भरण्याचे पत्र नको. इथे हवी ती माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. येणारा सोमवार सोडून त्या पुढील आठवड्यातील सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत अभिलेख उपलब्ध करुन मिळावा यासाठी अर्ज दिला तर संबंधित कार्यालयास देखील अभिलेख शोधण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी मिळतो. समजा सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर मंगळवारी आपला अधिकार अबाधित राहणार आहे.
समजा तरीही टाळाटाळ केली तर संबंधित माहिती अधिकाऱ्याची तक्रार वरिष्ठांकडे करु शकतो. इथं महत्त्वाचा फायदा हा आहे की अपील करण्याची तरतूद यामध्ये नाही. थेट वरिष्ठांकडे तक्रार दाखल करायची.
मी एक अर्जाचा नमुना केला आहे. त्याप्रमाणे अर्ज करावा. सोबत परिपत्रक पण देत आहे. याबाबत मार्गदर्शन हवे असल्यास कुणीही, कधीही फोन करु शकता.
- कपिल राऊत, सातारा.
- सातारा जिल्हा संघटक,
- माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य.
- 9881252223
- माहितीचा अधिकार अर्ज ग्रामपंचायत pdf :
- ऑनलाईन माहितीचा अधिकार :
- ग्रामपंचायत अर्ज नमुना :
- ग्रामपंचायत योजना :
- ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना pdf :
- माहितीचा अधिकार अपील अर्ज :
![]() |
![]() |
आमच्या सोअसिअल मिडीयाला जॉईन व्हा.